Women's Day 2018 : 'या' आहेत जगातील 8 सुंदर आणि उत्तम महिला खेळाडू

By ऑनलाइन लोकमत on Thu, March 08, 2018 5:50pm

या महिला खेळाडू आपल्या खेळासोबतच सौंदर्यामुळेही अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत.

मुंबई : गेल्या काही वर्षात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताच्या महिला खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. परंतु, अजूनही त्यांना हवी तशी संधी, मानसन्मान, प्रतिष्ठा आणि पुरस्कारही मिळत नसल्याचं खेदजनक चित्र आहे. याउलट, अन्य देशांमध्ये महिला खेळाडूंना मिळणाऱ्या सोयी-सुविधा आणि मानसन्मान हेवा वाटावा असाच आहे. त्यामुळेच त्या अनेक खेळांची मैदानं गाजवत देशाचा झेंडा उंचच उंच फडकवत आहेत. अशाच काही यशस्वी महिलांना भेटू या…

1) अॅलिसन स्टोक

पोल वॅाल्ट या खेळातील सर्वात प्रसिद्ध खेळाडू म्हणून अॅलिसनची ओळख आहे. या खेळात विक्रमाची अनेक शिखरं तिनं सर केली आहेत.

2) डॅनिका पॅट्रिक

डॅनिका ही अमेरिकेची कार रेसिंग खेळाची ड्रायव्हर आहे. अमेरिकन ओपन व्हिल रेसिंगच्या इतिहासातील ती सर्वात प्रसिद्ध व यशस्वी महिला आहे. नास्कर नेशनवाईड सिरिजमधील ती पहिला महिला कार ड्रायव्हर होती.

3) लिंडसी वॅार्न

अमेरिकन स्काय रेसरपैकी एक असलेल्या लिंडसीने वर्ल्डकप चॅम्पिअनशिपही जिंकली आहे. २०१० च्या विंटर ऑलिम्पिकमध्ये लिंडसीला सुवर्णपदकही मिळालं आहे. तसंच अमेरिकन स्कायरच्या इतिहासात ती सर्वात यशस्वी महिला म्हणून ओळखली जाते.

4) अॅलेक्स मॉरगन

अॅलेक्स ही अमेरिकेच्या प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. तिने ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलही मिळवलं आहे. २०११ च्या फिफा वुमेन वर्ल्डकपमधील सर्वात तरुण महिला म्हणून अॅलेक्सची ओळख होती.

5) अॅलेन हूग

अॅलेन हूग ही डच देशाची सर्वात प्रसिद्ध हॅाकी खेळाडू आहे. नेदरलॅंडच्या राष्ट्रीय महिला संघांची ती सदस्यही आहे. २००६ च्या महिला हॅाकी संघाला जेतेपद मिळवून देण्यामध्ये अॅलेनचा मोठा हातभार आहे.

6) अॅना इव्हानोविच

जगातील महिला टेनिसपटूंपैकी आठव्या क्रमांकावर असलेल्या अॅनाची प्रसिद्धी खूप आहे. सेरेना विल्यम्सलाही मागे टाकत अॅनाने स्वत:च्या मेहनतीने हे सिद्ध करून दाखवलं आहे.

7) अॅनेसथाशिया अॅशली

अॅनेसथाशिया ही वयाच्या ७ व्या वर्षापासूनच लाटांवरील खेळात तरबेज आहे. अॅनेसला तिच्या कामगिरीमुळे प्रसिद्धी मिळाली व पुरस्कारही मिळाले. अमेरिकेच्या सर्फर चॅम्पिअनशीपमध्येही तिने सहभाग घेतला होता.

8) सोफी हॅार्न

सोफी हॉर्न ही ब्रिटिश गोल्फर आहे. सोफीने मिडलॅंज चॅम्पिअनशिपचं जेतेपदही मिळवलं आहे. तसंच २१ वर्षाखालील गोल्फ चॅम्पिअनशिपचीही ती विजेती होती. तेव्हा तिचं वय फक्त १५ वर्ष होतं.

9) मारिया शारापोव्हा 

मारिया शारापोव्हा ही रशियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. एकेरी प्रकारात मोठ्या कालावधीसाठी ती जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर होती. ३० वर्षीय ही खेळाडू आपल्या खेळासह सौंदर्यामुळे अनेकांची आवडती आहे. ती अनेक मोठ्या नावाजलेल्या ब्रॅन्डची अॅम्बॅसिडर आहे.

10) अॅलाना ब्लॅनचर्ड

ही एक सुंदर अमेरिकन सर्फर आणि मॉडेल आहे. व्यावसायिक जलपटू असल्याने ती अनेक मोठ्या ब्रॅंड्सच्या वेटसुट आणि स्विमसुटसाठी मॉडेलिंगही करते. २००५ साली झालेल्या T&C वुमन्स पाईपलाईन चॅम्पियनशिपमध्ये ती प्रथम आली होती. सोबतच तिने अनेक मोठ्या स्पर्धाही जिंकल्या आहेत.

संबंधित

औरंगाबादच्या रवींद्र पांडे, प्रशांत पवार यांची लेहलडाख मोहीम फत्ते
Fifa World Cup 2018: 'तो' लंडनहून रशियाला आला अन् १३ जणांचे केस कापून गेला!
ऐकावं ते नवलच...दोरीवरुन जाणाऱ्या मोटरसायकलला लोंबकळत केला विवाह
Eng vs Aus : नॉटिंगहॅम वनडेत झाली विक्रमांची बरसात 
ब्रिटनच्या राजघराण्यात पहिल्यांदाच होणार समलैंगिक विवाह

सखी कडून आणखी

वयात येणा-या मुलीशी मैत्री करण्याचा सोपा मार्ग
‘गव्हाचा खीच’ नाश्त्याचा एक पौष्टिक प्रकार
उरलेल्या भाताचा चटपटीत प्रकार
आयर्लण्डमधल्या एका चळवळीची गोष्टाण्डमधल्या एका चळवळीची गोष्ट
बांग्लादेश महिला क्रिकेट संघाला टी ट्वेण्टी चॅम्पिअन बनवणार्‍या दोन मुंबईकर मुली

आणखी वाचा