- प्रभाकर ओव्हाळ
 
माई बाबासाहेबांच्या मागे सतत वावरत राहिल्या. आधारवड झाल्या. 
महामानवाची सावली बनल्या. उभ्या आयुष्याचे बलिदान करून 
पडत्या काळात त्यांना सावरले. बाबासाहेबांच्या एकाकीपणाच्या 
उजाड आयुष्यात त्यांनी वसंत फुलविण्याचा सदोदित प्रयत्न केला.
 
‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे शतकाशतकांतून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य-दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी डॉ. आंबेडकरांची झाले आणि माङया जीवनाचे सोने झाले.’ 
- हे उद्गार आहेत डॉ. सविता भीमराव म्हणजेच माईसाहेब आंबेडकरांचे.
29 मे माईसाहेबांचा स्मृतिदिन. त्यांच्या निधनाला 13 वष्रे पूर्ण झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी समारोहात माईसाहेबांचे स्मरण काहीसे दुर्लक्षिले गेले. त्यांच्या जीवनपटाचा हा आलेख..
डॉ. राव यांनी डॉ. शारदा कबीर काम करीत असलेल्या शल्यचिकित्सक डॉ. माधव मालवणकरांच्या शुo्रूषा केंद्रात उपचार करून घेण्याचा सल्ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिला होता. त्यानुसार डॉ. मालवणकरांनी आवश्यक त्या चाचण्या घेऊन बाबासाहेबांवर उपचार सुरू केले. त्यावेळी डॉ. कबीर यांनी त्यांना दैनंदिन आहारातही आवश्यक ती पथ्ये, तो कसा आणि कधी घ्यावा याचे कोष्टक तपशीलवार समजावून दिले. पण प्रचंड कामाच्या व्यापात बाबासाहेबांना हे जमणार कसे? ते तर घरात एकटेच होते. पत्नी रमाईंचे निधन होऊन सुमारे 13 वर्षाचा काळ लोटला होता. देश-विदेशांतले दौरे, अभ्यास, चिंतन, लिखाण, वादविवाद, संमेलनं, सभा यांतून डॉ. आंबेडकरांना उसंत मिळत नव्हती. एकीकडे पोखरत चाललेली शारीरिक व्याधी आणि दुसरीकडे नवराष्ट्र निर्माणाची दुर्दम्य इच्छाशक्ती या संघर्षात शरीरावर अन्याय होत होता. 
डॉ. मालवणकरांनी तातडीने उपचार सुरू केले. औषधांचा योग्य तो परिणाम जाणवायला लागला. आंतरिक दाह कमी होऊ लागला. त्यांना बरे वाटू लागले. तेव्हापासून डॉ. मालवणकर त्यांचे वैयक्तिक डॉक्टर बनले ते शेवटर्पयत. सहायक म्हणून काम करणा:या डॉ. शारदा कबीर बाबासाहेबांची मनोभावे शुo्रूषा करू लागल्या. नकळत भावनिक नाती जुळू लागली. कामाचा प्रचंड व्याप बघून बाबासाहेबांनी स्वत:च्या देखभालीसाठी एखादी नर्स ठेवावी, असा सल्लाही डॉ. कबीर यांनी दिला. याबाबत बाबासाहेबांच्या मनात उठलेले काहूर त्यांनी आपले सहकारी कमलाकांत चित्रे, सोहनलाल शास्त्री आणि दादासाहेब गायकवाड यांना सांगितले होते. 16 मार्च 1948 रोजी इंग्रजीतून दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रत ते म्हणतात,
‘..मधुमेह हा आहारात्मक रोग आहे. माङया आहाराकडे, इन्सुलिनकडे लक्ष देणारे कोणी नाही, तर तो परत उलटण्याच्या शक्यता पूर्णपणो कमी करता येऊ शकत नाहीत. जर माझी लग्न करण्याची इच्छा नसेल तर ते मला परिचारिका किंवा घरव्यवस्था पाहणारी एखादी व्यक्ती ठेवण्याचा आग्रह करीत आहेत. मी त्याविषयी खूप विचार केला आहे. उत्तम मार्ग म्हणजे लग्न करणो.. यशवंताच्या आईच्या मृत्यूनंतर मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता; पण परिस्थितीने मला आता नवीन निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. डॉक्टर म्हणतात की, माङयाकरिता लग्न किंवा अकाली मृत्यू ह्या दोहोंपैकी एक पर्याय आहे.
जरी निवड करणो सोपे असले तरी, पत्नी शोधणो कठीणच आहे. माझी पत्नी होण्यासाठी त्या ‘स्त्री’ला सुशिक्षित, वैद्यकीय व्यवसायी आणि उत्तम स्वयंपाकी असणो आवश्यक आहे. आपल्या समाजात हे तिन्ही गुण असणारी आणि माङया वयाला योग्य असणारी स्त्री मिळणो अशक्य आहे. माझे आयुष्य इतके एकाकी राहिले आहे की, माझा हिंदू जातीतल्या माणसांशी संपर्क राहिलेला नाही; आणि हिंदू स्त्रियांशी तर अजिबातच नाही. नशिबाने मी एक शोधू शकलो आहे. ती सारस्वत ब्राrाण समाजाची आहे. सध्या ठरल्याप्रमाणो लग्न दिल्लीत 15 एप्रिल (1948) रोजी होईल हे गुप्तच ठेवा..’
मंगलकामनांसह
तुमचा स्नेहांकित  (संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अॅण्ड स्पीचेस, खंड-29
(बी. आर. आंबेडकर)
..डॉ. बाबासाहेबांनी डॉ. शारदा कबीर यांच्याबरोबर नोंदणी विवाह दिल्ली येथे केला. विवाहास मोजकीच माणसे उपस्थित होती. कमलाकांत चित्रे, दौलत जाधव, भाऊराव गायकवाड, डॉ. मालवणकर, पुरणचंद रायसाहेब, सोहनलाल शास्त्री व परमानंद शास्त्री असे 16 जण उपस्थित होते. बाबासाहेबांनी व्यक्तिगत शुश्रूषेसाठीच हा विवाह केला असे नाही. ते तर कृतिशील समाज क्रांतिकारक होते. त्यांनी स्वत: आंतरजातीय विवाह करून राष्ट्रीय एकात्मता तर साधलीच, पण जातिभेद गाडण्यासाठी प्रत्यक्ष कृतीने एक आदर्श उदाहरण घालून दिले. 1936 साली जातिसंस्थेच्या उच्छेदात स्वत: बाबासाहेबांनी दिलेल्या कार्यक्रमातील आंतरजातीय विवाहाची व्यक्तिगत पातळीवरील ती परिपूर्ती होती. त्याकाळी या विवाहाची अनेकांनी प्रशंसा केली. देश-विदेशांतून वृत्ते प्रसिद्ध झाली.
बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्या वयात तब्बल 2क् वर्षाचे अंतर होते. शरीरधर्माला फाटा देत दोघांचाही दिनक्रम सुरू झाला. डॉ. बाबासाहेबांनीच डॉ. शारदा हे नाव बदलून डॉ. सविता भीमराव आंबेडकर असे नाव दिले. सविता म्हणजे सूर्याची तेजस्विता अन् तेव्हापासून बाबासाहेबांची मनोभावे सेवा सुरू झाली. योग्य आहार, पथ्ये, विo्रांती आणि योग्य ती औषधे यामुळे बाबासाहेबांची प्रकृती सुधारत गेली. मानसिक स्वास्थ्य लाभले. कामाचा प्रचंड व्याप त्यांनी लीलया पेलला. कायदेमंत्री पदाची जबाबदारी, राज्यघटनेची निर्मिती, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे शैक्षणिक कार्य, हिंदू कोड बिलाचा मसुदा, विविध विषयांवरील लेखन, 195क् नंतर लढलेल्या दोन सार्वत्रिक निवडणुका आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरातला धर्मातराचा सोहळा या सा:या घटनांत माई बाबासाहेबांच्या मागे सतत वावरत राहिल्या. आधारवड झाल्या. महामानवाची सावली बनल्या. उभ्या आयुष्याचे बलिदान करून पडत्या काळात त्यांना सावरले. बाबासाहेबांच्या एकाकीपणाच्या उजाड आयुष्यात त्यांनी वसंत फुलविण्याचा सदोदित प्रयत्न केला.
त्यांची समर्पणाची भावना बाबासाहेबांनी शब्दबद्ध केली आहे. ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत त्यांनी आवजरून नमूद केले होते.. ‘या ग्रंथाच्या लेखनाचे काम सुरू केले तेव्हा मी आजारी होतो; आणि आजही आजारीच आहे. गेल्या पाच वर्षात माङया प्रकृतीत चढउतार झाले. एकदा तर माझी प्रकृती इतकी बिघडली की, डॉक्टर माझे वर्णन ‘मालवती ज्योत’ म्हणून करत. ती मालवती ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्यात माङया पत्नीचे वैद्यकीय शास्त्रतील प्रावीण्य तसेच माङयावर उपचार करणारे डॉ. मालवणकर यांचे योगदान आहे. त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. त्यांनीच मला हा ग्रंथ करण्यास समर्थ केले आहे.’ बाबासाहेबांची ही प्रस्तावना 15 मार्च 1956 या दिवशी टंकलिखित करून घेतली. पण बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जेव्हा हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला तेव्हा त्यातला हा भाग मात्र जाणीवपूर्वक वगळण्यात आला होता.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर बाबासाहेबांचा मृत्यू कृत्रिम की नैसर्गिक यावर संशय निर्माण करण्यात आला. ब्राrाणद्वेषापायी अनेकांनी माईंविषयी समाजमन कलुषित केले. देशभर गदारोळ झाला. संसदेतही राजकारण्यांनी प्रश्न उठविले. सरकारने चौकशी आयोग नेमला. शेवटी बाबासाहेबांचा मृत्यू नैसर्गिकच होता असा निष्कर्ष जाहीर झाला. तब्बल आठ वष्रे सहा महिने बाबासाहेबांच्या जिवास जपणा:या माईसाहेबांना या गदारोळामुळे मनस्ताप झाला. त्यांना काही वष्रे अज्ञातवासात काढावी लागली. तरीही त्या स्वस्थ बसल्या नाहीत. बाबासाहेबांचे कार्य पुढे नेण्यासाठी धडपडत राहिल्या. भारत सरकारने जेव्हा बाबासाहेबांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले, तेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्या कृतकृत्य झाल्या. उर्वरित आयुष्यात ‘जय भीम’ म्हणत त्या जगल्या. 29 मे 2क्क्3 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी डॉ. सविता भीमराव आंबेडकर यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या स्मृतीस अभिवादन!
 

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.