ठळक मुद्देसांगली लोकसभा मतदारसंघासाठी ११ वाजेपर्यंत २0 टक्के मतदान अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद, पुन्हा सुरु,

सांगली : सांगली लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली असून या मतदान केंद्रावर महिला मतदार यांच्या रांगा लागल्या आहेत. जिल्ह्यात 3 वाजेपर्यंत ४६.८४ टक्के इतके मतदान झाले.

सांगली लोकसभा मतदार संघ 3 वाजेपर्यंत 
 281 मिरज 45.85 
 282 सांगली 48.85
285 पलूस 48.76
286 खानापू 46.27                  
287 तासगाव कवठेमहांकाळ 46.76                            
288 जत 44.58                  

एकुण ४६.८४ टक्के मतदान

 

सांगली लोकसभा मतदार संघ जिल्ह्यात १ वाजेपर्यंत ३४. २५ टक्के इतके मतदान झाले.

 •  281 मिरज 33.18 टक्के
 • 282 सांगली 36.87  टक्के
 •  285 पलूस 36.34  टक्के
 • 286 खानापूर34.31 टक्के                  
 • 287 तासगाव कवठेमहांकाळ 31.95 टक्के
 • 288 जत 32.89 टक्के
 • इस्लामपूर ३५.७८ टक्के
 • एकुण ३४. २५  टक्केजिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १९.६८ टक्के इतके मतदान झाले. आज सकाळी सांगली कुंभार खिंड परिसरातील मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली होती. सकाळी ९ वाजेपर्यंत मतदान टक्केवारी ६.७१ टक्के इतकी होती. इस्लामपूर मतदार संघात सकाळी ९ पर्यंत ७.३१ टक्के मतदान झाले. यामध्ये १३७३९ पुरुषांनी तर ५९३७ महिलांनी मतदान केले. सकाळी सर्वच केंद्रांवर मोठी गर्दी होती. सरासरी १६ ते १८ टक्के मतदान १0 वाजेपर्यंत झाले. सांगलीत सकाळी ८ पर्यंत वसंतदादा कारखाना परिसरात ४ टक्के मतदान झाले होते. पलूस -कडेगाव मतदारसंघात सकाळी ९ पर्यंत ६ टक्के तर ११ वाजेपर्यंत १३ टक्के मतदान झाले. म्हैसाळ मध्ये आतापर्यंत २५६९ जणानी मतदानाचा हक्क बजावला.


शेतमजूर तरुणांनी सकाळी लवकर मतदान केले आणि ते पुन्हा कामावर गेले. विसापूर येथे सकाळपासून मोठ्या प्रमाणात मतदानासाठी केंद्रात गर्दी पाहायला मिळाली यामुळे मतदानाचा टक्का नक्की वाढेल असं सर्वांना वाटतं आहे. उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारी मतदार घराबाहेर येणे टाळत होते.

विविध पक्षाच्या कायकर्त्यांनी मतदारांना नेण्यासाठी गाडीच्या सोय केली होती. तसेच प्रत्येक केंद्रास लागून पाळणाघराचीही सोय केली. यामुळे गर्दीच्या वेळी मातांना पाळणाघरात थांबू मिळणार आहे. कासेगावात सकाळ पासून मतदानास चांगली सुरुवात होती. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मोठी चुरस निर्माण झाली होती. वासुंबे (ता. तासगाव) येथील मतदान केंद्रावर सजावट करण्यात आली होती.

वसगडे, माळवाडी, भिलवडी स्टेशन या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी भेटी देऊन दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांचे पुष्प देऊन स्वागत केले. पेठ ता. वाळवा, सुखवाडी (ता. पलूस) येथे दिव्यांगांनी आपल्या मतदार हक्क बजावला.शिराळा तालुक्याचे पश्चिम विभागात मतदारांची नाराजी दिसून येते. मतदान करायला उत्साह दिसत नाही. धिम्या गतीने मतदान होत आहे. मणदूर, सोनवडे, आरळा येथे अत्यंत संथ गतीने मतदान होत आहे. सकाळी १0 वाजेपर्र्यत मतदार केंद्रावर शुकशुकाट दिसून येत होता.


उमेदवार, नेत्यांनी केले मतदान

आमदार सुधीर गाडगीळ व मंजिरी गाडगीळ यांनी सांगलीतील म. के. आठवले विद्यामंदीर या ठिकाणी रांगेतून मतदानाचा हाक बजावला. महाआघाडीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार, वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी पद्माळे (ता. मिरज) या मूळ गावी मतदान केले. त्यांचे बंधू माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनीही येथे मतदानाचा हक्क बजावला. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी त्यांच्या कोंगनोळी येथील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजविला. सांगलीचे विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी चिंचणी या मूळ गावी रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.कवठेमहांकाळच्या नगराध्यक्षा सविता माने यांनी कवठेमहांकाळ येथे मतदानाचा हक्क बजावला. पेठ ता. वाळवा येथील न्यू इंग्रजी स्कूलमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडीक, त्यांच्या पत्नी तेजस्वी महाडीक तसेच सरपंच मिनाक्षी महाडीक यांनी मतदान केले. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख (भाऊ) यांनी कडेपूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. तासगांव-कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील यांनी अंजनी ता. तासगांव येथे मतदानाचा हक्क बजावला.


पलुस कडेगांव मतदारसंघाचे आमदार डॉ विश्वजीत कदम, स्वप्नांली विश्वजित कदम, विजयमाला पतंगराव कदम आणि जयसिंगराव श्रीपतराव कदम यांनी सोनसळ येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
मिरजेतील करमरकर विद्यालयात आमदार सुरेश खाडे यानी सपत्नीक मतदान केले. आमदार मोहनराव कदम यांनी हणमंतनगर चिंचणी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बाजावला. नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी सहकाऱ्यांसमवेत मतदान केले. माजी महापौर किशोर शहा, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर यांनी बुथ कार्यकर्त्याची भूमिका बजावली.


अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड, पुन्हा सुरळीत

सांगलीतील खणभागातील उर्दु विद्यामंदीरात एक तास ईव्हीएम मशीन बंद होते. तेथे काही काळ गोंधळ निर्माण झाला. खणभागात एक तास ईव्हीएम यंत्र बंद होते. सांगलीतील त्रिकोणी बाग येथील मतदान यंत्र एक तास बंद होते.
गावभागातही मशिन दहा मिनिटे बंद होते. गुजराती हायस्कुलमध्ये मशिन बंद झाल्याने काहीकाळ मतदार संतप्त झाले. त्यामुळे तासभर गोंधळ निर्माण झाला. पर्यायी व्यवस्था नसल्याने सर्वजण ताटकळत राहिले, तेथे पोलिसांनी स्वत:च्या खुर्च्या नगरिकांना दिल्या, तर अनेकजण मतदान न करता परतले.

कसबे डिग्रज मध्ये मतदान केंद्र नं २२७ आणि २२८ येथील मतदान यंत्र सुरवातीस बंद होते. त्यानंतर सुमारे ४५ मिनिटे मतदारांनी प्रतीक्षा केल्यानंतर २२७ वर यंत्र सुरू झाले परंतु २२८ वर यंत्र बदलुन मतदान सुरू झाले.
रेठरे धरण ता वाळवा येथील प्रभाग क्रमांक ४ मधील बूथ क्रमांक १४५ वर सकाळी ९ वाजल्यापासून सर्व तरुण मतदार व पुरुष मतदारांमध्ये उत्साह जाणवत होता, त्यामुळे सकाळी ११ वाजता देखील मतदार केंद्रावर मतदारांनी एकच गर्दी केली होती.

कोटभाग वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर -१ मधील मतदान केंद्र क्रमांक १३२ येथे ईव्हीएम मशीन अर्धा तास बंद पडले होते. नवीन मशीन मागवून मतदान पुन्हा सुरू करण्यात आले. तसेच हुतात्मा चौक जिल्हा परिषद शाळा नंबर -२ मधील मतदान केंद्र क्रमांक १३९ येथे ईव्हीएम मशीन बंद पडले होते, परंतु नंतर पूर्ववत सुरू करण्यात आले.

इस्लामपूर येथील यशवंत हायस्कुलवर दिव्यांग मतदारांनी मतदान केले. शिंग येथे एक तास झाले मशीन बंद होते, त्यामुळे महिला व नागरिकांनी ठाण मांडले. माजी सभापती भारत डुबुले यांनी याप्रकरणी तक्रार केली असून अद्याप मशीन दुरुस्त झालेले नाही. कवठेमहांकाळ तालुक्यात इव्हीम मशीनचा खेळखंडोबा सुरुच होता. देशिंग, इरळी, अलकुड एस, निमज, नांगोळे येथे मशीन बंदच्या तक्रारी आहेत.

येळापुर जिल्हा परिषद शाळा येथील (बूथ केंद्र) क्रमांक १०१ वरील ईव्हीएम मशीन सकाळी ७ ते ७:२५ असे बंद होते.त्यानंतर सुरु झाले आणि मैदानास सुरवात झाली. मात्र यावेळी १०ते १५ एवढेच मतदार हजर होते. ४१ मतदान झाल्यानंतर आणि ५६ मतदान झाल्यानंतर येळापुर जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्र एकुण तीन वेळा बंद पडले. मिरजेत गोल्डन इंग्लिश स्कूल मतदानकेंद्रात मतदान यंत्र बंद पडल्याने एक तासाचा विलंब झाला. याबद्दल माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांची अधिकाऱ्यांना जाब विचारला.

कवठेमहांकाळ इरळी येथे वार्ड क्रमांक १ मध्ये बटण दाबले जात न्हवते. दाबले तर मत कमळाला जात होते. नागरिकांनी याप्रकरणी तक्रार केली, त्यानंतर लगेच मशीन बदलण्यात आले. ओझर्डे ता. वाळवा येथील बूथ क्रमांक २० मधील ईव्हीएम मशीन सुमारे पाऊण तासापासून बंद होते. मतदारांनी या केंद्राकडे पाठ फिरवली.
तासगाव तालुक्यातील हणमंतनगर चिंचणी येथील मतदान केंद्र क्रमांक ११७ येथे ईव्हीएम मशीन बंद पडले. नवीन मशीन जोडून मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. सकाळी ८. १५ ते ९:०० अशी ४५ मिनिटे मतदान प्रक्रिया ठप्प होती. सय्यदवाडी जिल्हा परिषद शाळेतील बूथ (केंद्र) क्रमांक १०३ मधील ईव्हीएम मशीन १८ मतदारांनी मतदान केल्यानंतर सकाळी ८:३० ते ९ पर्यंत बंद पडले होते. गोटखिंडीत सुरळीत मतदान सुरु झाले. अलकुड एस येथे ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याने तासभर मतदान प्रक्रिया ठप्प होती. नाठवडे येथील ईव्हीएम मशीन बंद पडले. पेठभाग वाळवा येथील राजाराम विद्यामंदिर मतदान केंद्र क्रमांक १३१ येथेही ईव्हीएम मशीनचे बटण काम देईना म्हणून मशीन बंद पडले. नवीन मशीन जोडून मतदान पुन्हा सुरू करण्यात आले.

मतदार यादीत चुका

अनेक ठिकाणी मतदार यादीतुन चुका, पहिल्या बुथमधून दुसऱ्या बुथमध्ये नांवाचा समावेश असणे, हयात मतदारांचे फोटोऐवजी मयताचे फोटो अशा अनेक चुका आढळल्या. त्यामुळे सत्यता तपासणे, चौकशी करण्यासाठी मतदारांना वेळ देण्यात आला. सांगलीत मटण मार्केटमध्ये विनापरवाना बुथमधील स्लिप जप्त करण्यात आले. तर मतदार यादीचा गोंधळ झाल्याने मतदारांचाही गोंधळ उडाला. गावभागातील लोकांची नावे वारणालीत दिसल्याने गडबड झाली. एमटी सिरीजमधील हजारो नावे यादीतून गायब होती. बºयाच ठिकाणी बॅलेट मशीनवर उमेदवाराचे नावच दिसत नव्हती, तर काही ठिकाणी उमेदवारांची नावे आणि फोटो अस्पष्ट दिसत आहेत, त्यामुळे मतदान करताना वेळ जात आहे.


पत्रकारांना शिवीगाळ, तक्रार दाखल

बिळाशी येथील दैनिक केसरीचे प्रतिनिधी दिनकर झाडे यांना कोकरुड येथे पोलिस अरुण मामलेकर यांनी अरेरावी करुन शिवीगाळ केल्याची घटना घडली. त्यानंतर सर्व दैनिकांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत अरुण मामलेकर याचा निषेध केला आणि


क्रांतीविरांगणेचे सर्व निवडणुकांमध्ये मतदान

९४ वर्षीय क्रांतिविरांगणा हौसाताई पाटील यांनीही जबाबदार मतदार नागरिक म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावला. १९५२ च्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या निवडणुकीपासून ते आजच्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत सर्व निवडणुकांमध्ये त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एेंशी वर्षांच्या दिव्यांग इद्राबाई लोहार यांनी घसरत येऊन मतदानाचा हक्क बजावला.

जयंत पाटील, सदाभाउंनी केले हातकणंगलेसाठी मतदान
 

 1. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील साखराळे येथील बुथ क्रमांक ६३ वर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी त्यांच्या पत्नी शैलजा पाटील पुत्र प्रतीक आणि राजवर्धन यानी मतदान केले. राज्यात मतदारांचा प्रतिसाद पाहता आघाडीला २८ ते ३० जागा मिळतील असे पाटील यांनी स्पष्ट केले.
 2. हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सहकुटुंब मरळनाथपूर ता. वाळवा, जि. सांगली येथे मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी यावेळी शेतकरी, शेतमजूर, युवावर्ग तसेच सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले.

 

सांगली लोकसभा मतदार संघ

 • 281 मिरज 18.48
 • 282 सांगली 20.57  
 • 285 पलूस 21.23  
 • 286 खानापूर 17.45  
 • 287 तासगाव कवठेमहांकाळ 21.08
 • 288 जत 19.30  

एकुण 19.68


 


Web Title: 20 percent polling for Sangli till 11 pm, EVM machine shutdown in many places
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.