आळसंदला २२ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 11:30 PM2019-05-19T23:30:04+5:302019-05-19T23:30:08+5:30

आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने बुधवार दि. २२ मे ...

On December 22, the Rural Literary Meet | आळसंदला २२ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन

आळसंदला २२ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन

Next

आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने बुधवार दि. २२ मे रोजी पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गोरड यांनी दिली.
यावेळी गोरड म्हणाले, संमेलन चार सत्रात होणार आहे. सकाळी ९ वाजता सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधादेवी प्रभाकर देशमुख या प्रमुख पाहुण्या आहेत. सकाळी ११ वाजता द्वितीय सत्रात कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षपदी अंधकवी चंद्रकांत देशमुखे आहेत. दयासागर बन्ने, वासंती मेरू, स्वाती शिंदे-पवार, एम. बी. जमादार सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता मुख्य कार्यक्रम आहे. प्रसिध्द साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांचे अध्यक्षीय भाषण आहे. अरूण चव्हाण, देवदत्त राजोपाध्ये, रघुराज मेटकरी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच काव्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकांना परितोषिक देण्यात येणार आहे. यावेळी अरूण चव्हाण, रघुराज मेटकरी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. चौथ्या सत्रात प्रा. विश्वनाथ गायकवाड, शांतिनाथ मांगले यांचे कथाकथन होणार आहे.
संग्राम जाधव, खंडेराव जाधव, तानाजी जाधव, दीपक सावंत, अशोक देशमुख, रत्नकुमार नरूले, सोनाली शेटे, अशोक जाधव आदी संयोजन करत आहेत.

Web Title: On December 22, the Rural Literary Meet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.