भीमा कोरेगाव घटना : सांगलीमध्ये कडकडीत बंद

By ऑनलाइन लोकमत on Wed, January 03, 2018 3:17pm

सांगली, मिरजेसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

सांगली -  सांगली, मिरजेसह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यामुळे एसटी बस सेवा ठप्प आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. 

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरू आहेत. परिणामी विटा बस स्थानकात शुकशुकाट असून  एसटीच्या लोकल व लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.   पेठ -शिराळा राज्य महामार्गावर रेठरे धरण येथे युवकांनी टायर पेटवून सुमारे अर्धा तास रास्ता रोको केला.  

 

सांगली कडून आणखी

नागपूर मेट्रोरिजन मधील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कारवाईला स्थगिती
भारनियमनाच्या वेळेत बदल
अंतर्गत सुरक्षाव्यवस्थेबाबत सरसंघचालकांचे ‘बौद्धिक’
संपकाळातील तीन दिवसाचे वेतन मिळणार
शहरवासीयांची तहान भागविणार पुजारीटोला

आणखी वाचा