वसंतदादा कारखान्याच्या जमीन लिलावातून ५.८७ कोटी वसूल, तहसीलदारांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:49 PM2018-08-30T23:49:27+5:302018-08-30T23:50:38+5:30

विक्रीकर व कामगारांच्या देय असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या दोन जमिनींचा लिलाव करण्यात आला आहे.

5.87 crore from land of Vasantdada factory land, Tahsildar gets action: sales tax, workers get money | वसंतदादा कारखान्याच्या जमीन लिलावातून ५.८७ कोटी वसूल, तहसीलदारांची कारवाई

वसंतदादा कारखान्याच्या जमीन लिलावातून ५.८७ कोटी वसूल, तहसीलदारांची कारवाई

Next
ठळक मुद्दे विक्रीकर, कामगारांची रक्कम मिळणार

मिरज : विक्रीकर व कामगारांच्या देय असलेल्या ५२ कोटी रुपयांच्या थकबाकी वसुलीसाठी सांगलीतील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मालकीच्या दोन जमिनींचा लिलाव करण्यात आला आहे. कारखान्याच्या जमिनीच्या विक्रीतून ५ कोटी ८७ लाख रुपये वसूल झाले असून, ही रक्कम विक्रीकर विभाग व कामगारांना देण्यात येणार असल्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी गुरुवारी सांगितले.

सांगलीतील वसंतदादा साखर कारखान्याचा सुमारे ५ कोटी रुपये विक्रीकर व ८७ लाख रुपये कामगारांची देणी थकीत असल्याने दोन वर्षांपूर्वी महसूल वसुली प्रक्रिया सुरू करून कारखान्याच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात आला. मालमत्ता जप्तीच्या तीन नोटिसा बजावल्यानंतही थकबाकीची रक्कम वसूल झाली नसल्याने कारखाना मालमत्तेच्या सात-बारा उताऱ्यावर शासनाची नोंद करण्यात आली.

कारखान्याच्या माधवनगर (ता. मिरज) येथील ५६ गुंठे व ४० गुंठे जमिनीचा लिलाव करण्यात आला. मात्र खरेदीदारांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने लिलावाची प्रक्रिया गेले वर्षभर सुरू होती. अखेर ५६ गुंठे जमिनीची ५ कोटी रुपयांना व ४० गुंठे जमिनीची ८७ लाख रुपयांना विक्री झाली असून, खरेदीदाराने ही रक्कम जमा केली आहे.

साखर कारखान्याच्या मालमत्तेच्या लिलावाद्वारे ५ कोटी ८७ लाख रुपये वसूल झाले असल्याने महसूल वसूल प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र २०१३ व २०१४ च्या उसाचे बिल ४६ कोटी ३९ लाख रुपये व इतर थकीत देणी शेतकºयांना मिळालेली नसल्याने साखर आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव व वसुली प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही.

' शेतकºयांचे पैसे दिले
आतापर्यंत थकबाकीपैकी ९० टक्के शेतकºयांची देणी दिली असल्याने महसूल वसुली प्रक्रिया रद्द करण्याची मागणी कारखान्याच्या व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

Web Title: 5.87 crore from land of Vasantdada factory land, Tahsildar gets action: sales tax, workers get money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.