शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीत आंबेडकर जयंती साजरी - संभाजीराव भिडेंकडून अभिवादन , कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 07:29 PM2018-04-14T19:29:14+5:302018-04-14T19:29:14+5:30

 Celebration of Ambedkar Jayanti by Shiva Pratishthan - greetings from Sambhaji Rao Bhide, Big presence of party workers | शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीत आंबेडकर जयंती साजरी - संभाजीराव भिडेंकडून अभिवादन , कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीत आंबेडकर जयंती साजरी - संभाजीराव भिडेंकडून अभिवादन , कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती

googlenewsNext
ठळक मुद्देस्टेजवर भगवान गौतम बुद्ध, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापरिसरातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले

सांगली : श्री शिवप्रतिष्ठानतर्फे सांगलीच्या वसंतदादा कारखान्याजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

संभाजीराव भिडे यांच्याहस्ते आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर अभिवादन करण्यात आले. वसंतदादा कारखाना परिसरातील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम पार पडला. आंबेडकर जयंतीनिमित्त याठिकाणी मोठे स्टेज उभारून आरास करण्यात आली होती. स्टेजवर भगवान गौतम बुद्ध, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा ठेवण्यात आल्या होत्या. या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नितीन चौगुले, येथील मंडळाचे अध्यक्ष मुकेश लोखंडे, समाधान साळवे, सचिन कांबळे, वैभव मलमे, सचिन बाजंत्री, संजय खोत, अक्षय पाटील, प्रतीक पाटील, रवी गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title:  Celebration of Ambedkar Jayanti by Shiva Pratishthan - greetings from Sambhaji Rao Bhide, Big presence of party workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.