Exercise's addiction can be dangerous to health | व्यायामाचं व्यसनही गंभीरच, व्यायाम करणं उत्तम, पण त्याचा अतिरेक झाला तर?
व्यायामाचं व्यसनही गंभीरच, व्यायाम करणं उत्तम, पण त्याचा अतिरेक झाला तर?

- मयूर पठाडे
व्यायामाची आवड असणं चांगलंच, पण त्याचं जेव्हा व्यसन होऊ लागतं, तेव्हा त्याचे दुष्परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात. दुर्दैवानं व्यायामाचं अ‍ॅडिक्शन असणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे आणि तज्ज्ञांनी त्याबाबत चिंताही व्यक्त केली आहे. थोडंसं लक्ष दिलं तर आपल्यालाही कळू शकतं कोणाला व्यायामाच्या वेडानं झपाटलं आहे ते. प्रत्यक्ष त्या व्यायामपटूला मात्र आपण ‘अति’ करतोय हे अनेकदा लक्षातच येत नाही.

त्यांनी स्वत: जर आत्मपरीक्षण केलं तर त्यांना ते कळू शकतं, पण ते समजून घेण्याची अनेकांची तयारी नसते. अति व्यायामामुळे दुखापत झाली तरीही विश्रांती घ्यायला त्यांची तयारी नसते. काही कारणानं ते व्यायाम करू शकले नाहीत, तर अपसेट होतात, त्यांच्या मनावर ताण येतो. काही जणांना तर चक्क डिप्रेशन येतं.

अति व्यायाम करणाºयांना अनेकदा अति खाण्याचीही सवय जडते. बºयाचदा हे खाणंही अपायकारक असू शकतं. कारण जे काही ते खातात, ते खरंच हेल्दी असेलच असं नाही आणि ज्या प्रकारच्या अन्नाची त्यांना गरज असते, त्याऐवजी ऐकीव माहितीवर इतर गोष्टीच ते भरमसाठ खाताना दिसतात. अर्थातच त्यांच्या शरीरात त्यामुळे अनेक प्रकारच्या कमतरता निर्माण होतात. हळूहळू त्याची सवय होत जाते आणि अति खाण्यापासून स्वत:ला ते वाचवू शकत नाहीत, त्याचं समर्थनही ते करायला लागतात. अति व्यायाम करून हे लोक आपल्या शरीर-मनाचा ताणही सारखा वाढवत असतात. कारण मनाप्रमाणे व्यायाम झाला नाही, तर त्यांना त्याचं फारच टेन्शन येतं.

अति व्यायाम करणा-यांच्या आयुष्याचा जवळपास प्रत्येक क्षण व्यायामाच्या विचारांनी नाहीतर कृतीनं व्यापलेला असतो. ते सातत्यानं त्याविषयीच बोलतात आणि करतातही. खरंतर कोण ‘अति’ करतंय याचा काही नियम नाही, प्रत्येकासाठी ते परिमाण वेगवेगळं असतं, पण आपल्याला स्वत:लाच ते लक्षात आलं पाहिजे. तुम्हीही जर असा अति व्यायाम करीत असाल, तर लक्षात घ्या, हे डेडिकेशन नाही, आॅब्सेशन आहे.

अति व्यायाम करणा-यांची
काय आहेत लक्षणं?
१. व्यायामाचं अ‍ॅडिक्शन अनेकांमध्ये इतकं वाढतं की आपण समाजाचा एक घटक आहोत, हेच ते विसरतात. अनेक विद्यार्थी, नोकरदार तर कॉलेज किंवा आपल्या कामावर जाण्यापेक्षाही व्यायाम करून घाम गाळण्याला जास्त पसंती देतात.
२. अति व्यायामामुळे त्यांच्या शरीराची हानी तर होतेच, पण अनेकदा एवढ्या तीव्र व्यायामासाठी त्यांचं शरीरही सुदृढ राहात नाही, तरीही त्यांना त्याची पर्वा नसते.
३. जास्तीत जास्त कॅलरिज बर्न करण्याकडे त्यांचा ओढा असतो.
४. अति व्यायामामुळे दुखापत झाली तरीही विश्रांती घ्यायला त्यांची तयारी नसते.
५. काही कारणानं ते व्यायाम करू शकले नाहीत, तर अपसेट होतात, त्यांच्या मनावर ताण येतो. काही जणांना तर चक्क डिप्रेशन येतं.
६. असे लोक कस्सून व्यायाम तर करतातच, पण दिवसभर त्यांच्या डोक्यात, मनातही तोच विचार असतो.
७. बघा, तुम्ही स्वत: असे असाल, किंवा तुमच्या परिचयाचं कोणी असं असेल, तर वेळीच त्यापासून सावध व्हा आणि आपल्या मित्र, मैत्रिणींनाही त्यापासून सावध करा.

 


Web Title: Exercise's addiction can be dangerous to health
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.