Kundital tubers | कुंडीतले कंद
कुंडीतले कंद
मंदार वैद्य
 
कोशिंबिरीसाठी गाजर-मुळा-बीट आणि आलं ओली हळद सगळं घरच्या घरी पिकवता येईल.
-----
रो जच्या जेवणात गाजर, मुळा,  बीट यांचं सॅलड किंवा कोशिंबीर असली की, जेवणाची लज्जत वाढतेच. गाजर, मुळा, बीट यामुळे आपलं जेवणाचं ताट बहुरंगी आणि बहुगुणी होतं.  आहारात कंदवर्गीय भाज्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या कंदवर्गीय भाज्यांमधील अनेक जीवनसत्त्वं आपल्या आहाराला परिपूर्ण बनवतात.  गाजर, मुळा, बीट यासोबतच आपल्या रोजच्या जेवणाची आणि चहाची चव वाढवणारे आले, उपासाला हमखास लागणारी रताळी आणि वर्षातून एकदा करायच्या लोणच्यासाठीची ओली हळद या कंदवर्गीय वनस्पतींची लागवड आपण आपल्या हिरव्या कोप:यात सहजपणो करू शकतो. 
माङया काही मित्रंनी या कंदवर्गीय वनस्पतींची लागवड करण्याचा प्रयत्न केला पण फक्त रताळय़ाचा वेल खूप छान वाढला बाकी सगळ्या कंदवर्गीय वनस्पतींच्या लागवडीत मात्र त्यांना म्हणावे तसे यश आले नाही. 
या कंदवर्गीय भाज्या लावण्याचं आणि वाढवण्याचं एक विशिष्ट तंत्र आहे. ते सांभाळल्याशिवाय या कंदवर्गीय भाज्या फुलत, फळत नाहीत. आपल्या हिरव्या कोप:यात कंदवर्गीय वनस्पती वाढवताना कुंडय़ांची निवड, मातीचं आरोग्य, लागवडीची काळजी आणि कुंडीतील मातीतल्या खताची मात्र सांभाळली तर गाजर, मुळा, बीट, 
रताळे आपल्या बागेतही हसत-खेळत वाढतील !
(पुढील लेखात हिरव्या कोप:यातील वनस्पतींवर येणा-या पिठय़ा ढेकूण म्हणजेच मिली बगचं नियंत्रण कसं करावं?)
 
कुंडय़ांची निवड कशी करावी?
 
आपल्या हिरव्या कोप:यात लावलेल्या इतर वनस्पतींच्या तुलनेत कंदवर्गीय वनस्पतींच्या लागवडीसाठी कुंडय़ांची निवड करताना जास्त काळजी घ्यावी लागते. गाजर, मुळा आणि रताळी यांच्या लागवडीसाठी किमान 12 इंच खोली असलेल्या आयताकृती लांबट कुंडय़ा निवडाव्यात. बाजारात अशा कुंडय़ा मिळतातच; परंतु निरूपयोगी झालेले दूध वाहतुकीचे ट्रे, निकामी झालेल्या मोठय़ा वाहनांच्या बॅट:यांचे बाहेरील आवरण यामध्येही गाजर, मुळा आणि रताळ्यांची लागवड करता येते. आपण आपल्या ‘हिरव्या कोप:या’त मोठय़ा कुंडीमध्ये कढीपत्ता, तोंडली यासारख्या मोठय़ा वनस्पती लावल्या असतील तर त्याच कुंडीत आपण आल्याची लागवडही करू शकतो. हळदीच्या लागवडीसाठी 12 इंची गोल कुंडय़ा चालतील पण एका कुंडीत एकच हळदीची लागवड करावी. 
 
मातीचं आरोग्य कसं सांभाळावं ?
 
कुंडीच्या वर वाढणा:या वनस्पतीच्या पर्णसंभारा सोबतच कुंडीतील कंदाची वाढही यथायोग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं. म्हणूनच कंदवर्गीय वनस्पतीसाठीची माती सर्व प्रकारच्या अन्नद्रव्यांनी परिपूर्ण, भुसभुशीत आणि कीडमुक्त असावी लागते. कुंडीच्या तळाशी आकारमानाच्या साधारण 25 टक्के शेण, गोमुत्रत किमान 36 तास भिजवलेल्या नारळाच्या शेंडय़ा आणि पालापाचोळा नीट दाबून भरावा. कुंडीच्या उर्वरित भागात किमान 5क् टक्के चांगले कंपोस्ट किंवा संजीवक माती, 25 टक्के मोहरीच्या आकाराची बारीक चाळलेली वाळू, 25 टक्के नीट चाळलेली लाल माती किंवा कोकोपीट, दोन- दोन ओंजळी नीम पावडर आणि रवाळ तंबाखू यांचं  मिश्रण भरावं. लागवड करण्यापूर्वी अशा भरलेल्या कुंडय़ामध्ये शेण-गोमूत्र काल्याचं पाणी घालून त्या कुंडय़ा किमान आठ दिवस तशाच ठेवाव्यात. कुंडीत पाणी घातल्यानंतर त्याचा नीट निचरा होत असल्याची खात्री करावी. ओल्या शेणात उनी असण्याची शक्यता असते, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ओलं शेण वापरू नये. मुळा गाजर आणि बीट यांची लागवड करताना साधारणत: सहा इंच अंतर सोडावं.  
 
लागवड कशी आणि कधी करावी?
 
गाजर, मुळा आणि बीट यांची वाढ थंड हवामानात छान होते. थंडी सुरू होताना म्हणजेच सप्टेंबर महिन्यात या वनस्पतींची लागवड केल्यास कंद छान वाढतात आणि या हंगामात वाढवलेले कंद अधिक चवदारही असतात. पांढरा मुळा साधारणत: 4क्  ते 5क् दिवसांत, गाजर आणि बीट 8क् ते 9क् दिवसांत कुंडीतील मातीत पूर्णत: वाढतात. आल्याचं रोप साधारणत: 2 ते 3 फूट वाढतं. आल्याची पानं पिवळी पडू लागली की आल्याचा कंद पूर्ण वाढला आहे असं समजावं. आपल्याकडील गावठी हळदीचं वाण बहुवर्षीय आहे, तर काही वाण वार्षिक आहेत. हळदीची लागवड साधारणपणो एप्रिल महिन्याच्या मध्यापासून जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ार्पयत करावी. वर्षाच्या शेवटी कुंडीतील हळदीचा कंद काढून घ्यावा. रताळी मुळातच एक चिवट वनस्पती आहे आणि अगदी कठीण वातवरणातही ती तग धरू शकते.  
 
खत किती घालावं?
 
कंद जसा जसा वाढत जातो, तसतसे कुंडीच्या मातीतील पोषण मूल्य कमी होत जाते. कंदाची नीट वाढ होण्यासाठी दर 21 दिवसांनी कुंडीतील माती वरच्यावर हलवून गांडूळ खत, नीम पावडर यांचं मिश्रण मातीत मिसळावं. दर आठवडय़ातून एकदा अमृतजल किंवा नीट कुजवलेला शेण-गोमुत्रचा काला वापरल्यास वनस्पती छान वाढतात.  
 
(पुढील लेखात हिरव्या कोप-यातील वनस्पतींवर येणा:या पिठय़ा ढेकूण म्हणजेच मिली बगचं नियंत्रण कसं करावं?)  
mandarcv@gmail.com
 

Web Title: Kundital tubers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.