आटपाडी २३ वेळा दुष्काळाच्या फेऱ्यात; निसर्गाच्या सततच्या अवकृपेने दुष्काळग्रस्त हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 11:47 PM2019-07-22T23:47:42+5:302019-07-22T23:53:10+5:30

माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे.

Atapadi 3 times during drought cycle | आटपाडी २३ वेळा दुष्काळाच्या फेऱ्यात; निसर्गाच्या सततच्या अवकृपेने दुष्काळग्रस्त हैराण

तालुक्यातील माण नदीचे ऐन पावसाळ्यातील हे कोरडेपण दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे.

googlenewsNext
ठळक मुद्दे दुष्काळी स्थिती गंभीर : सरासरीइतकाही पाऊस नाही

अविनाश बाड ।

आटपाडी : आटपाडी तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ३५५ मिलिमीटर एवढे आहे. निसर्गाच्या अवकृपेचा कहर म्हणजे, ज्या १९६५ मध्ये आटपाडी तालुक्याची निर्मिती झाली, तेव्हाही दुष्काळ पडला होता. त्यावर्षी ३२६ मि.मी. पाऊस पडला. १९५३ पासून आतापर्यंत एकूण २३ वर्षे तालुक्यात सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. तालुका स्वतंत्र होण्यापूर्वी खानापूर तालुक्यात समावेश होता. आटपाडीच्या पावसाची आकडेवारी १९५३ पासूनची उपलब्ध आहे. त्यामध्ये तालुका वारंवार दुष्काळाला सामोरा गेल्याचे स्पष्ट होते; पण हा भाग काही अलीकडेच दुष्काळाला सामोरा जातोय अशातला भाग नाही.

स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी हा भाग औंध संस्थानचा भाग होता. १९३८ मध्ये लेंगरेवाडी येथे शाळेत शिक्षक म्हणून गेल्यानंतर दुष्काळ पडतो आणि स्थलांतरित झालेल्या रिकाम्या गावातून शिक्षक बाहेर पडतो. माडगूळकरांनी १९५५ मध्ये ‘बनगरवाडी’ ही कादंबरी प्रकाशित केली. आटपाडी तालुक्यातील माडगुळे हे लेखकाचे गाव आणि ज्या गावावरून ही कादंबरी बेतली ते लेंगरेवाडी गाव आजही त्याच अवस्थेत आहे. गेल्या ६५ वर्षांत ८० च्या दशकानंतर तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे प्रमाण खूपच वाढले आहे. १९७२ चा दुष्काळ अनुभवलेल्या आटपाडीकरांना पुढे सतत भंडावून सोडले आहे. १९८१ ते १९९० या दहा वर्षांत तब्बल ६ वर्षे तालुक्यात दुष्काळाने ठाण मांडले. १९८२ ते १९८६ सलग ५ वर्षे ३५५ मि.मी.पेक्षा तालुक्यात कमी पाऊस झाला. १९९० मध्ये आटपाडीत २८६ मि.मी. एवढाच पाऊस झाला. त्यावर्षी खरसुंडीत ४७२ मि.मी. पाऊस झाला.

आकडेवारीच्या सरासरीत त्यावर्षी ३७९ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद असली, तरी त्याचा आटपाडी परिसरावरील दुष्काळाची दाहकता काही कमी होणार नाही. १९९१ ते २००० या दशकात तब्बल ५ वर्षे दुष्काळाची गेली. त्यात १९९१ आणि १९९२ ही सलग दोन वर्षे त्यानंतर एक वर्ष मध्ये गेले की लगेच १९९४ मध्ये सरासरीपेक्षा १११ मि.मी. पाऊस कमी पडला. पुन्हा २ वर्षांनी १९९७ मध्ये व २००० मध्ये दुष्काळी परिस्थितीने लोकांचे हाल केले.

वाळवंटापेक्षा : कमी पाऊस!
अरवली पर्वताने राजस्थानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले आहेत. पश्चिम राजस्थानात थर वाळवंट आहे. तिथले सरासरी पर्जन्यमान त्याच्याहून कमी म्हणजे ३५५ मि.मी. एवढे आहे. फक्त वाळवंटात वर्षभर तापमान अधिक असते. हाच काय तो फरक. पण वाईट म्हणजे आटपाडी तालुक्यात ३५५ मि.मी. एवढाही पाऊस होत नाही. या पावसाच्या नोंदी शासनदरबारी असूनही, २३ वर्षांपैकी फक्त ४ वर्षे टंचाईसदृश स्थिती आणि दुष्काळ जाहीर करण्यात आला.

२००१ ते २०१० या दशकात सलग ६ वर्षे दुष्काळ पडला.

२००१ ते २००६ : पर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. शासनदरबारी फक्त १९७२ आणि २००३ च्या दुष्काळात उपाययोजना करुन त्याची नोंद केली आहे.



 

Web Title: Atapadi 3 times during drought cycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.