सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 06:08 PM2019-05-21T18:08:57+5:302019-05-21T18:10:44+5:30

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची मतमोजणी, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 3 जून 2019 अखेर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

Apply restrictive orders in Sangli district | सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागूमतमोजणीच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 ची मतमोजणी, विविध आंदोलने, आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दिनांक 3 जून 2019 अखेर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, काठ्या अथवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई केली आहे. कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक द्रव्य बरोबर नेणे, दगड अगर इतर अस्त्रे किंवा शस्त्रे किंवा सोडावयाची शस्त्रे अगर फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे आणि तयार करण्यास मनाई केली आहे.

मनुष्य अगर प्रेत अगर त्याच्या प्रतिमा अगर आकृती यांचे प्रदर्शन करणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, अर्वाच्य गाणी गाणे, वाद्ये वाजविणे, नकला निदर्शने करणे, ज्याच्या योगाने वरील ठिकाणी शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे, फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे. जिल्ह्यात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे.

हा आदेश कायदेशिर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी व धार्मिक विधी यांना लागू राहणार नाही. हा आदेश दिनांक 20 मे 2019 रोजीच्या 10.00 वाजल्यापासून लागू झाला असून तो दिनांक 3 जून 2019 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.

मतमोजणीच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

 सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी दिनांक 23 एप्रिल 2019 रोजी मतदान झाले आहे. या मतदानाची मतमोजणी दिनांक 23 मे 2019 रोजी सेन्ट्रल वेअर हौसिंग कॉर्पोरेशन, मिरज येथे होणार आहे. मतमोजणीची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी याकरीता प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्ह्यातील सेन्ट्रल वेअर हौसिंग कॉर्पोरेशन, मिरज इमारतीपासून 200 मिटर सभोवतालच्या परिसरात मनाई आदेश जारी केला आहे.

या आदेशानुसार दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटा-गटाने फिरण्यास मनाई करण्यात आली आहे. एकत्रित गटागटाने फिरणे व उभा राहण्यास मनाई करण्यात आली आहे. झेरॉक्स मशिन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक या संदर्भात कोणत्याही गैरप्रकारासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रात परवानगी शिवाय मोबाईल, पेजर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दिनांक 23 मे 2019 रोजीचे सकाळी 06.00 वाजल्यापासून ते मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील.
 

 

Web Title: Apply restrictive orders in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.