कुपवाडला मातब्बरांची अस्तित्वासाठी लढाई : बहुरंगी लढती शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 11:14 PM2018-03-23T23:14:08+5:302018-03-23T23:14:08+5:30

कुपवाड : महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेत कुपवाड शहर व उपनगरांची तोडफोड करण्यात आली आहे. येथे एक, दोन, आठ आणि एकोणीस असे प्रभाग पडले आहेत.

Battle for the existence of Kupwada Matbbar: Multicolour fight possible | कुपवाडला मातब्बरांची अस्तित्वासाठी लढाई : बहुरंगी लढती शक्य

कुपवाडला मातब्बरांची अस्तित्वासाठी लढाई : बहुरंगी लढती शक्य

Next
ठळक मुद्देनव्यांसाठी तारेवरची कसरत

महालिंग सलगर।
कुपवाड : महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेत कुपवाड शहर व उपनगरांची तोडफोड करण्यात आली आहे. येथे एक, दोन, आठ आणि एकोणीस असे प्रभाग पडले आहेत. त्यामुळे ठराविक पक्षाचे प्राबल्य असलेल्या या शहरात आता पक्षांची पकड ढिली झाली असून बहुरंगी लढती पाहावयास मिळणार आहेत.

शहरात आता आजी-माजी मातब्बर नगरसेवकांचे अस्तित्व पणाला लागणार असून नव्यांसाठी तर ही तारेवरची कसरत ठरणार आहे.महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण व प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ही रचना शहरातील काही नगरसेवकांना अडचणीची ठरली आहे, तर काहींना सोयीची झाली आहे. त्यानुसार काहींनी बैठका घेण्यास सुरूवात केली असून, राजकीय डावपेच आखण्यास सुरूवात केली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, जनता दल, आम आदमी पार्टी आणि सुधार समितीही रणांगणात उतरणार आहे.शहरातील माजी उपमहापौर प्रशांत पाटील, विद्यमान उपमहापौर विजय घाडगे, निर्मला जगदाळे यांचा एकत्र मिळून प्रभाग एक तयार झाला असून यामधून ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत, विजय घाडगे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश ढंग, प्रशांत पाटील, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, मोहन जाधव, किरण सूर्यवंशी, जमीर रंगरेज, रवींद्र सदामते, अरूण रूपनर, अरविंद सकट, सुलोचना धनपाल खोत, निर्मला जगदाळे, रईसा मुश्ताकअली रंगरेज, साजीद मुजावर, सचिन चोपडे, विश्वजित पाटील निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

धनपाल खोत, शेडजी मोहिते, सुरेखा कांबळे यांचे प्रभाग एकत्र होऊन प्रभाग दोन तयार करण्यात आला असून या प्रभागातूनही धनपाल खोत, नगरसेवक गजानन मगदूम, भाजपचे जिल्हा सरचिटणीस प्रकाश ढंग, माजी उपनगराध्यक्ष कुमार पाटील, सविता शेडजी मोहिते, भाग्यश्री बाळासाहेब माने, वंदना सायमोते, सुरेखा कांबळे, वहिदा नायकवडी, प्रकाश व्हनकडे, तानाजी व्हनकडे इच्छुक आहेत.

राष्टÑवादीचे नगरसेवक विष्णू माने, धनपाल खोत, स्रेहा औंधकर यांचा एकत्र मिळून प्रभाग आठ तयार झाला असून या प्रभागातून विष्णू माने, भाजपचे विशाल मोरे, सदा पाटील, मोहनसिंग रजपूत, जनता दलाचे संजय पाटील, अश्विन पाटील, कल्पना कोळेकर, स्रेहा औंधकर, शिवसेनेचे अनिल माने यांच्यासह अनेकजण तयारीत आहेत.

नगरसेवक युवराज गायकवाड, प्रियांका बंडगर, संगीता खोत यांचा एकत्र मिळून तयार झालेल्या प्रभाग एकोणीसमधून युवराज गायकवाड, प्रियांका बंडगर, भाजपचे संजय कुलकर्णी, विनायक सिंहासने, महेश कर्णे, अनिता आलदर, वर्षा संभाजी सलगर इच्छुक आहेत. त्यामुळे कुपवाडमध्ये यंदा बहुरंगी लढती पाहायला मिळतील.

नवखे : अस्वस्थ...
शहरातील ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत प्रभाग एक व दोनमधून चाचपणी करीत आहेत. विष्णू माने यांनीही आठमधून तयारी केली असून, दोनमधून भावाच्या पत्नीला तर शेडजी मोहिते यांनी एकमधून तयारी करून दोनमधून पत्नीस उमेदवारीसाठी तयारी केली आहे. त्यामुळे नव्याने इच्छुक असलेले उमेदवार अस्वस्थ आहेत.

पती-पत्नी मैदानात!
ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत व त्यांच्या पत्नी सुलोचना खोत नेहमीच रणांगणात असतात. त्याप्रमाणे यंदा शेडजी मोहिते यांनीही त्यांच्या पत्नीस प्रभाग दोनमधून उमेदवारीसाठी तयारी सुरू केली आहे. या पती-पत्नीच्या निवडणूक तयारीची चर्चा शहरात जोरदार सुरू आहे.

कुपवाड पॅटर्नची चर्चा
मिरजेतील नगरसेवक ज्याप्रमाणे अंतर्गत समझोता करून निवडणूक लढवितात, त्याप्रमाणे कुपवाडमधील इच्छुकही मिरज पॅटर्न येथे राबविण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी गुरूवारी रात्री शहरातील लाडले मशायक दर्ग्यामध्ये बैठक पार पडली असून, बरेचजण एकमेकांच्या संपर्कात आहेत.

Web Title: Battle for the existence of Kupwada Matbbar: Multicolour fight possible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.