आटपाडी तालुक्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले-वर्षभरातील स्थिती : १९ टक्के गुन्ह्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 11:42 PM2019-01-09T23:42:43+5:302019-01-09T23:43:14+5:30

तालुक्यात महिला व मुलींवरील आत्याचार व विनयभंगाच्या घटनांचा आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण गुन्ह्यांमध्ये महिलांविषयक गुन्ह्यांचे प्रमाण १९ टक्क्यांवर गेले आहे. २0१७ च्या

Atpadi taluka raises the number of crimes against women- Status in the year: 19% of the crime records | आटपाडी तालुक्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले-वर्षभरातील स्थिती : १९ टक्के गुन्ह्यांची नोंद

आटपाडी तालुक्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले-वर्षभरातील स्थिती : १९ टक्के गुन्ह्यांची नोंद

googlenewsNext
ठळक मुद्देगतवर्षाच्या तुलनेतही गुन्ह्यांचा आलेख वाढल्याने पोलीस प्रशासनासमोर चिंता

अविनाश बाड ।
आटपाडी : तालुक्यात महिला व मुलींवरील आत्याचार व विनयभंगाच्या घटनांचा आलेख वाढत आहे. गेल्या वर्षभरात एकूण गुन्ह्यांमध्ये महिलांविषयक गुन्ह्यांचे प्रमाण १९ टक्क्यांवर गेले आहे. २0१७ च्या तुलनेत ही आकडेवारीही वाढल्याचे दिसत आहे. वर्षात दर ४ ते ५ दिवसांतून एका निर्भयाला पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागत आहे.

आटपाडी पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये एकूण ३८९ गुन्हे दाखल झाले. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, चोरी, जबरी चोरी असे सगळे गुन्हे नोंदविण्यात आले. पण यामध्ये ७४ गुन्हे हे केवळ महिला आणि मुलींवरील अत्याचाराचे दाखल झाले आहेत. २०१७ या वर्षाच्या तुलनेत २०१८ या एका वर्षात तालुक्यात महिला आणि मुलींच्या बाबतीतील गुन्ह्यांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. ही संख्या केवळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या घटनांची आहे. अब्रू वेशीवर टांगायला नको, गरिबी आणि पुढाऱ्यांनी मिटविलेल्या प्रकरणांचा आकडा खूपच मोठा असण्याची शक्यता आहे.

दि. ३ जानेवारी २०१८ रोजी गळवेवाडी येथील प्रतीक्षा या ८ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार करून केलेल्या तिच्या खुनाची घटना राज्यभर गाजली.तालुक्यात गेल्यावर्षी विवाहित महिलांसह अल्पवयीन मुलींचे अपहरणाचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ८ वी ते १० वीच्या आणि महाविद्यालयातील युवतींवरील अत्याचाराचे प्रमाण अधिक आहे. महिलांच्या तुलनेत अल्पवयीन मुलींवर होणाºया अत्याचाराचे प्रमाण या वर्षभरात कमालीचे वाढले आहे.

पोलिसांचे लॉजवरील कारवाईकडे दुर्लक्ष!
आटपाडी तालुक्यात लॉजची संख्या वाढली आहे. इयत्ता १० वीत शिकणाºया मुलीला शाळेच्या गणवेशात घेऊन आलेल्या नराधमाला दिघंचीत लॉजमध्ये सकाळी ११ वाजता खोली देण्यात आली. त्यामुळे तिथे त्या मुलीवर अत्याचार झाला. आटपाडीतल्या अनेक लॉजवर पोलिसांनी पाळत ठेवून कारवाई केली, तर अनेक घटना रोखल्या जाऊ शकतात. प्रत्यक्षात लॉजवर पोलिसांचे नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच गुन्हे करणाºयांना लॉजची सुरक्षितता वाटू लागली आहे.
 

आटपाडी तालुक्यात महिला आणि बालकांच्या, अल्पवयीन मुलींच्या लैंगिक गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. या नवीन वर्षात असे गुन्हे घडू नयेत यासाठी शाळा-महाविद्यालयांत आम्ही प्रबोधन करीत आहोत. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देऊन, प्रबोधन करीत आहोत.
- आप्पासाहेब कोळी, पोलीस निरीक्षक, आटपाडी


समाजाचा स्तर खालावत चालला आहे. मुलांवर होणारे संस्कार महत्त्वाचे आहेत. विचारांची पातळी एवढी खालावली आहे की, मुलींचे वयही नराधम पाहत नाहीत. आई-वडिलांनी मुलांना काय-काय खबरदारी घ्यायची, हे घरीच सांगितले पाहिजे. मुली गाफील राहिल्या, तर हे प्रमाण वाढतच जाईल.
- अ‍ॅड. अनघा कुलकर्णी, अध्यक्षा, महिला संरक्षण समिती, आटपाडी

Web Title: Atpadi taluka raises the number of crimes against women- Status in the year: 19% of the crime records

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.