- शुभदा चौकर

निरनिराळ्या खाद्यपदार्थांच्या वेष्टणांवर वेगवेगळ्या तारखा का असतात? या तारखा नेमकं काय सांगतात? या तारखा खरंच गंभीरपणे घ्यायच्या असतात का? 
- सिद्धार्थ सावे

- पॅकेटबंद पदार्थ घेताना त्यावरची सर्वच माहिती वाचनीय नसली तरी ती वाचायचीच असते. असे पदार्थ नियमित घेत असलो तरी प्रत्येकदा पॅकेट विकत घेण्याआधी पुढून मागून बारकाईनं न्याहाळणं गरजेचं असतं. खरंतर पॅकेटवरच्या तारखा पॅकेटच्या पोटातल्या कितीतरी गोष्टी, ज्या आपल्या आरोग्याशी निगडित आहेत, सांगत असतात. म्हणून या तारखा वाचणं आणि त्यानुसार तो पॅकेटबंद पदार्थ आपल्यासाठी योग्य का अयोग्य ते ठरवणं महत्त्वाचं असतं. निरनिराळे तयार खाद्यपदार्थ निरनिराळ्या घटक पदार्थांपासून आणि निरनिराळ्या पद्धतीनं बनवले जात असतात. ते पदार्थ आपण खाईपर्यंत त्यांचा दर्जा चांगला आहे ना याची खातरजमा करण्यासाठी तारीख बघूनच ते घेणं केव्हाही इष्टच 

यूज बाय डेट 
उदाहरणार्थ, ब्रेडवरच्या पॅकेटवरची तारीख वाचा पाहू. ही तारीख ‘यूज बाय ३-६-१७ अशी काहीशी लिहिलेली असते. यूज बाय डेट याचा अर्थ त्या तारखेपर्यंत त्या पदार्थाचा ताजेपणा, त्याची चव जशीच्या तशी टिकून राहते. त्यानंतर तो हळूहळू शिळा होऊ लागतो. म्हणून पावासारखा नाशवंत पदार्थ ज्याची यूज बाय डेट दोन, तीन दिवसांपर्यंतचीच असते म्हणून पाव आणि ब्रेडसारखा पदार्थ दिलेल्या तारखेपर्यंतच संपवावा. आणि जर उरलाच तर तो नीट गुंडाळून, ओला होऊ न देता फ्रीजमध्ये ठेवून पुढच्या एक-दोन दिवसातच संपवावा. त्यानंतर खाल्ला तर पोट बिघडू शकतं. 
दुधाच्या पिशवीवरही ‘यूज बाय डेट’ लिहिलेली असतेच. आणि ती त्या एकाच दिवसाची असते. कारण दूध फारच नाशवंत आहे. पिशवीसकट दूध फ्रीजमध्ये ठेवलं तरी ते त्याच दिवशी उकळवावं लागतं नाहीतर ते नासून जाऊ शकतं. आणि फ्रीझरमध्ये ठेवलं तर काही दिवस जास्त राहू शकतं. पण त्याची चव ताज्या दुधासारखी लागत नाही.
यूज बिफोर.. बेस्ट बिफोर...
दही, श्रीखंड, ज्यूस, केचप, जाम अशा तयार खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर ‘यूज बिफोर, डेज फ्रॉम पॅकेजिंग’ असं लिहिलेलं असतं. किंवा बेस्ट बिफोर, मन्थस फ्रॉम पॅकेजिंग असं लिहिलेलं असतं. पण पॅकेजिंगची तारीख काही वेळा पटकन कुठे दिसत नाही. ती ‘डब्याच्या/बाटलीच्या खाली किंवा बाजूला लिहिलेली असू शकते. 
जशी यूज बाय डेट असते अशी बेस्ट बिफोर डेटही असते. त्याचा अर्थ असतो त्या तारखेपर्यंत तो पदार्थ ताजा, तशाच चवीचा राहतो. काही पॅकबंद खाद्यवस्तूंवर ती कशी साठवून ठेवावी हे पण लिहिलेलं असतं. 
एकावर एक फ्री?
अनेकदा मॉलमध्ये किंवा मोठ्या दालनामध्ये सेल लावला जातो. त्यात काही खाद्यपदार्थ स्वस्त किंवा एकावर एक फ्री मिळतात. अशा वेळी तर हमखास तारीख बघून घ्यावी. कारण मोठ्ठे ज्यूसचे किंवा आइस्क्रीमचे पुडे असतात आणि त्यावर युज बाय डेट असते दुसऱ्या दिवशीची. आपण अशा वेळी विचार करायला पाहिजे की ते आपण लगेच वापरणार आहोत का? नाहीतर पुढे ५-६ दिवस पुरवून वापरायचे असतील तर घेऊन काय उपयोग? 

तारीखच नसेल तर!
काही ठिकाणी आपल्याला आढळतं की पॅकबंद खाद्यवस्तूंवर तारीख नसते. अशा तारखा नसतील तर आपण ते पदार्थ विकत घेऊ नयेत. कारण ज्या पदार्थाची आपल्याला पूर्ण माहिती नाही तर त्याच्या दर्जाची आणि ताजेपणाची खात्री कशी बरं देता येणार? 

जाब कुठे विचारायचा? 
पॅकेटबंद पदार्थ खाऊन काही अपाय झाला तर? माहिती दिलेल्या वेस्टणामधील खाऊ खाऊन जर त्रास झाला तर त्या वेस्टणावर कंपनीचे नाव आणि संपर्क क्रमांक लिहिलेला असतो, त्यांना जाब विचारता येतो. किंवा अन्नसुरक्षा मंत्रालयाकडे किंवा ग्राहक हेल्पलाइनकडे तक्रार करता येते. अन्नसुरक्षा मंत्रालयाचे संपर्कक्र मांक असे आहेत. टोल फ्री नंबर- १८००११२१००. 

महाराष्ट्रातील तक्र ारींसाठी मुंबईतील कार्यालयाचा दूरध्वनी क्र मांक- ०२२-२२६१७६७२, २६४२०९६१, २७४७०७०८ इथे संपर्क साधून पॅकेटबंद पदार्थात काही खोट निघाली तर तक्रार करता येते.