फ्यूचरची गंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क on Tue, November 07, 2017 4:00pm

- अजित जोशी आपण पाहिलं गेल्या वेळेला की, जर दोघेजण समोरासमोर बसून भविष्यात खरेदी-विक्री करू असा करार करत असतील तर ते फॉरवर्ड आहे, बरोबर?’ स्वामीजींचे डेरिव्हेटिव्हजचे सत्संग फारच पॉप्युलर होत होते. ‘हो, पण समोरासमोरच्या व्यवहारांची अंमलबजावणी कठीण होऊन जाऊ शकते, म्हणून मार्केटच्या माध्यमातून हे व्यवहार केले जातात आणि मार्केटमधून होणारं फॉरवर्ड म्हणजेच ...

- अजित जोशी

आपण पाहिलं गेल्या वेळेला की, जर दोघेजण समोरासमोर बसून भविष्यात खरेदी-विक्री करू असा करार करत असतील तर ते फॉरवर्ड आहे, बरोबर?’ स्वामीजींचे डेरिव्हेटिव्हजचे सत्संग फारच पॉप्युलर होत होते. ‘हो, पण समोरासमोरच्या व्यवहारांची अंमलबजावणी कठीण होऊन जाऊ शकते, म्हणून मार्केटच्या माध्यमातून हे व्यवहार केले जातात आणि मार्केटमधून होणारं फॉरवर्ड म्हणजेच फ्यूचर, हे तुम्ही गेल्या वेळेला म्हणाले होतात.’ रमानं सांगून टाकलं.

‘येस, ज्या वस्तूंवर भविष्यातला व्यवहार होत असतो, त्याला म्हणतात ‘मुद्देमाल’ किंवा ‘अंडरलायिंग’. आता हा व्यवहार शेअर्सचा असू शकतो किंवा स्टील/सोन्यासारख्या वस्तूंचासुद्धा. फ्यूचर्समध्ये काय होतं की मार्केट या मुद्देमालाचे सुटसुटीत वाटे करून एखादी भविष्यातली किंमत ठरवते आणि त्या किमतीवर, तेवढ्या वाट्यासाठी व्यवहार करायला आडाखेबाजाना संधी देते. म्हणजे समजा, ‘समता’ कंपनीच्या शेअर्सचा आजचा भाव आहे ५० रु पये तर मार्केट ५०० शेअर्सचा एक वाटा ठरवते आणि १५ डिसेंबरसाठी ५१ रुपयांचा असा एक सौदा उघडते. आता माधुरीला वाटतं की किंमत वर जाईल तर ती या भावाला भविष्यात विकत घ्यायची तयारी दाखवते आणि सोनालीला वाटतं खाली जाईल तर ती विकायची.

‘म्हणजे आल्याच की त्या समोरासमोर.’ उमाकाकू पटकन म्हणाल्या. ‘थांबा हो’, स्वामीजी हसले. ‘तीच तर गंमत आहे. माधुरी आणि सोनाली, दोघीही आपापली तयारी एकमेकींना नाही तर मार्केटला दाखवतात आणि मार्केटला जर एखाद्या सौद्याला खरेदी करायला आणि विकायला, दोन्हीसाठी जर कोणी सापडलं तर मार्केट तो व्यवहार पक्का करतं. आणि या दोघींना माहीतही नसतं कीसमोर कोण आहे ते.’ ‘कारण दोघींच्या समोर असतं मार्केट.’ सविता नेहमीप्रमाणे उत्साहात आली. ‘पण १५ तारखेला प्रत्यक्ष सौदा पूर्ण करताना दिसतीलच ना त्या समोरासमोर?’ रमानं शंका काढली. ‘नाही नाही, १५ ला काय होईल? समजा दर असेल ५६ रुपये तर याचा अर्थ ५१ ला विकत घेणाºया माधुरीला झाला पाच रुपये फायदा आणि त्याच भावाला विकणाऱ्या सोनालीचा ५ रुपये तोटा. मग सोनाली हे पैसे मार्केटला देते आणि माधुरी मार्केटकडून घेते.’ ‘आणि शेअर्स दिले-घेतले जाणारच नाही?’, सविताला हे अद्भुतच वाटलं. ‘छे, त्यांचा नफा नुकसान देऊन घेऊन झाल्यानंतर अजून काय पाहिजे?’’ दोन मिनिटं शांतता पसरली. सगळ्याचजणी या एकूण प्रक्रियेतली गुंतागुंत पचवत होत्या. ‘पण मूळ मुद्दा असा होता की पैसे द्यायची वेळ आल्यावर सोनाली टाळाटाळ करायला लागली, तिनं जर आपला सौदा निभावला नाही तर काय?’, सगळ्यांच्या आधी शंका विचारण्यात उमाकाकू अर्थातच पुढे होत्या! ‘इतकं सोपं नसेल काकू ते’, स्वामीजी वाटच पाहत होते या प्रश्नाची.

‘कसं आहे मार्केटमध्ये तुम्ही वाट्टेल त्या भावाचे सौदे नाही करू शकत. कारण मार्केट काही रक्कम तुमच्याकडून आगाऊ म्हणून घेऊन आपल्या ताब्यात ठेवत असतं. आता समता कंपनीचे शेअर्स किती वरखाली होतात, याचा विचार करून समजा मार्केटने आगाऊ टक्केवारी ठरवली १५ टक्के तर मग हा व्यवहार करण्यापूर्वी दोघींना सौद्याच्या १५ टक्के रक्कम आधीच बाजारात द्यावी लागते. हा सौदा होता ५१ रुपयाला ५०० शेअर्र्सच्या वाट्याचा म्हणजे पंचवीस हजार रुपयांचा, तर ३८२५ रुपये आधीच दोघींनी आगाऊ ठेव किंवा मार्जिन मनी म्हणून मार्केटला दिलेत. त्यामुळे १५ डिसेंबरला जेव्हा सोनालीला ५ रुपये तोटा झाल्याचं कळेल तेव्हा तिला कुठे ‘शोधायला लागणार नाही. मार्केट ५०० शेअर्सचे २५०० रुपये कापून घेईल आणि उरलेले १३२५ पडून राहतील तिच्या खात्यात.’ ‘अच्छा, म्हणजे आगाऊ आपण किती देऊ शकतो, त्यावरून आपण कितीचा सौदा करणार, हे ठरणार होय?’ झुबिनानं थोडक्यात मांडलं. ‘बरोबर! आज जर आपल्याकडे ३८२५ रुपये आहेत, तर आपण समता कंपनीचा भविष्यातला २५,५०० रुपयांचा सौदा करण्याची हिंमत बाळगतो, तिला म्हणतात एक्सपोजर.’ ‘म्हणजे आजपासून १५ तारखेपर्यंत सोनाली आणि माधुरी, दोघीही या सौद्यात बांधल्यात तर?’, रमानं विचारलं. ‘छे छे, बांधल्या कशाला? आपण मागे बोललो तसं त्यांना पर्याय आहे की यातून बाहेर पडायचा. किमती रोज वरखाली होतात. त्यांना झालेला तोटा वाढेल किंवा कमावलेला फायदा पुरे असं वाटलं तर त्या दुसºया कोणालातरी सौद्यातली आपली बाजू देऊन टाकतील आणि नफा/नुकसान सोडवून टाकतील, म्हणजेच ‘बुक’ करतील.’ ‘हं... असा आहे तर हा डेरिव्हेटिव्हजचा खेळ.’, रमा अजून विचारातच होती. ‘छे, अजून तो संपलेला नाहीच. त्याची ‘फायनल लेव्हल’ फारच भन्नाट आहे आणि तुमच्या त्या ब्ल्यू व्हेल सारखा जीवही घेतलाय तिनं काहींचा. ते पाहू पुढच्यावेळी..

संबंधित

लहान मुलांवर शिकण्याचं न पेलणारं ओझं का टाकतोय आपण ? याचे दुष्परिणाम ठाऊक आहेत का ?
इराण कबड्डीतील 'सोनेरी' अध्यायाचा थरारक प्रवास; सांगताहेत महाराष्ट्रीय प्रशिक्षिका शैलजा जैन
मसाल्यांच्या गोव्यात ओला मसाला आला कसा?
सूर्याचं कोडं सोडवण्यासाठी झेपावलेली निकी फॉक्स..या महिला वैज्ञानिकाबद्दल माहिती आहे का?
लग्नानंतर नावात बदल.. मुली हा बदल कसा स्वीकारतात?

सखी कडून आणखी

लहान मुलांवर शिकण्याचं न पेलणारं ओझं का टाकतोय आपण ? याचे दुष्परिणाम ठाऊक आहेत का ?
इराण कबड्डीतील 'सोनेरी' अध्यायाचा थरारक प्रवास; सांगताहेत महाराष्ट्रीय प्रशिक्षिका शैलजा जैन
मसाल्यांच्या गोव्यात ओला मसाला आला कसा?
सूर्याचं कोडं सोडवण्यासाठी झेपावलेली निकी फॉक्स..या महिला वैज्ञानिकाबद्दल माहिती आहे का?
लग्नानंतर नावात बदल.. मुली हा बदल कसा स्वीकारतात?

आणखी वाचा