Ganesh Chaturthi 2018 : डॉल्फिनकडून १३ टन निर्माल्य संकलन, सांगलीत उप्रकमास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 01:35 PM2018-09-21T13:35:56+5:302018-09-21T13:39:25+5:30

जलप्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य नदीत फेकू नये, या डॉल्फिन नेचर ग्रुप या संस्थेने केलेल्या आवाहनास गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचव्या, सातव्या आणि नवव्यादिवशी विसर्जनावेळी १३ टन निर्माल्य संकलन झाले. या निर्माल्यापासून आमराई व महावीर उद्यानात सेंद्रीय खताची निर्मित्ती केली जाणार आहे.

Ganesh Chaturthi 2018: 13 Tonne Nirmalya Collection from Dolphin, Sangalyat Weekly Response | Ganesh Chaturthi 2018 : डॉल्फिनकडून १३ टन निर्माल्य संकलन, सांगलीत उप्रकमास प्रतिसाद

Ganesh Chaturthi 2018 : डॉल्फिनकडून १३ टन निर्माल्य संकलन, सांगलीत उप्रकमास प्रतिसाद

Next
ठळक मुद्देडॉल्फिनकडून १३ टन निर्माल्य संकलन, सांगलीत उप्रकमास प्रतिसाद १९ वर्षापासून कार्य; निर्माल्य खतासाठी आमराईत

सांगली : जलप्रदूषण टाळण्यासाठी निर्माल्य नदीत फेकू नये, या डॉल्फिन नेचर ग्रुप या संस्थेने केलेल्या आवाहनास गणेश भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाचव्या, सातव्या आणि नवव्यादिवशी विसर्जनावेळी १३ टन निर्माल्य संकलन झाले. या निर्माल्यापासून आमराई व महावीर उद्यानात सेंद्रीय खताची निर्मित्ती केली जाणार आहे.


पर्यावरण संवर्धनासाठी डॉल्फिन नेचर ग्रुपचे गेल्या १९ वर्षापासून कार्य सुरु आहे. गणेशोत्सवात पाचव्या, सातव्या व नवव्यादिवशी निर्माल्य संकलन करण्यासाठी संस्थेचे सदस्य दुपारी चार ते रात्री बारापर्यंत कृष्णा नदीवर सरकारी घाटावर थांबतात.

यावर्षी पाचव्यादिवशी चार, सातव्यादिवशी सहा, तर शुक्रवारी नवव्यादिवशी तीन टन निर्माल्य संकलन केले. संस्थेचे दिनेश पाटील, प्रविण मगदुम, संस्थापक प्रा. शशिकांत ऐनापुरे, कार्याध्यक्ष अरूण कांबळे, सचिन चोपडे, आदिती कुंभोजकर, प्रा. डॉ. विकास आवळे, लक्ष्मण भट, पवन भोकरे, मधुरा सवदी, विजय सवदी, रफीक इनामदार आदी सदस्य या कार्यात सहभागी झाले होते.



गणपती बाप्पा मोरया, पर्यावरण वाचवू या, केली निसगार्शी मैत्री तरच भविष्याची खात्री, निर्माल्य येथेच द्या , निर्माल्य पाण्यात सोडू नका, पाणी दूषित करू नका, असे फलक हातात धरून डॉल्फिन नेचर ग्रुपचे सदस्य कृष्णा घाटावर गणेश भक्तांना आवाहन करत पर्यावरण संवर्धनाबाबत प्रबोधनाचे काम केले.

गणेश भक्तांकडून या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गणेश भक्तांनी प्लॅस्टिक पिशवीऐवजी कागदामधून निर्माल्य आणून डॉल्फिनच्या सदस्यांकडे सुपूर्द केले. सृजन सांगली संस्थे गणेश खटके, मदन पाटील, मानसिंग पवार, सचिन खुरपे हेही या कार्यात सहभागी झाले होते.

प्रत्येकवर्षी खत

गणेश भक्तांकडून जमा झालेले १३ टन निर्माल्य आमराई व महावीर उद्यानात ठेवण्यात आले आहे. यापासून सेंद्रीय व गांढूळ खताची निर्माती केली जाणार आहे. प्रत्येक वर्षी निर्माल्यापासून खत तयार केले जाते. हे खत उद्यानातील वृक्षांना अत्यंत उपयुक्त ठरते.

Web Title: Ganesh Chaturthi 2018: 13 Tonne Nirmalya Collection from Dolphin, Sangalyat Weekly Response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.