सहकारमंत्री सर्वाधिक घोटाळेबाज! -अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 04:22 AM2018-04-06T04:22:20+5:302018-04-06T04:22:20+5:30

महापालिकेच्या अग्निशमन दलाची जागा लाटण्यापासून लोकमंगल कंपनीच्या घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.

Cooperative Minister is the most scam! -Ajit Pawar | सहकारमंत्री सर्वाधिक घोटाळेबाज! -अजित पवार

सहकारमंत्री सर्वाधिक घोटाळेबाज! -अजित पवार

googlenewsNext

सांगली - महापालिकेच्या अग्निशमन दलाची जागा लाटण्यापासून लोकमंगल कंपनीच्या घोटाळ्यापर्यंत अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सर्वात मोठे घोटाळेबाज आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.
सहकारमंत्री देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेवर केलेल्या टीकेला अजित पवारांनी गुरुवारी उत्तर दिले. ते म्हणाले, लोकमंगल कंपनीच्या पैशाचे काय झाले, अग्निशमन दलाच्या जागेवर बंगला कसा बांधला, साखरेचे भाव पडताना काय धोरण राबविले, तुरीच्या घोटाळ्यात त्यांचे मौन कसे, या सर्व प्रश्नांची उत्तरे अगोदर सहकारमंत्री सुभाष देशमुखांनी द्यावीत आणि मग दुसऱ्यांवर टीका करावी. मुख्यमंत्र्यांच्या चहात विरोधकही वाटेकरी आहेत, असेही देशमुखांनी म्हटले होते. प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षांत आम्ही मुख्यमंत्र्यांच्या एकाही चहापानाला हजर नव्हतो. आम्ही त्यांच्या चहापानावरच बहिष्कार टाकलेला आहे. एक कप चहाच्याही आम्ही मिंध्यात नाही. सरकार सर्वांचीच मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न करीत आहे. आता पत्रकारांवर, वृत्तपत्रांवर बंधने आणण्याचे त्यांचे काम सुरू झाले आहे. १९७५ मध्ये जेव्हा आणीबाणी आणली गेली; त्यानंतर जनतेने ते सरकारच उलथवून लावले. भाजपाने बंधने लादताना, मुस्कटदाबी करताना पुन्हा सत्तेवर येण्याच्या भ्रमात राहू नये. सरकार सत्तेच्या धुंदीत काम करीत आहे.

पत्रकार परिषदेला
पोलीस कसे?
आम्हीही राज्यातील सत्ता चालविली आहे. कधी दुसºयांच्या कामात लुडबूड केली नाही. सांगलीत पत्रकार परिषदेला भाजपा सरकारने मात्र पोलिसांना पाठविले आहे. हा कसला प्रकार आहे, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
शिवसेनेची मळमळ
बाहेर आली!
शिवसेनेच्या मुखपत्रातून झालेल्या टीकेलाही अजित पवार यांनी उत्तर दिले. मी शिवसेनेला दुतोंडी गांडूळ म्हणालो म्हणून त्यांनी मला विषारी सापाची उपमा दिली.शिवसेनेने त्यांची मळमळ काढली़ गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटतो, तशी शिवसेनेची आजची अवस्था आहे.

Web Title: Cooperative Minister is the most scam! -Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.