The fight, the one who got it accepted. But did not stop there. | लढा, जे वाट्याला आलं ते स्वीकारलं. मात्र तिथं थांबले नाही..
लढा, जे वाट्याला आलं ते स्वीकारलं. मात्र तिथं थांबले नाही..

- मालविका अय्यर

जिथे आहात, ज्या स्थितीत आहात, ज्या त्रासात आहात त्यासह एक नवीन सुरुवात करा, कधीही न थांबण्यासाठी. सत्य हे आपल्याला हवं तसं नसलं तरी ते स्वीकारण्याची ताकद ठेवा. सत्य स्वीकाराल तरच जिंकण्याच्या लढाईला सुरुवात होऊ शकेल.
का? हा प्रश्न जे समोर आलंय त्या सत्याला सतत विचारत राहिलात तर तुम्ही त्या प्रश्नातच गुरफटून जाल. त्या प्रश्नात अडकण्यापेक्षा त्याचं उत्तर शोधण्याची तयारी करा. स्वत:ला विचारा, स्वत:शी संवाद करा आणि पुढे चालू लागा. लढा किंवा खितपत राहा असे दोनच पर्याय असतात. तेव्हा लढण्याचा पर्याय निवडा.

परफेक्टची व्याख्या कोणी ठरवली? परफेक्ट म्हणजे नक्की काय ? हे कोणालाच माहिती नाही. या सगळ्या व्याख्या व्यक्तिसापेक्ष आहेत. शरीर सुंदर म्हणजे नक्की काय, असा प्रश्न महिलांना पडत नाही. ही व्याख्या खरं तर व्यक्ती आणि परिस्थितीनुसार बदलते. असं असताना दुसºयाच्या नजरेनं सुंदर होणाचा मार्ग का निवडा? आपल्या नजरेत सुंदर बनलं पाहिजे. म्हणूनच परफेक्ट होण्याचा हट्ट टाळा. सत्य स्वीकारा मग बघा रस्ता स्वच्छ दिसू लागेल, धुकं दूर झालेलं असेल. जीवनाकडे बघण्याचा चुकीचा दृष्टिकोन हेच सगळ्यात मोठं अपंगत्व आहे. ते अपंगत्व फेकून द्या आणि बघा जग किती सुंदर आहे.
मात्र जिथे आहात तेथून सुरुवात करा!

मालविका फक्त २२ वर्षांची आहे.
ती १३ वर्षांची असताना २००२ मध्ये एका बॉम्बस्फोटात तिच्या शरीराची चाळण झाली होती. दोन्ही निकामी हात आणि पायांना अधुपणा आला; मात्र ती खचली नाही. काही महिन्यांनी तिनं दहावीची परीक्षा दिली. ती राज्यात तिसरी आली. तिच्या या धैर्याची दखल डॉ. कलाम यांनीही घेतली. अर्थशास्त्राचा अभ्यास करत पुढे तिनं सोशल वर्कमध्ये एम.फील केलं. पीएच.डी. करून आज ती आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला आली आहे.
 


Web Title: The fight, the one who got it accepted. But did not stop there.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.