लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : भौतिक सुखापेक्षा कोणतीही कलाच जास्त आनंददायी असते. भौतिक सुखाच्या मागे लागत माणूस खºया आनंदापासून दूर गेला आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित विजय कोपकर यांनी सांगलीत व्यक्त केले.
संस्कारभारती या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दोन दिवसाच्या ‘कलादर्पण’ महोत्सवास शनिवारी सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यमंदिरात प्रारंभ झाला. उद्घाटन पं. कोपकर यांच्या हस्ते झाले. यावेळी समारंभाचे स्वागताध्यक्ष डॉ. दयानंद नाईक, संस्कार भारतीचे महामंत्री सतीश कुलकर्णी, सांगली शाखेचे अध्यक्ष डॉ. व्यकंटेश जंबगी, मिलिंंद महाबळ, कार्यक्रम प्रमुख अमित मराठे आदी उपस्थित होते. यावेळी अध्यक्षस्थानी संस्कार भारतीचे पश्चिम प्रांताचे कार्याध्यक्ष शामराव जोशी होते.
कोपकर पुढे म्हणाले, कलाकार होणे, कलेवर प्रेम करणे ही खूप मोठी बाब आहे. संगीत साधनेतून आयुष्याचे सोने होते. कलाकार हा वेगळे आयुष्य जगत असतो. कला ही सर्व विसरण्यासाठी असते. आपण जगत असलेल्या जीवनाच्या पलीकडेही ही कला आपल्याला घेऊन जाते. अन्न, वस्त्र, निवारा यापलीकडे ही कला असते. आज माणूस भौतिक सुखाच्या मागे इतका लागला आहे की, स्वत:हून निर्माण होणाºया आनंदापासून तो बाजूला होत आहेत. स्वत:ला निर्माण करणे ही कला आहे. यासाठी मुलांना कला शिकवा. कलेची साधना करायला लावा, असे आवाहन त्यांनी केले.
शामराव जोशी म्हणाले, संस्कारभारती ही एक राष्टÑसेवा, राष्टÑजागरण आहे. यासाठी संस्कार भारतीने ललित कला हे माध्यम निवडले. ललितकला वाढवणे, मोठी करणे यासाठी संस्कार आणि संस्कृती यांचा समतोल सांभाळत संस्थेने कार्य केले. आज संस्कृती आणि संस्काराचे स्वरुप बदलते आहे. संस्कार भारतीच्या कार्यकर्त्यांनी बदलत्या संस्कृतीत सजग राहणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानाचा वापर करताना थांबायचे कुठे हे समजण्यासाठी अहंकार नसण्याची प्रक्रिया राबवण्याचे काम संस्कार भारती करते.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. दयानंद नाईक यांनी केले. मानपत्राचे वाचन डॉ. नीलिमा लिमये यांनी केले. आभार डॉ. व्यंकटेश जंबगी यांनी मानले. संयोजन भालचंद्र चितळे, संतोष बापट, भालचंद्र लिमये, तुषार पतंगे, सागर सगरे, इश्वर रायण्णावार, शुभदा पाटणकर, स्वप्नील देशपांडे, वैशंपायन आदींनी केले होते.
मंजुषा कुलकर्णी, मिलिंद कुलकर्णी यांना पुरस्कार
सोहळ्यात इंदिराबाई खाडिलकर स्मृतिप्रीत्यर्थ गुरवर्य मटंगेबुवा पुरस्कार शास्त्रीय गायिका मंजुषा कुलकर्णी, सारंगीवादक पै. महंमदहनीफ मुल्ला स्मृतिप्रीत्यर्थ साथीदार पुरस्कार प्रसिध्द हार्मोनियम वादक मिलिंंद कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी संस्कार भारतीच्या २५ वर्षाच्या वाटचालीत ज्या माजी पदाधिकाºयांचे योगदान आहे, अशा डॉ. प्रसाद केळकर, डी. टी. माळी, मोहन पतंगे, मुकुंद पटवर्धन, विसुभाऊ कुलकर्णी, विशाल वाड्ये आदींचा सन्मान करण्यात आला.