ठळक मुद्देस्त्रीचं व्यक्तीमत्व तिच्या कर्तबगारीने आणि धाडसाने विकसित होतं.आपल्या देशातील अशाच काही कर्तबगार स्त्रिया आहेत ज्यांनी स्वत:ला जागतिक स्तरावर सिध्द केलंय.त्यांनी पुरूषप्रधान संस्कतीमध्ये स्वत:च्या मेहनतीनेआपापल्या व्यावसायिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करून धैर्याने यश प्राप्त केलं आहे.

मुंबई : स्त्रीचं व्यक्तीमत्व तिच्या कर्तबगारीने आणि धाडसाने विकसित होतं. आपल्या देशातील अशाच काही कर्तबगार स्त्रिया आहेत ज्यांनी पुरूषप्रधान संस्कतीमध्येही स्वत:च्या मेहनतीने, चिकाटीने आपापल्या व्यावसायिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करून धैर्याने यश प्राप्त केलं आहे. आज जागतिक महिला दिनानिमित्त जाणून घेऊया यांच्या कर्तृत्वाविषयी-

1) अॅलिस डि. वैद्यन - ( सी.एम.डी. जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) 

अॅलिस यांनी त्यांच्या धाडसी नेतत्वामुळे जीआयसी या कंपनीला उच्च स्थानावर नेऊन ठेवलं आहे. अॅलिस यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं सध्या लक्ष त्यांच्या कंपनीचं वार्षिक उत्पन्न ५०,००,००० कोटी इतकं करण्याकडे आहे. तसंच आणखी मेहनत करून इन्शुरन्स कंपनीमध्ये जीआयसी कंपनीला सर्वात वरचं स्थान मिळवून देण्याची त्यांची इच्छा आहे. 

2) अनिता डोंगरे - ( चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर, हाऊस ऑफ अनिता डोंगरे) 

मराठमोळ्या फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी फॅशनच्या क्षेत्रात स्वत:चं नाव कमावलं आहे. त्यांच्या फॅशनच्या ब्रॅंड्सपैकी 'अॅन्ड' आणि 'ग्लोबल देसी' हे दोन ब्रॅन्ड्स सध्या देशाच्या पन्नासहूनही जास्त शहरात प्रसिद्ध आहेत. तसंच नुकत्याच नावलौखिक मिळवलेल्या 'अनिता डोंगरे ग्लासरूट' या ब्रॅन्डसाठी देशातील कुशल कारागिरांसोबत काम करून विणलेल्या नक्षीकामाचे डिझाईन केलेले कपडे त्यांनी सादर केले होते.  

आणखी वाचा - या ‘5’ गोष्टी ठेवतात स्त्रियांना कायम आनंदी आणि समाधानी

3) अरूंधती भट्टाचार्य - ( माजी अध्यक्षा, स्टेट बॅंक ऑफ इंडिया) 

जगातील सगळ्यात मोठी बँक 'स्टेट बँक ऑफ इंडिया' च्या चेअरपर्सनपदी असणाऱ्या अरूंधती भट्टाचार्य या पहिल्याच महिला आहेत. देशाच्या बॅंकांच्या क्षेत्रातील कर्जे आणि एकूण बचतीमधील दोन तृतियांश वाटा एसबीआयचा आहे. तसेच अरूंधती यांनी एसबीआयला बॅंकिंगच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. चिकाटी आणि धैर्याच्या जोरावर त्यांना अजूनही प्रगती करायची आहे. 

4) लक्ष्मी अग्रवाल ( डायरेक्टर ऑफ छानव फाऊंडेशन, अॅसिड अटॅक विकटिम्स)

लक्ष्मी अग्रवाल यांची एनजीओ अॅसिड हल्ला झालेल्या तरूणींना मदत करते. तसेच हल्ला झालेल्या तरूणींवर उपचार होईपर्यंत त्यांच्या आई वडिलांना किंवा घरातील कोणत्याही सदस्याला राहण्याची परवानगी असते, जेणेकरून इतरही अॅसिड हल्ला झालेल्या तरूणींना आधार वाटू शकेल. विविध कॅम्पेन्सच्या माध्यमातून तरूणींना प्रोत्साहन देऊन त्यांना जगण्याची नवी आशा देण्याचं काम लक्ष्मी अग्रवाल करत आहेत. तसंच सोशल मीडियावरही त्यांच्या एनजीओचे हजारो फॅालोअर्स आहेत. 

५) नीता अंबानी - ( डायरेक्टर रिलायंस इंडस्ट्रिज, चेअरपर्सन रिलायंस फाऊंडेशन) 

रिलायन्स फाऊंडेशन आज कित्येक वर्ष ग्रामीण भागात विकासाच्या योजना राबवतंय. तसंच ग्रामीण भागातील स्त्रीयांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नीता अंबानी ह्या स्वत: गावातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आहेत. तसंच आर्थिक व मानसिक साथ देऊन ग्रामीण भागांचा विकास करण्याचं त्यांचं ध्येय आहे. अनाथ मुलांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा जो काही खर्च येईल तो खर्च नीता अंबानी स्वत:च्या संस्थेमार्फतच करत आहेत.

६) एकता कपूर - ( मॅनेजिंग डिरेक्टर, बालाजी टेलिफिल्म्स) 

एकता कपूर यांनी टेलिव्हिजनच्या क्षेत्रात स्वत:च्या मालिकांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या विषयातून स्वत:ची ओळख निर्माण केली. पारिवारिक मालिकांतून एकता कपूर लोकांच्या घराघरात पोहोचल्या. प्रेक्षकांनी मालिकांतील कलाकारांपेक्षा एकता कपूर यांच्या प्रत्येक मालिकेतून वेगळेपण सिद्द करण्याच्या कर्तुत्वाला पंसती दिली. तसंच याच वर्षी आलेल्या 'एएलटी बालाजी', 'ओवर द टॅाप' सारख्या स्वत:च्या कंपनीतून त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आहे. 

७) फाल्गुनी नायर - ( सीइओ, नायका) 

पूर्वी कोटक कॅपिटलच्या एमडी असलेल्या फाल्गुनी नायर यांनी ऑनलाईन ब्युटी मार्केटमध्ये 'नायका' ब्रॅन्डला उंचीवर नेऊन ठेवलं आहे. नायका ब्युटीची देशात सध्या ५ दुकाने आहेत पण डिसेंबरपर्यंत त्यांची संख्या दहाच्या पुढे जाऊ शकते. तसंच देशात २०१९ पर्यंत ५० च्या वर दुकानांची संख्या करण्याकडे त्यांचा कल आहे. सौंदर्य प्रसाधनांच्या वस्तूंना आजकाल जास्त मागणी असल्याने व महिलांच्या त्वचेची काळजी घेऊन त्याप्रमाणे उत्पादन बनवण्याकडे त्यांचा विश्वास आहे. 

८) गीता वर्मा ( वाईस प्रेसिडेन्ट ऑफ हिंदुस्तान युनिलिवर) 

गीता वर्मा या हिंदुस्तान युनिलिवर कंपनीत २०११ पासून कार्यरत असून या कंपनीतील अन्न विभाग सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. तसंच देशाच्या विविध शहरातील तरूण महिलांना एकत्र करून विविध आजारांचा सामना करणाऱ्या अल्प सुविधा प्राप्त लहान मुलांसाठी निधी गोळा करण्याचं कामही त्या करत आहेत. गीता वर्मा यांनी आपल्या कार्याने सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. 

९) समीना वाझिरल्ली ( एक्झिक्युटिव्ह वाईस चेअरपर्सन ऑफ सिपला) 

सिप्ला सारख्या ड्रग्स आणि मेडिकल क्षेत्रात नाव कमवलेल्या कंपनीच्या उपाध्यक्ष समीना यांनी भविष्यातही कंपनीला बळकट स्थान मिळवून देण्याचं काम केलंय. सिप्ला कंपनीच्या उत्पादनांनी योग्य परवान्यासह वैद्यकीय क्षेत्रात स्वत:ची प्रतिष्ठा जपली आहे. सिप्ला कंपनीच्या उत्पादनांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण करून देणं व स्वबळावर कंपनीला यश मिळवून देण्याचं काम सध्या समीना करत आहेत.  

१०) चंदा कोचर (एम. डी., चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, आयसीआयसीआय बॅंक) 

चंदा कोचर यांच्या बँकिंग क्षेत्रातील यशामुळे त्या सर्वात जास्त ओळखल्या जातात. मेहनत आणि ध्येयाच्या मदतीनेच आपण यशाच्या शिखरावर पोहचू शकतो हे चंदा कोच्चर यांनी सिद्ध केलंय. सलग ५ वर्ष आयसीआयसीआय बँकेला 'बेस्ट रिटेल बँक' पुरस्कार चंदा कोचर यांच्या नेतत्वामध्ये मिळाले. तसंच भारतातीलच नाही तर 'मोस्ट पॉवरफुल वुमन इंटरनॅशनल' च्या यादीतही चंदा कोचर यांचा समावेश आहे.


Web Title: #WomensDay2018 : 10 successful women entrepreneurs in India
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.