-मानसी थोरात

डोळ्यांभोवतीच्या काळ्या वर्तुळामुळे एकतर आपण वयस्कर दिसतो नाहीतर आजारी.  मेकअपनं काळी वर्तुळ झाकता येत असली तरी हा त्याच्यावरचा योग्य उपाय नव्हे. 

डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळं जाण्यासाठी नियमित उपचार करावे लागतात. 

अर्थात उपचाराचा परिणाम दिसण्यासाठी खूपच संयम ठेवावा लागतो. कारण रात्री उपचार केले आणि सकाळी परिणाम दिसले असं होत नाही. उपचारामध्ये दीर्घकाळ सातत्य असलं तरच डोळ्यांभोवतीची ही काळी वर्तुळ निघून जातात.
हे उपचार करण्यासाठी कोणत्याही क्लिनिकमध्ये किंवा पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही.  घरच्याघरी हे उपचार करता येतात.

 

 मसाज

खोब-याचं आणि बदामाच तेल एकत्र करून त्यानं काळ्या वर्तुळावर हलक्या हातानं मसाज करावा. एक तास हे तेल चेह-यावर राहू द्यावं. तासाभरानं चेहरा कोमट पाण्यानं पुसावा आणि नंतर धुवावा.
 

थंडगार लेप

ओलं खोबरं, लिंबाचा रस, दोन चमचे किसलेली काकडी, एक चमचा साय , तीन चमचे चिनी माती घेऊन त्याचं मिश्रण तयार करावं.
हे मिश्रण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावं. कापसाच्या बोळ्यानं ते डोळ्याभोवती लावावं. लेप वाळेपर्यंत छान आराम करावा.  आणि वीस मिनिटानंतर पाणी आणि दूध एकत्र करून त्यानं लेप स्वच्छ करावा. 

 


टोमॅटो आय टोनर

लिंबाचा रस आणि टोमॅटोचा रस एकत्र करावा. आणि या मिश्रणानं डोळ्याभोवतीच्या काळ्या वर्तुळावर मसाज करावा. वीस मिनिटानंतर थोडं नारळ पाणी घेऊन त्यानं हे टोनर पुसून काढावं.

 बटाटा

बटाटा किसून त्याचा रस काळ्या वर्तुळाभोवती लावावा. किंवा बटाटाच्या चकत्या ठेव्याव्या. त्याचाही फायदा होतो. 

 

 हर्बल चहा

अनेकजण आरोग्यदायी म्हणून हर्बल टी घेतात. हर्बल चहा बनवल्यानंतर त्या टी बॅग्ज टाकून न देता त्या फ्रीजमध्ये ठेवाव्या. आणि जेव्हा डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळावर मसाज करतो तो झाल्यानंतर त्या टी बॅग्ज डोळ्यांभोवती फिरवाव्या. याचाही चांगला परिणाम होतो आणि काळी वर्तुळ कमी होतात.  


Web Title: Home remedies for Dark Circle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.