शोधनिबंधावर सहीसाठी मागितले पाच लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 05:03 AM2017-12-30T05:03:03+5:302017-12-30T05:03:17+5:30

शोधनिबंधावर सही करण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याची फिर्याद निवासी डॉक्टर व ‘मार्ड’ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. गिरीश शरद कांबळे यांनी मिरज न्यायालयात केली आहे.

Five lakhs for the question of right for the investigation! | शोधनिबंधावर सहीसाठी मागितले पाच लाख!

शोधनिबंधावर सहीसाठी मागितले पाच लाख!

Next

मिरज (जि. सांगली) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्या डॉ. पल्लवी सापळे यांनी मानसिक छळ, अत्याचार व शोधनिबंधावर सही करण्यासाठी पाच लाखांची मागणी केल्याची फिर्याद निवासी डॉक्टर व ‘मार्ड’ संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ. गिरीश शरद कांबळे यांनी मिरज न्यायालयात केली आहे.
काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर महापुरुषाची विटंबना केल्याने डॉ. कांबळे यांनी अधिष्ठात्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर धुळे, औरंगाबाद, पुणे येथे डॉक्टरांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ मिरजेसह राज्यातील निवासी डॉक्टर संपावर गेले होते. त्यामुळे अधिष्ठात्यांनी चिडून आपण ‘मार्ड’चे पदाधिकारी असल्याने धमकी दिली व महाविद्यालयात महापुरुषांची जयंती साजरी करीत असताना आपल्याला भाषण करण्यास मज्जाव केला. एम.डी. परीक्षेस बसण्यासाठी आवश्यक असणाºया शोधनिबंधावर सही करण्यास डॉ. सापळे यांनी टाळाटाळ केली, अशी तक्रार आहे़
>तक्रारीबाबत माहिती नाही - पल्लवी सापळे
डॉ. गिरीश कांबळे यांच्या तक्रारीबाबत अधिष्ठात्या डॉ. पल्लवी सापळे यांच्याशी संपर्क साधला असता, या तक्रारीबाबत कोणतीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. अधिष्ठात्या डॉ. सापळे यांनी काही दिवसांपूर्वीच महाविद्यालयातील काही सहकाºयांकडून त्यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची तक्रार करून, स्वत:साठी सुरक्षारक्षकांची नियुक्ती केली आहे.

Web Title: Five lakhs for the question of right for the investigation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.