If you are working 55 hours a week then you have a major risk of depression . | तुम्ही आठवडयातले 55 तास कामातच घालवत असाल तर तुम्हाला धोका आहे?
तुम्ही आठवडयातले 55 तास कामातच घालवत असाल तर तुम्हाला धोका आहे?

-सखी प्रतिनिधी 

पैशांसाठी खूप काम करणं, ओव्हरटाइम करणं हे आता महिलांच्याही अंगवळणी पडू लागलं आहे.
उमेदीच्या वयात जास्त काम करून दोन पैसे जास्त मिळावेत म्हणून ओढाताण होत असतानाही अनेक महिला त्यांच्या कामाच्या ठरलेल्या वेळेपेक्षा जास्त काम करतात. अनेकजणी तर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही म्हणून सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचा पर्याय स्वीकारतात.

या धडपडीतून दोन पैसे जास्त मिळतात हे खरं पण त्याबरोबर शरीर मनाला           येणा -या ताणाकडे मात्र त्यांचं लक्ष जात नाही.

पण काम करणा -या  जगभरातल्या महिलांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न एका अभ्यासानं केला आहे. ‘क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन’ आणि  ‘युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन’ने काम करणा -या  महिलांमधील ताणाचा अभ्यास केला आहे.

या ताणाचा परिणाम म्हणून नैराश्याचा धोका अभ्यासकांना आढळून आला आहे.
या अभ्यासानुसार ज्या नोकरदार किंवा काम करणार्‍या महिला आठवड्यात 55 तासांपेक्षा जास्त काम करतात त्यांना नैराश्याचा धोका मोठय़ा प्रमाणावर असतो. पण या अभ्यासात हीच गोष्ट जशीच्या तशी पुरुषांना मात्र लागू पडत नाही.
20 हजारपेक्षा जास्त प्रौढांची पाहणी केलेला हा अभ्यास ‘बीएमजे’स र्जनल ऑफ एपिडेमॉयॉलॉजी अँण्ड कम्युनिटी हेल्थ’ या र्जनलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. 

अभ्यास काय सांगतो?
 

* वय, उत्पन्न, आरोग्य आणि कामाचं स्वरूप आणि वैशिष्ट्यं यावर चर्चा करताना ज्या महिला आपल्या कामाच्या नियोजित तासांपेक्षा जास्त तास काम करतात त्यांच्यात आठवड्यात 35 ते 40 तास काम करणार्‍या महिलांपेक्षा नैराश्याची लक्षणं ही 7.3 टक्के जास्त दिसतात. 

*  ज्या महिला रोज जास्त तास काम करतात शिवाय  आपल्या सुटीच्या दिवशीही काम करतात त्यांच्यात नैराश्याची दाट शक्यता असते. ही बाब मात्र अभ्यासकांना महिला आणि पुरुष दोन्हींच्या बाबत समान आढळून आली.
 

*ज्या महिला आपली प्रत्येक सुटी कामातच घालवतात त्यांच्यात  नैराश्याचं प्रमाण कामाच्या वेळेतच काम करणार्‍या स्त्रियांपेक्षा 4.6 टक्के जास्त आढळून येतं.
 कमी पगार मिळणा-या ठिकाणी जर बायका जास्त काम करत असतील तर त्यांच्यात नैराश्याचं प्रमाण मोठं असतं.
 

*हा अभ्यास फक्त नैराश्यावरच भाष्य करत नाही तर कामाच्या पद्धतीत आढळलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टींवरही प्रकाश टाकतो. हा अभ्यास म्हणतो की मुलं असलेल्या महिला मुलं नसलेल्या महिलांपेक्षा कमी काम करतात, तर मुलं असलेले पुरुष मुलं नसलेल्या पुरुषांच्या तुलनेत जास्त काम करतात. 
 

* सुट्टीच्या दिवशी काम करणा-या पुरुषांचं प्रमाण महिलांच्या तुलनेत दोन तृतीयांशने जास्त आढळलं.

*  अभ्यासकांनी इंग्लंडमधील 40,000 घरांमधील 11,215 काम करणारे पुरुष आणि 12,188 काम करणा-या महिलांचा अभ्यास केला. 
  
महिलांवर जबाबदा-याचा अतिताण
हा अभ्यास पाहणी, निरीक्षण आणि संवाद याद्वारे करण्यात आला. अभ्यास करताना अभ्यासकांच्या असं लक्षात आलं, की नोकरदार किंवा काम करणा-या महिलांना फक्त कामाच्या ठिकाणीच काम असतं असं नाही. त्यांच्यावर घरातील कामाच्या, नात्यातील माणसांच्याही जबाबदा-या असतात. त्याही महिलांच्या लेखी तितक्याच महत्त्वाच्या असतात. 
कामाच्या आणि घरच्या पातळीवरच्या अपेक्षा पूर्ण करताना महिला मात्र आठवडाभर मर्यादेपेक्षा जास्त काम करतात. स्वत:ला ओढत राहातात. आणि त्याचाच परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. एवढं काम करूनही त्यांना निर्थक वाटतं, आपल्यामध्ये काम करण्याची क्षमता नाही असा स्वत:च्याचबद्दल कमीपणा वाटत राहातो.
काम करणा-या  महिलांच्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी व्यवस्था आणि  धोरणकर्ते यांनी प्रयत्न करायला हवा ही अपेक्षाही हा अभ्यास व्यक्त करतो. 

 

sakhi@lokmat.com


Web Title: If you are working 55 hours a week then you have a major risk of depression .
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.