Mute reality of South Korea try to say something. Are you able to hear? Read More in Lokmat Deepostav 2018 | दक्षिण कोरियातल्या अबोल सत्यामागे काय दडलंय वाचा लोकमत दीपोत्सव 2018
दक्षिण कोरियातल्या अबोल सत्यामागे काय दडलंय वाचा लोकमत दीपोत्सव 2018


-ओंकार करंबेळकर

सोल या दक्षिण कोरियातल्या शहरात जपानी कौन्सुलेटच्या अगदी बरोबर समोर एका लहान मुलीचा लहानसा पुतळा ठेवलेला दिसला. पीस स्टॅच्यू. चेहर्‍यावर कोणतेही भाव नसलेली ही लहानखुरी मुलगी खुर्चीमध्ये बसून समोर पाहते आहे.

तिथं एक आंदोलन चाललेलं. सोबत असलेल्या स्टेलानं ते आंदोलन काय आहे हे सांगायला सुरुवात केली. युद्धकाळात वसाहतीमधल्या देशातील महिलांचा केवळ उपभोगाची वस्तू म्हणून उपयोग केला जायचा. 

कोरियन महिलाही याला अपवाद नव्हत्या. एका स्त्रीवर दिवसभरात दहा-बारा वेळा बलात्कार करण्यासाठी जपानी अधिकारी नंबर लावून बसायचे. सकाळी हा अधिकारी, मग तो, मग तो, त्याच्यानंतर हा अधिकारी अशा पाळ्या लावलेल्या असत..

बरं या कोरियन मुलीही अगदी कोवळ्या असायच्या. 10 वर्षांपासून 14 वर्षांपर्यंतच्या. त्यांना नावच मुळी कम्फर्ट वूमन असं होतं. कोणतीही दयामाया न दाखवता त्यांना ओरबाडलं जायचं. महायुद्ध हरल्यावर या अत्याचारांचा पुरावा नष्ट करण्यासाठी जपाननं अनेक मुलींना मारून टाकलं तर काही मुली वाचल्या. पुढे या मुलींची लग्नं झाली; पण आपण या अत्याचाराबद्दल बोललो तर सगळं भांडं फुटेल. आपल्याला कुटुंबातून हाकललं जाईल. मग जायचं कुठं या भीतीनं त्या सगळ्या बायका गप्प बसल्या.

मात्र कीम हाक सून नावाच्या आजीनं तोंड उघडलं, तोपर्यंत 1991 साल उजाडलं होतं. युद्ध संपल्यावर चाळीस-पंचेचाळीस वर्षं घट्ट मिटून घेतलेले ओठ सत्तरी उलटल्यावर कीम हाक सून आजीनं उघडलं. लोकांसमोर येऊन तिनं जपानी सैनिकांच्या अत्याचाराच्या कहाण्या सांगितल्या. तिच्या या अनुभवांमुळं  सगळं जग हादरून गेलं. 
कीमच्या धाडसामुळे आणखीही काही आज्या घराबाहेर पडल्या. सुमारे 92 स्त्रियांनी आपल्यावर अत्याचार झाल्याचं लोकांसमोर सांगितलं. आज त्यांतल्या 23 आजीबाई जिवंत आहेत. या स्त्रियांच्या मागे अख्खा कोरिया उभा राहिला. 
म्हणून जपानी कौन्सुलेटच्या अगदी बरोबर समोर हा पीस स्टॅच्यू आहे. चेह-यावर कोणतेही भाव नसलेली ही मुलगी खुर्चीमध्ये बसून समोर जपानकडे पाहत आहे इतकचं.  - पण या साध्या लहानशा पुतळ्यानं जपानचा तिळपापड झाला आहे. हा पुतळा काढा म्हणून जपान सरकारनं वारंवार मागणी केली आहे.

त्याविषयी अधिक वाचा,

लोकमत दीपोत्सव 2018


Web Title: Mute reality of South Korea try to say something. Are you able to hear? Read More in Lokmat Deepostav 2018
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.