Lok Sabha Election 2019 अपूर्ण जलसिंचन योजना ही कॉँग्रेस-राष्ट्रवादीची स्मारके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 11:48 PM2019-04-21T23:48:15+5:302019-04-21T23:49:39+5:30

अपूर्ण जलसिंचन योजना ही कॉँग्रेस-राष्ट्रवादीची स्मारके लोकमत न्यूज नेटवर्क विटा : टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांसाठी मीच १३०१ कोटी रुपयांचा ...

Congress-Nationalist Monument of Lok Sabha Election 2019 Incomplete Irrigation Scheme | Lok Sabha Election 2019 अपूर्ण जलसिंचन योजना ही कॉँग्रेस-राष्ट्रवादीची स्मारके

Lok Sabha Election 2019 अपूर्ण जलसिंचन योजना ही कॉँग्रेस-राष्ट्रवादीची स्मारके

Next


अपूर्ण जलसिंचन योजना ही कॉँग्रेस-राष्ट्रवादीची स्मारके
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : टेंभू योजनेच्या अपूर्ण कामांसाठी मीच १३०१ कोटी रुपयांचा निधी दिला. गेल्या १५ वर्षात सिंचन योजनांची कामे ठप्प होती. त्यामुळे या अपूर्ण जलसिंचन योजना म्हणजे त्यावेळच्या कॉँग्रेस व राष्टÑवादीची स्मारके बनली होती. परंतु भाजप सरकारने प्रयत्न करून योजना मार्गी लावल्या, असे मत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.
सांगली लोकसभा मतदासंघातील महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी आयोजित विजय संकल्प सभेत गडकरी बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंदक्रांत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खा. संजयकाका पाटील, आ. अनिल बाबर, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, अशोकराव गायकवाड उपस्थित होते.
गेल्या ७२ वर्षांपैकी ६० वर्षे कॉँग्रेसने सत्ता भोगली. परंतु, जनता आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून त्यांनी केवळ जातीयतेचे विष पेरले. सत्ता व मतांसाठी दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकणारा नव्हे, तर दहशतवाद मुळापासून नष्ट करून देश आणि शेतकरी समृध्द बनविणारा, नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रधानमंत्री देशाला द्या, असे आवाहन गडकरी यांनी केले.
गडकरी म्हणाले की, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल तयार करण्याची योजना आणली आहे. ऊस दरासाठी आंदोलन करणाºया खा. राजू शेट्टी यांना याबाबत समजावून सांगितले. परंतु, ते ऊस व अतिरिक्त साखरेचा प्रश्न समजून न घेताच, एकतर्फी आंदोलन करतात.
खा. पाटील, अशोकराव गायकवाड, संजय विभुते यांचीही भाषणे झाली. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती मनीषा बागल, मकरंद देशपांडे, अनिल म. बाबर, शंकर मोहिते, अमोल बाबर, राजाराम गरूड उपस्थित होते.
दादांच्या नातवाकडून स्वाभिमान गहाण
भाजप सरकारचे लाभार्थी आम्हाला कधीही विसरणार नाहीत. न्यायालयात टिकणारे मराठा आरक्षण, आर्थिक मागास आरक्षण असे ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतले. वसंतदादांचा वारसा सांगणाºया त्यांच्या नातवाने स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण ठेवला, अशी टीका विशाल पाटील यांच्यावर, तर मुख्यमंत्र्यांनी जिवापाड प्रेम करूनही वेगळा पवित्रा घेतल्याची टीका गोपीचंद पडळकर यांच्यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Web Title: Congress-Nationalist Monument of Lok Sabha Election 2019 Incomplete Irrigation Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.