टेन्शन गायब कसं करता येईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क on Mon, February 05, 2018 2:23pm

- मयूर पठाडे टेन्शन कुणाला चुकलंय? लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टेन्शन असतंच. अनेकदा ते समोरच्याला कळत नाही इतकंच. बºयाचदा तर ते आपल्या स्वत:लाही कळत नाही. अचानक एखाद दिवशी काहीतरी होतं, छातीत दुखायला लागतं, दम लागायला लागतो, काहींना ब्लडप्रेशरचा, तर काहींना हृदयाचा त्रास सुरू असतो. अगदी कुठल्याही कारणानं ...

- मयूर पठाडे

टेन्शन कुणाला चुकलंय? लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टेन्शन असतंच. अनेकदा ते समोरच्याला कळत नाही इतकंच. बºयाचदा तर ते आपल्या स्वत:लाही कळत नाही. अचानक एखाद दिवशी काहीतरी होतं, छातीत दुखायला लागतं, दम लागायला लागतो, काहींना ब्लडप्रेशरचा, तर काहींना हृदयाचा त्रास सुरू असतो. अगदी कुठल्याही कारणानं आपण डॉक्टरकडे गेलो तरी बºयाचदा आपल्याला पहिला प्रश्न विचारतात, तो म्हणजे तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? अजिबात टेन्शन घेऊ नका...! हे सांगणं खरंच सोपं आहे; पण करणं? तेही फारसं अवघड नाही. पण ‘तुम्हाला कसलं टेन्शन आहे का? अजिबात टेन्शन घेऊ नका’ असं डॉक्टरांनी विचारल्यावर मग आपण विचार करायला लागतो, खरंच आपल्याला टेन्शन आहे का?.. एक एक गोष्टी मग आठवायला लागतात. हो, याचं टेन्शन आहे, त्याचं थोडं टेन्शन आहे.. यादी हळूहळू मग वाढायला लागते. काहीवेळा तर या विचारांनीच टेन्शन यायला लागतं की आपल्याला किती टेन्शन आहे! पण यावर काही सोप्पे उपाय आहेत. आपल्या कामातून दर ठरावीक वेळानं ब्रेक घेत जा. अगदी पाच-दहा मिनिटांचा हा ब्रेकही तुम्हाला ताजतवानं, स्फूर्तीलं करील. हा ब्रेक शक्य तेवढा एन्जॉय कसा करता येईल याकडेही आवर्जून लक्ष द्या. हा ब्रेक तुम्ही जेवढा एन्जॉय कराल, तेवढं तुमच्या मोनोटोनस कंटाळवाण्या कामापासून तुम्ही थोडा वेळ तरी दूर जाल. हा ब्रेकच आपल्याला नवी ऊर्जा देऊन जातो.

झोपेचं काय? दुसरी गोष्ट म्हणजे बºयाचदा आपलं आपल्या झोपेकडे लक्ष नसतं. पुरेशी झोप आणि विश्रांतीच आपल्याला मिळत नाही. म्हणजे बºयाचदा आपण ती घेत नाही. कामावरून घरी आल्यानंतरही टीव्ही बघणं, रात्री उशिरापर्यंत जागणं अशा गोष्टी आपण करत असतो. आपल्याला वाटतं, ती आपली करमणूक आहे; पण ती करमणूक नव्हे, तर आपल्या आरोग्याशी खेळ असतो. त्यामुळे रोज किमान सहा तास तरी झोप झालीच पाहिजे. तिही विनाव्यत्यय. बघा एकदा झोपेचं शेड्यूल लावून. वेळच्या वेळी झोपा आणि उठा. तुमचं तुम्हालाच जाणवेल, आज मला फ्रेश वाटतंय!

संबंधित

भारतीय देहाचे आकार उकार साजरे करण्याची संधी साइज इंडियात आहे. ती कशी?
आपल्या मापाचे कपडे देणारी साइज इंडिया प्रत्यक्षात मिळू लागली तर..
अश्विनी भावे आणि त्यांच्या बाबांचा ‘सुखी माणसाचा सदरा’ एका विलक्षण नात्याची कहाणी.
घर नीटनेटकं ठेवायचं असेल तर लागतं तितकंच घ्या.
देवाच्या गोष्टी.. आता काळानुसार यातही बदल हवाच!

सखी कडून आणखी

भारतीय देहाचे आकार उकार साजरे करण्याची संधी साइज इंडियात आहे. ती कशी?
आपल्या मापाचे कपडे देणारी साइज इंडिया प्रत्यक्षात मिळू लागली तर..
अश्विनी भावे आणि त्यांच्या बाबांचा ‘सुखी माणसाचा सदरा’ एका विलक्षण नात्याची कहाणी.
घर नीटनेटकं ठेवायचं असेल तर लागतं तितकंच घ्या.
देवाच्या गोष्टी.. आता काळानुसार यातही बदल हवाच!

आणखी वाचा