सांगलीत मतदानादिवशी सराफ पेठ दुपारपर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:51 PM2019-04-22T14:51:08+5:302019-04-22T14:52:29+5:30

लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यादिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत सराफ पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा सराफ समितीचे सचिव पंढरीनाथ माने व सराफ असोसिएशनचे सचिव राहुल आरवाडे यांनी दिली.

Closed till noon in Sangli on the day of Sarli Peth | सांगलीत मतदानादिवशी सराफ पेठ दुपारपर्यंत बंद

सांगलीत मतदानादिवशी सराफ पेठ दुपारपर्यंत बंद

Next
ठळक मुद्देसांगलीत मतदानादिवशी सराफ पेठ दुपारपर्यंत बंदसांगली जिल्हा सराफ समितीची माहिती

सांगली : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. यादिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत सराफ पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा सराफ समितीचे सचिव पंढरीनाथ माने व सराफ असोसिएशनचे सचिव राहुल आरवाडे यांनी दिली.

सांगली जिल्ह्यात सराफ, सुवर्णकार, गलाई बांधव, बंगाली कारगीर, सेल्समन, सेल्सगर्ल अशा सर्वांचे मिळून पंधरा ते वीस हजार मतदान आहे. या सर्वांना मतदान प्रक्रियेत भाग घेता यावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व सराफ, सुवर्णकार, बंगाली कारागीर, गलाई बांधव यांची दुकाने दुपारी तीन वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय समिती व असोसिएशनने घेतला आहे.

मतदान हा भारतीयांचा अधिकार असून तो बजावला पाहिजे. प्रशासकीय स्तरावरही मतदान वाढावे म्हणून प्रयत्न सुरू आहेत. त्याच दृष्टीकोनातून संघटनेने हा निर्णय घेतला असल्याचे माने व आरवाडे यांनी सांगितले.

Web Title: Closed till noon in Sangli on the day of Sarli Peth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.