पोलिसासह आठजणांवर बलात्काराचा गुन्हा : चित्रफित बनविली , महिलेची फिर्याद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:32 AM2018-02-23T00:32:13+5:302018-02-23T00:32:13+5:30

सांगली : येथील एका महिलेवर बलात्कार व तिचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस दलातील निलंबित पोलीस शिपाई आकाश दबडे, महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी याच्यासह आठजणांविरुद्ध

Criminal offense against eight persons, including police, made the film, the woman's prosecution | पोलिसासह आठजणांवर बलात्काराचा गुन्हा : चित्रफित बनविली , महिलेची फिर्याद

पोलिसासह आठजणांवर बलात्काराचा गुन्हा : चित्रफित बनविली , महिलेची फिर्याद

Next

सांगली : येथील एका महिलेवर बलात्कार व तिचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा पोलीस दलातील निलंबित पोलीस शिपाई आकाश दबडे, महापालिकेचा स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी याच्यासह आठजणांविरुद्ध गुरुवारी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. यातील दोघांना अटक केली आहे.

अझरुद्दीन उस्मान टिनमेकर शेख (वय २९, रा. आलिशान चौक, गणेशनगर) व स्वच्छता निरीक्षक श्रीकांत वासुदेव वलसे-मद्रासी (४१, हरिपूर रस्ता, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना २६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय निलंबित पोलीस शिपाई आकाश प्रकाश दबडे, संतोष मुळे, बाळू रणबिरे, सदाशिव निलवणी, अनिल कांबळे व सरोजा हेगडे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. संशयितांना मदत केल्याचा सरोजा हेगडे हिच्यावर गुन्हा दाखल आहे.

पीडित महिला २६ वर्षाची आहे. २००६ ते २०१८ या कालावधित संशयितांनी या महिलेस लग्नाचे आमिष, राहण्यासाठी भाड्याने खोली घेऊन देतो, तुला कोणतीही मदत लागली तर करतो, असे आमिष दाखवून अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. ती शहर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेली. त्यावेळी आकाश दबडे यानेही तिला तुझी तक्रार घेतो, असे सांगून बलात्कार केला. पण प्रत्यक्षात कोणीही तिला मदत केली. तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत अत्याचार केला.
दबडे हा शहर पोलीस ठाण्यात नियुक्तीस होता. सहा महिन्यांपूर्वी त्याच्याविरुद्ध लाचेची मागणी केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याला निलंबित केले आहे. अजून तो सेवेत रुजू झाला नाही. तोपर्यंत त्याच्यावर गुरुवारी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अजून अटक केलेली नाही.

शीतपेय पाजून चित्रफित बनविली
पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे की, ती आईसोबत भाड्याने खोली घेऊन राहत होती. त्यावेळी तिची एका महिलेशी ओळख झाली आहे. यातून त्या महिलेने तिला शीतपेय पाजून जबरदस्तीने एका व्यक्तीबरोबर शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून व्हिडीओ चित्रफित बनविली. या चित्रफितीच्याआधारे धमकावत तिने अन्य व्यक्तींशी शरीरसंबंध ठेवण्यास सांगितले.

सांगलीतील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेतील अझरुद्दीन शेख व श्रीकांत मद्रासी या दोघांना शहर पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले.

Web Title: Criminal offense against eight persons, including police, made the film, the woman's prosecution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.