विश्रामबागच्या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात-कोठडीत मारले, आंबोलीत जाळले--अनिकेत कोथळेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 07:25 PM2017-11-20T19:25:31+5:302017-11-20T20:35:03+5:30

सांगली : पोलिस ठाण्यातील‘थर्ड डिग्री’त अनिकेत कोथळेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या पथकाने त्याचा मृतदेह विश्रामबाग परिसरातील रुग्णालयात नेल्याचे स्पष्ट झाले आहे.

CCTV footage of Vishrambaug hospital shot dead in Amtali - Aniket Kothale dies | विश्रामबागच्या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात-कोठडीत मारले, आंबोलीत जाळले--अनिकेत कोथळेचा मृत्यू

विश्रामबागच्या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात-कोठडीत मारले, आंबोलीत जाळले--अनिकेत कोथळेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देडॉक्टरची चौकशी : कामटेच्या सांगण्यावरून पोलिस ठाण्यातील फुटेज नष्टबहुतांश पोलिसांना सीआयडीने चौकशीसाठी पाचारण करुन कसून चौकशी

सांगली : पोलिस ठाण्यातील‘थर्ड डिग्री’त अनिकेत कोथळेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेच्या पथकाने त्याचा मृतदेह विश्रामबाग परिसरातील रुग्णालयात नेल्याचे स्पष्ट झाले आहे. या रुग्णालयातील सीसीटीव्हीफुटेज सीआयडीने सोमवारी ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमधील अनिकेतच्या खुनावेळचे फुटेज कामटेच्या सांगण्यावरून नष्ट केल्याची कबुली ताब्यात घेतलेल्या सीसीटीव्ही तंत्रज्ञाने दिली आहे.

सांगली शहर पोलिसांनी ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळे व अमोल भंडारे या दोघांना लुटमारीच्या गुन्'ात अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी अनिकेतला ‘थर्ड डिग्री’चा वापर करून बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. ही घटना डीबी रूममध्ये घडली होती. या रूममध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयात ही घटना चित्रीत झाली होती. प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कामटेने शहरातील ओळखीच्या सीसीटीव्ही तंत्रज्ञाला बोलावून घेतले होते. कामटेने सीसीटीव्हीमध्ये डाटा खूप झाला असून, तो नष्ट करायचा आहे, असे सांगितले. त्यानुसार या तंत्रज्ञाने मंगळवारी पहाटेपर्यंतचे सर्व फुटेज नष्ट केले. पण या तंत्रज्ञास कामटेने केलेल्या कृत्याची काहीच माहिती नव्हती. सीआयडीने चौकशीसाठी पाचारण केल्यानंतर त्याला हा प्रकार समजला.

सीआयडीने त्याचा जबाब घेऊन सोडून दिले आहे.अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर युवराज कामटे, अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झाकीर पट्टेवाले यांनी बेकर मोबाईल गाडीचा चालक राहुल शिंगटे यास बोलावून घेतले. अनिकेत बेशुद्ध पडला असून, त्याला रुग्णालयात न्यायचे आहे, असे शिंगटेला सांगितले. शिंगटेने बेकर मोबाईल गाडी काढली. डीबी रूममधून अनिकेतचा मृतदेह काढून तो गाडीत घातला. प्रथम गाडी शासकीय रुग्णालयापर्यंत नेली. तिथे गेल्यानंतर कामटेने शिंगटेला हा प्रकार सांगितला. शासकीय रुग्णालयात गेलो तर अडचणीत येऊ, असा विचार करून त्यांनी विश्रामबाग परिसरातील खासगी रुग्णालयाकडे गाडी नेली. या रुग्णालयात प्रमुख डॉक्टर नव्हते. त्यांच्या मदतनीस डॉक्टरला कामटेने बाहेर बोलावून घेतले. डॉक्टरने पोलिस गाडीतच अनिकेतची तपासणी केली. डॉक्टरने अनिकेत मृत झाल्याचे सांगितले. हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे प्रमाणपत्र दविश्रामबागच्या रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात

 हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याने त्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे.
)ेण्यासासाठी कामटेने डॉक्टरला गळ घातली होती. परंतु या डॉक्टरने नकार दिला, अशी माहितीही चौकशीतून पुढे आली आहे. हा सर्व प्रकार रुग्णालयाच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाल्याने त्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे.

आज न्यायालयात नेणार
युवराज कामटेसह सहाजणांच्या पोलिस कोठडीची मंगळवारी मुदत संपणार आहे. तपास अजून अपूर्ण असल्याने आणखी किमान तीन दिवसांची पोलिस कोठडी द्यावी, अशी न्यायालयात मागणी करणार असल्याचे सीआयडीचे अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले. कामटेसह सर्वांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. पण मूळ घटनेविषयी त्यांनी काहीही सांगितले नाही, असेही गायकवाड यांनी सांगितले.
पोलिसही साक्षीदार
युवराज कामटे आणि पथकाच्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह पोलिस ठाण्यातून बाहेर काढताना ड्युटीवरील अनेक पोलिसांनी पाहिले आहे. यातील बहुतांश पोलिसांना सीआयडीने चौकशीसाठी पाचारण करुन कसून चौकशी केली आहे. यातील काहीजण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार झाले आहेत. सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र शेळके रजेवर होते. त्यामुळे ठाण्याचा कार्यभार उपनिरीक्षक संतोष चव्हाण यांच्याकडे होता. त्यांच्याकडेही सीआयडीने चौकशी केली.

 

Web Title: CCTV footage of Vishrambaug hospital shot dead in Amtali - Aniket Kothale dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.