...का नाही?

By ऑनलाइन लोकमत on Mon, January 01, 2018 4:56pm

पेंग्विन रॅँडम हाउस इंडिया या ख्यातकीर्त प्रकाशन संस्थेने यावर्षीच्या ‘पेंग्विन अ‍ॅन्युअल लेक्चर’चा सन्मान अभिनेत्री प्रियंका चोप्राला दिला. दिल्ली येथे आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात ‘ब्रेकिंग द ग्लास सीलिंग!’ या विषयावर प्रियंकाने केलेल्या भाषणाचा स्वैर, संपादित भावानुवाद

- प्रियंका चोप्रा 

आपण आपल्या स्वप्नांना इतकं घट्ट कवटाळून बसतो, की बदलायला तयारच होत नाही. स्वत:ला थोडंसं सैल सोडा. पर्याय शोधा. तुमच्यासमोर येणाºया संधींना निर्भयपणे सामोरे जा. महत्त्वाकांक्षी असण्यात काहीच गैर नाही. आयुष्यात ‘सबकुछ चाहिए’ अशी वृत्ती असलीतर काय बिघडलं? - थोडासा लोभ हवाच!

सिंड्रेलाची गोष्ट म्हटल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आठवतो तो तिचा काचेचा झगझगीत बूट. पण माझे वडील नेहमी एक वाक्य सांगत, ‘जर तुमच्यामध्ये काचेची भिंत तोडण्याची क्षमता असेल, तर काचेच्या बूटामध्ये आपला पाय कसा बसेल याचा सारखा विचार करण्याची गरजच काय?’ - काचेचा तो बूट म्हणजे सभोवतालच्या सामाजिक चौकटी. अर्थात अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर चौकट मोडून काहीतरी करण्याचा माझा अट्टहास कधीच नव्हता. चौकट मोडून बाहेर पडणं किंवा ‘ब्रेकिंग द ग्लास सीलिंग’ ही कल्पना मला फारशी कधी मानवली नाही. कारण त्यामुळे आपल्या कामाचे सगळे संदर्भच बदलून जातात. सगळी कठोर मेहनत, यश हे सगळं एका ठरावीक चष्म्यातून पाहिलं जातं. आयुष्यातली महत्त्वाकांक्षा काय तर चाकोरी मोडायचीच, असा काही विचार मी केला नव्हता. मी फक्त माझ्या स्वप्नांचा पाठलाग करत होते. केवळ माझ्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटत होते. मला स्वत:ला घडवायचं होतं. माझ्यामधलं सर्वोत्तम बाहेर काढण्याचा माझा प्रयत्न होता. अर्थात, हे सगळं करत असताना मला माझ्या मार्गात येणारे अडथळेही दूर करायचे होते. ‘प्रियंका चोप्रा स्टाइल’मध्ये मी ते केलेही. याचा अर्थ असा नाही की अशा काही चौकटी नसतात, ती काचेची भिंत नसतेच! ती असतेच. आहे. अनेक स्त्री-पुरुष या अदृश्य चौकटीत अडकून पडले आहेत. विशेषत: आपलं घर आणि आपली नोकरी, करिअर सांभाळण्याची कसरत करणाºया स्त्रियांना तर त्याचा अधिक प्रत्यय येतो. आॅक्सफर्डच्या डिक्शनरीमध्ये ‘ग्लास सीलिंग’ या शब्दाचा अर्थ आहे- खासकरून स्त्रिया आणि अल्पसंख्यकांवर परिणाम करणारा व्यावसायिक आयुष्यातील अदृश्य असा अडथळा ज्यामुळे या वर्गाला सामाजिक, व्यावसायिक उतरंडीमध्ये एक विशिष्ट दर्जा गाठण्यासाठी त्रास होतो. काचेचं छत किंवा ग्लास सीलिंगचं हे रूपक स्त्रीवादाचा पुरस्कार करणाºया महिलांनी पहिल्यांदा वापरलं. व्यावसायिक आयुष्यामध्ये पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाºया करिअरिस्ट महिलांच्या संदर्भानं हे रूपक वापरलं गेलं. मी स्वत: एक करिअरिस्ट मुलगी आहे. त्यामुळे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला स्वप्नं कशी जगायची हे सांगू शकते. पितृसत्ताक समाजानं आपल्यावर लादलेली चौकट हेच आपल्या आयुष्याचं सार्थक आहे असं समजण्याची काहीही गरज नसते, हे मी अनुभवलं आहे. - मी इथपर्यंत कशी पोहोचले? नीडर बनले, म्हणून! भीतीला मनाच्या आतल्या कोपºयात ढकलून दिलं आणि मुख्य म्हणजे चुका केल्या! मी परिपूर्ण नाही. कोणीच नसतं. मग ही चौकट मोडायची कशी? त्यासाठी माझ्या अनुभवातून गवसलेल्या १२ गोष्टी सांगते. ‘प्रियंका चोप्रा बनण्याचे हमखास फंडे’ किंवा ‘स्वत:ला सर्वोत्तम बनवण्यासाठी पीसीचा कानमंत्र’ असं काहीही म्हणा तुम्ही याला.. १) तुम्ही एकमेव आहात. म्हणजे तुमच्यासारखं दुसरं कोणीच नाही. तुमची मूल्यं, तुमच्या श्रद्धा, तुमचे गुणावगुण या गोष्टी तुम्हाला घडवत असतात. एकदा तुमच्या ते लक्षात आलं की तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं असलेलं तुमचं अस्तित्व सापडायला मदत होईल. आपण कोण आहोत, हे समजणं हे सर्वांत महत्त्वाचं असतं. बºयाचदा आपण ठरावीक कल्पनांच्या पलीकडे जाऊन स्वप्नंच पाहत नाही. भविष्याचा विचार करतच नाही. कारण आपण बदलांना घाबरतो. जे आपल्या अंगवळणी पडलं आहे त्यातून बाहेर पडायला आपण सहजासहजी तयार होत नाही. दुसरं म्हणजे कधीकधी आपण आपल्या स्वप्नांना इतकं घट्ट कवटाळून ठेवतो, की बदलायला तयारच होत नाही. स्वत:ला थोडंसं सैल सोडा. बदल हीच तर आयुष्यातली निरंतर गोष्ट आहे. २) नव्या अनुभवांना सामोरं जाण्यासाठी तयार राहाणं फार महत्त्वाचं ! त्यासाठी इच्छाशक्ती मदत करते. मला एअरोनॉटिकल इंजिनिअर व्हायचं होतं. आणि आज मी काय आहे? मी अभिनेत्री आहे, गायिका आहे, लेखिका आहे, निर्माती आहे, एक कलाकार आहे. पण हा प्रवास यशाचा झाला कारण मी कायम स्वत:समोर पर्याय ठेवले. ३) तुमच्या स्वप्नांना पंख द्या. तुमच्यासमोर येणाºया संधींना निर्भयपणे सामोरे जा. संधी नेहमीनेहमी चालून येत नाही. आपल्याला हवी असते तेव्हा तर अजिबात मिळत नाही पण जेव्हा एखादी संधी येते, तेव्हा ती संधी आहे हे आपल्याला ओळखता यायला हवं. संधी ओळखणं आणि तिचं सोनं करणं हे आपलं कौशल्य आहे. ३) मी कधीच काही ठरवून, प्लॅन करून केलं नाही. पण कदाचित नशीब मला माझा मार्ग दाखवत होतं. कठोर परिश्रम करून मिळालेल्या संधीचं चीज करणं एवढंच माझ्या हातात होतं. यालाच महत्त्वाकांक्षा म्हणतात. तुम्ही आयुष्यात कोणत्याही टप्प्यावर असा, जोपर्यंत तुम्ही नवीन संधी शोधत नाही तोपर्यंत तुम्ही यशाच्या शिखरावर पोहचू शकत नाही. आणि यशाची आस असणं, महत्त्वाकांक्षी असणं यामध्ये काहीच गैर नाही. हे मी खासकरून मुलींना सांगते. आयुष्यात मला ‘सबकुछ चाहिए’ अशी वृत्ती असली तर काय बिघडलं? दोन्ही हातात लाडू असणं आणि ते खाण्याची तयारी असणं यात काही चूक नाही. ४) काही वर्षांपूर्वी मी डॉन-२ हा चित्रपट केला होता. डॉन-२ची निवड ‘बर्लिन चित्रपट महोत्सवा’साठी झाली. आणि नेमकं त्याचवेळी मला ‘ग्रॅमी’ पुरस्कार सोहळ्याचंही निमंत्रण आलं. दोन्ही कार्यक्रमांमध्ये अंतर होतं एका दिवसाचं. एक कार्यक्र म युरोपमध्ये तर दुसरा अमेरिकेत. माझ्या सगळ्या टीमने मला सांगितलं की, आता तुला दोनपैकी एक पर्याय निवडावा लागेल. पण मी ठरवलं मुंबई ते लंडन, लंडन ते अ‍ॅमस्टरडॅम आणि अ‍ॅमस्टरडॅमहून लॉस एन्जलिस असा प्रवास केला. एवढा प्रवास करूनही मी दोन्ही ठिकाणी छान दिसले. प्रवासाचा शीण लपवण्यासाठी जास्त मेक-अप करावा लागला इतकंच ! हे मी एकदा नाही अनेकदा केलं. हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मी सतत झटले. ‘तुला सगळं काही एकाच वेळी नाही मिळणार’ असं कोणी ऐकवलेलं मला सहनच होत नाही. का नाही? आयुष्यात हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळवण्याचं स्वप्न मी पाहणार आणि ते प्रत्यक्षातही आणणार. थोडासा लोभ, हाव असलीच पाहिजे. ५) आपण काय आणि कसं असावं याचे नियम, चौकटी इतरांनी का आखाव्यात? अर्थात असं बोलणं खूप सोपं असतं; पण स्वत:ची स्वप्नं साकार करण्यासाठी लढणं अवघड, ते लढायला शिका. दुसरं कोणीही तुमच्यासाठी ती लढाई लढणार नाही. मी स्वत: या अनुभवातून गेलेय. ६) कोणतीही तडजोड करू नका. आयुष्य एकाच गोष्टीवर स्थिरावू देऊ नका. अपयश कोणालाच आवडत नाही. पण आयुष्यात कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर अपयश येतंच. तुम्ही ते टाळू शकत नाही. या अपयशातून तुम्ही सावरता कसं हे महत्त्वाचं. आपण आपला जीव, आत्मा ओतून केलेली एखादी गोष्ट, तीच अपयशी ठरल्यावर खूप वाईट वाटतं. पण हे तात्पुरतं असतं. अपयशाकडे दुर्लक्ष करू नका. त्यातून धडा घ्या. ७) आयुष्यात धोका पत्करलाच नाही, तर आयुष्य किती मिळमिळीत होऊन जाईल ! आंधळेपणाने धोका पत्करा असं मी नाही म्हणत. ‘कॅल्क्युलेटेड, एज्युकेटेड रिस्क’ मला अभिप्रेत आहे. कारण आयुष्यात धोका पत्करलाच नाही तर तुम्हाला तुमच्या क्षमतांची पूर्णपणे ओळखच होत नाही. आयुष्यात साचलेपण येतं. बॉलिवूडमध्ये करिअर अगदी शिखरावर असताना क्वान्टिको टीव्ही शो स्वीकारला. तेव्हा मी अनेक गोष्टी पणाला लावून धोका पत्करला होता. कदाचित माझं करिअरही संपलं असतं. सुदैवाने मी पत्करलेला प्रत्येक धाक्याचं यशात रूपांतर झालं. कारण मी शंभर टक्के प्रयत्न केले. ८) कुटुंब, आपले मित्र आणि आपण ज्यांच्यासोबत काम करतो ते लोक आपल्या प्रवासात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांचा प्रभाव कळत नकळतपणे आपल्यावर पडतो. त्यामुळेच आपल्या अवतीभोवतीच्या लोकांची निवड फार काळजीपूर्वक करा. ९) आजकाल आपण समाजमाध्यमांवर खूप सक्रिय असतो. इंटरनेटवरच्या बिनचेहºयाच्या गर्दीचं मत आपण का विचारात घ्यायचं? सगळ्यांना आपण नाही खूश करू शकत, हाच यशाचा नववा मंत्र. १०) ‘हसायला शिका’. कधी कधी स्वत:वर, परिस्थितीवर हसताही आलं पाहिजे. आपण काही सतत लढायला नाही जात... आयुष्य मस्त आहे, ते जगा. हसा मनमुराद. ११) माझ्या आईने अगदी लहानपणापासून मला एक गोष्ट सांगितली होती. तुझ्यापेक्षाही कमनशिबी लोक आहेत. त्यामुळे आपला हात नेहमी ‘देता’ ठेव. मी माझी स्वत:ची सामाजिक संस्था सुरू करण्याचे कारणही हेच होतं. समाजाकडून तुम्हाला जे मिळालं आहे, त्याची परतफेड करा. १२) सर्वांत शेवटचा आणि महत्त्वाचा मंत्र म्हणजे तुम्ही कुठून आला आहात आणि तुमची मूळं नेमकी कुठं आहेत हे कधीच विसरू नका. तुमच्या अस्तित्वाला आकार देणारी ही गोष्ट आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर मी स्वत:ला मोठ्या गर्वाने भारतीय म्हणवून घेते. मी आर्मी की बेटी आहे. एका डॉक्टर जोडप्याची मध्यमवर्गीय घरात वाढलेली मुलगी आहे. आमची सुख-दु:खं, वेदना चारचौघांसारखीच आहे. हे कसं विसरणार? आपल्या आयुष्याचा प्रवास हा आपल्या शरीरापुरता मर्यादित नसतो. आपली आंतरिक ऊर्जा, अस्तित्व आपल्याला माणूस म्हणून घडवत असते. नवीन वर्षाची सुरु वात करताना हे सारं आपणही सोबत घ्यावं, याच शुभेच्छा !  

संबंधित

लग्न नाही तर ‘हे’ आहे प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या जोधपूर दौऱ्याचे कारण!!
'या' कारणामुळे सलमान खान आणि प्रियांका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’!
प्रियांका चोप्रा-निक जोनास करणार या ठिकाणी Destination Wedding, तयारी सुरू
‘बर्वे बाईं’च्या सल्ल्यामुळेच नावारूपाला आलो : गजेंद्र अहिरे
प्रियांका चोप्रा आणि निकला लवकरच हवीय 'ही' गोष्ट

सखी कडून आणखी

सणावाराच्या काळात बायकांना छळतं पाळीचं टेन्शन! ही परिस्थिती बदलणार आहे की नाही?
अमेरिकेतल्या छोट्यांचा मराठी नाटकमेळा
आई आणि बाळ यांचा मायेचा सोहळा सुखद करणारा स्तनदा मातांचा मदत गट
फुलांचे चमचमीत पदार्थ खायचे असतील तर गोव्याला जा!
केस सुंदर करायचेय मग बदाम, पालक आणि जवस खायला सुरूवात करा!

आणखी वाचा