निवडणुकीपूर्वी पक्षांतराचा मिरज पॅटर्न कायम : मिरज महापालिका निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:22 AM2018-06-07T00:22:12+5:302018-06-07T00:22:12+5:30

मिरजेतील काँग्रेस व राष्टÑवादीच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिका निवडणूकीपूर्वी पक्षांतराचा मिरज पॅटर्न कायम राहिला आहे.

Before elections, continuous mirage pattern continues: Miraj municipal elections | निवडणुकीपूर्वी पक्षांतराचा मिरज पॅटर्न कायम : मिरज महापालिका निवडणूक

निवडणुकीपूर्वी पक्षांतराचा मिरज पॅटर्न कायम : मिरज महापालिका निवडणूक

Next
ठळक मुद्दे भ्रष्टाचाराबाबत भाजपच्या तोंडाला बसणार कुलूप, सत्ताधारी गटाला धक्का देण्याची परंपरा

सदानंद औंधे ।
मिरज : मिरजेतील काँग्रेस व राष्टवादीच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिका निवडणूकीपूर्वी पक्षांतराचा मिरज पॅटर्न कायम राहिला आहे. सत्ताधारी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे महापालिकेतील घोटाळे व भ्रष्टाचाराबाबत भाजप नेत्यांची बोलती बंद होणार आहे. मिरजेतील कारभारी नगरसेवकांनी महापालिकेतील सत्ताधारी नेत्यांना नेहमीच धोबीपछाड दिली असल्याने, या नगरसेवकांना नियंत्रणात ठेवण्याची कसरत भाजप नेत्यांना करावी लागणार आहे.

गत महापालिका निवडणुकीत मिरजेतील २४ पैकी १४ जागा इद्रिस नायकवडी, सुरेश आवटी या मिरजेतील कारभारी नेत्यांच्या मदतीने काँग्रेसने जिंकल्या होत्या. मिरजेत यश मिळाल्याने महापालिकेची सत्ता काँग्रेसला हस्तगत करणे शक्य झाले. मात्र सध्याच्या महापालिका निवडणुकीपूर्वी मिरजेतील कारभारी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. सुरेश आवटी, विवेक कांबळे, शिवाजी दुर्वे, निरंजन आवटी या काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक महादेव कुरणे यांच्यासह राष्टÑवादीचे माजी नगरसेवक आनंदा देवमाने, मनसेचे दिगंबर जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मिरजेत किशोर जामदार, संजय मेंढे, बबीता मेंढे, बसवेश्वर सातपुते, धोंडुबाई कलगुटगी, बेबीताई मालगावे एवढेच काँग्रेसमध्ये निष्ठावंत नगरसेवक शिल्लक राहिले आहेत.

महापालिका निवडणुकीपूर्वी इद्रिस नायकवडी यांच्या संघर्ष समितीच्या झेंड्याखाली एकत्र आलेले नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने, संघर्ष समितीही भाजपशी तडजोड करण्याची शक्यता आहे. गत निवडणुकीत मिरजेत भाजपचा केवळ एक उमेदवार निवडून आला होता. मात्र यावेळी काँग्रेसचे चार, तसेच मनसे व राष्टÑवादीचा एक असे सहा आजी-माजी नगरसेवक भाजपच्या गळाला लागले आहेत. भाजपने नगरसेवकांची पळवापळवी केल्याने महापालिका निवडणुकीत मिरजेत काँग्रेसला यश मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

महापालिकेत सत्ता मिळविण्यासाठी भाजपने मिरजेतील आजी-माजी नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला असला तरी, महापालिकेत सत्ता मिळाली नाही, तर ही मंडळी भाजपमध्ये राहणार का, याबाबत साशंकता आहे. आ. सुधीर गाडगीळ यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर पाचशे कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप करून, मुख्यमंत्र्यांकडे याच्या चौकशीची मागणी केली होती. मात्र महापालिकेतील कारभारी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशानंतर महापालिकेतील घोटाळे व भ्रष्टाचाराबाबत भाजप नेत्यांना मौन पाळावे लागणार आहे.

भाजपमधील निष्ठावंतांना डावलून आयात मंडळींना उमेदवारी देण्याच्या खेळीला काँग्रेस, राष्टÑवादी कितपत आणि कसे तोंड देणार, यावरच निवडणूक समीकरणे अवलंबून आहेत. प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलणाºया नगरसेवकांच्या मिरज पॅटर्नचा फटका यापूर्वी काँग्रेस व महाआघाडीला बसला असल्याने, भाजप नेत्यांना सतर्क रहावे लागणार आहे.

खाडेंचे गणित : विधानसभेसाठी
आ. सुरेश खाडे महापालिकेच्या कारभारापासून अलिप्त असले तरी, मिरजेतील नगरसेवकांशी त्यांची वर्षभर सलगी सुरू होती. महापालिका निवडणुकीसोबत विधानसभा निवडणुकीचे गणित असल्याने, आ. खाडे यांनी आजी-माजी नगरसेवकांच्या भाजप प्रवेशासाठी पुढाकार घेतला. निष्ठावंत-जुनी मंडळी हे स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.
 

हे विसरणार का?
मिरज दंगलप्रसंगी सुरेश आवटी यांना भाजप नेत्यांनी लक्ष्य केले होते. विवेक कांबळे यांनी काही महिन्यांपूर्वी कोरेगाव-भीमा प्रकरणानंतर शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि भाजपवर टीका करून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाजप सरकारमधून बाहेर पडावे, अशी मागणी केली होती. हे सर्व विसरून आता त्यांना भाजप नेत्यांशी जमवून घ्यावे लागणार आहे.

Web Title: Before elections, continuous mirage pattern continues: Miraj municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.