#WomensDay2018 : बॉलिवूडचे हे पाच नायिकाप्रधान चित्रपट पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 7:45pm

नायकप्रधान चित्रपटात फक्त डोक्यावर पदर घेऊन वावरणारी महिला पात्रं बदलून आता स्त्री प्रधान ‘नीरजा’सारखे चित्रपट तयार होऊ लागले.

मुंबई : स्वातंत्र्यानंतरच्या सहा दशकांमध्ये भारतीय चित्रपट खूप बदलला. गेल्या 20 वर्षांत तर चित्रपटसृष्टीने कात टाकली आहे. तंत्रज्ञान, विषय आणि आशय या सर्वच बाबींनी भारतीय चित्रपट परिपक्व झालेला दिसून येतोय. शंभर वर्षांपूर्वी भारतात  दादासाहेब फाळकेंना चित्रपटनिर्मिती करताना आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यांनी काढलेले मार्ग पाहताना आज गंमत वाटू शकते, मात्र त्याकाळात स्त्रियांना चूल आणि मूल याबाहेर विचार करण्यास बंधन असल्याने पुरुषांना स्त्री पात्र रंगवण्यावाचून पर्याय नव्हता. काळ जसजसा पुढे सरकला तशी बंधनं सैल झाली किंवा विरोध पत्करुन स्त्रियांनी हिम्मत दाखवली. मात्र अनंत अडचणींना सामोरं जात चित्रपटात लक्षणीय कामगिरी बजावली. नायकप्रधान चित्रपटात फक्त डोक्यावर पदर घेऊन वावरणारी महिला पात्रं बदलून आता स्त्री प्रधान ‘नीरजा’सारखे चित्रपट तयार होऊ लागले. सध्या नायकाइतकंच मानधन नायिकांनाही दिलं जातंय. आज जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री केंद्रीत चित्रपटांचा आढावा घेणार आहे. या चित्रपटामध्ये नायिकांनी त्या भूमिका अजरामर केल्या आहेत. 

१) क्वीन (2014) अभिनेत्री कंगना राणौतच्या कारकिर्दीतील हा सर्वोत्तम चित्रपट मानला जातो. एका लहान कुटूंबातली रानी स्वत:ला कशी बदलवते आणि त्यानंतर तिचं आयुष्य कसं बदलतं हे या चित्रपटात दाखवण्यात आलंय. हा चित्रपट आपल्याला एक सकारात्मक उर्जा आणि ताकद देऊन जातो. आयुष्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनंतर ती परदेशात जाते मात्र तिथून परतणारी रानी खूप वेगळी, स्वतंत्र आणि स्वाभिमानी असते.

२) फॅशन (२०१०) अभिनेत्री प्रियांका चोप्रा, कंगणा राणौत आणि मुग्धा गोडसे यांचा हा मॉडलिंग विश्व दाखवणारा चित्रपट. यात मधुर भांडारकरांनी फॅशन आणि मॉडेलिंग विश्वातील खरी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर हीट ठरलाच 

३) हिरॉईन (२०१२) बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट अपेक्षांना खरा उतरला नाही मात्र करिना कपूरचा ‘हिरॉईन’ चित्रपट तिला एक उत्तम अभिनेत्री म्हणून पुन्हा सिद्ध करून गेला. एक अभिनेत्री बनण्यासाठी तिने केलेला खडतर प्रवास आणि आलेल्या भरघोस यशानंतर तिची झालेली परिस्थिती या चित्रपटाचा विषय आहे. मधुर भांडारकरचा हा सिनेमा पुन्हा फॅशन चित्रपटाची आठवण करून देतो. 

४) कहानी (२०१२) विद्या बालन ही अशी अभिनेत्री आहे जी एकटी संपुर्ण चित्रपट सांभाळते. तिचे अनेक चित्रपट नायिकाप्रधान राहीले आहेत आणि त्यापैकीच एक कहानी. या चित्रपटाच्या पोस्टर आणि प्रोमोमध्ये ती गर्भार दाखवली गेल्याने सर्वांनाच चित्रपटाची उत्सुकता होती. तसंच अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपटगृहात चिकटून ठेवण्यात यशस्वी ठरला.

५) इंग्लिश विंग्लिश (२०१२) श्रीदेवींनी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये बऱ्याच वर्षांनी पुन्हा एन्ट्री केली होती. याचवर्षी विद्या बालनचा कहानी हा नायिकाप्रधान चित्रपटदेखील रिलीज झाला होता. ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात एका गृहिणीचा स्वत:ला सिध्द करण्याचा प्रवास दाखवला आहे. दरम्यान ती एक स्वाभिमानी आणि आत्मविश्वासु स्त्री म्हणून स्वत:ला घडवते.

संबंधित

पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार अक्षय कुमार ? 
Happy Birthday Kajal Aggarwal : काजल अग्रवालला 'या' अभिनेत्याने जबरदस्तीने केलं होतं किस!
अनुष्काचा ओरडा खाणारा तरुण बॉलिवूड कलाकार, शाहरुखसोबत केलंय काम!
बॉलिवूडमधील एका गटाला पंतप्रधानपदी मोदी नकोसे - मधुर भांडारकर
...म्हणून काजोलच्या मुलीला तिचे सिनेमे बघणं आवडत नाही!

सखी कडून आणखी

वयात येणा-या मुलीशी मैत्री करण्याचा सोपा मार्ग
‘गव्हाचा खीच’ नाश्त्याचा एक पौष्टिक प्रकार
उरलेल्या भाताचा चटपटीत प्रकार
आयर्लण्डमधल्या एका चळवळीची गोष्टाण्डमधल्या एका चळवळीची गोष्ट
बांग्लादेश महिला क्रिकेट संघाला टी ट्वेण्टी चॅम्पिअन बनवणार्‍या दोन मुंबईकर मुली

आणखी वाचा