Take care good night movie review : सायबर क्राइमवर प्रकाशझोत टाकणारा...

By प्राजक्ता चिटणीस | Published: August 30, 2018 05:21 PM2018-08-30T17:21:35+5:302018-08-31T16:13:40+5:30

टेक केअर गुड नाईट या चित्रपटात सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश वामन मांजरेकर, आदिनाथ कोठारे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Take care good night movie review : सायबर क्राइमवर प्रकाशझोत टाकणारा... | Take care good night movie review : सायबर क्राइमवर प्रकाशझोत टाकणारा...

Take care good night movie review : सायबर क्राइमवर प्रकाशझोत टाकणारा...

googlenewsNext
Release Date: August 31,2018Language: मराठी
Cast: सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे, महेश वामन मांजरेकर, आदिनाथ कोठारे
Producer: हिमांशू केसरी पाटील, महेश वामन मांजरेकरDirector: गिरीश जयंत जोशी
Duration: 1 तास 50 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

सध्या सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात, महिलांचे लपून व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर अपलोड केले जातात हे आपण रोज वर्तमानपत्रात वाचत असतो. या सायबर जगतामुळे आजवर अनेकांची आयुष्य देखील खराब झालेली आहेत. टेक्नोसेव्ही नसलेली लोक तर या जाळ्यात लगेचच अडकतात. याच सायबर गुन्हेगारीवर आधारित टेक केअर गुड नाईट हा चित्रपट आहे.

अविनाश (सचिन खेडेकर) एका कंपनीत चांगल्या पदावर असतात. पण कंपनीत त्यांना नवीन सॉफ्टवेअर शिकायला सांगितले जाते. पण या नव्या तंत्रज्ञानाशी त्यांना जुळवून घ्यायचे नसते आणि त्यामुळे ते नोकरीतून निवृत्त होतात. निवृत्तीनंतर त्यांना खूप चांगला पैसा मिळतो. त्यामुळे ते पत्नी आसावरी (इरावती हर्षे) सोबत काही दिवस युरोपला फिरायला जातात. पण युरोपवरून परतल्यानंतर त्यांच्या बॅकेतील ५० लाख रुपये गायब असल्याचे त्यांच्या लक्षात येते. ते पोलिसांकडे याची तक्रार नोंदवतात. इन्सपेक्टर पवार (महेश वामन मांजरेकर) या गुन्ह्याची तपासणी करत असतात. त्यांना काही धागेदोरे देखील सापडतात. आपण गुन्हेगाराला लवकरच पकडू असे वाटत असतानाच अविनाश यांची मुलगी सानिका (पर्ण पेठे)चा एक एमएमएस सोशल मीडियावर लीक होतो. ऑनलाईन चॅटिंगद्वारे सानिकाची ओळख गौतम (आदिनाथ कोठारे) सोबत झालेली असते. तिचे आई-वडील युरोपला गेलेले असताना तिने त्याला घरी बोलावलेले असते. त्यावेळी त्याने हा व्हिडिओ शूट केलेला असतो. या व्हिडिओचा दुसरा भाग तो काहीच दिवसांत सोशल मीडियावर टाकणार असे त्याने पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले असते. हा दुसरा व्हिडिओ थांबवणे अत्यंत गरजेचे असते. पण गौतम भेटल्याशिवाय हा व्हिडिओ थांबवणे अशक्य असल्याने त्याचा शोध सुरू होतो. पोलिस गौतमला शोधतात का? अविनाशचे पैसे गायब होण्यामागे देखील या गौतमचाच हात आहे का? अविनाशचे पैसे परत मिळतात का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे हा चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.

टेक केअर गुड नाईट या चित्रपटाचा विषय हा अगदी वेगळा आहे. मध्यांतरापर्यंत या चित्रपटात इतक्या उलाढाली होतात की, आता पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहाते. पहिल्या दृश्यापासून चित्रपट चांगलीच पकड घेतो. अविनाशचा मित्र मोहन यांच्या कुटुंबियांची कथा देखील या चित्रपटात मांडण्यात आली आहे. अविनाश आपल्या मुलांना नेहमीच स्वातंत्र्य देत असतो तर मोहनने आपल्या मुलीला अनेक बंधनात ठेवलेले असते. दोघांचीही मुले समान वयाची असल्याने त्या वयातील मुलांची असणारी मानसिकता, आपल्या पालकांसोबत असलेले संबंध, त्यांच्यावर लादलेल्या बंधनांमुळे पालकांबद्दल त्यांना वाटणारा अविश्वास या गोष्टी चित्रपटात खूपच चांगल्या प्रकारे मांडल्या आहेत. आपल्या मुलांशी संवाद साधा, त्यांच्या हातून चूक झाली तरी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहा हे नकळतपणे दिग्दर्शकाने या चित्रपटाच्या माध्यमातून सांगितले आहे. या चित्रपटातील संवाद खूपच छान जमून आले आहेत. सानिकाचा एमएमएस लीक झाल्यानंतर सानिका आणि तिच्या आईत झालेला संवाद तर अप्रतिम आहे. 

सायबर जगातील अनेक गोष्टी या चित्रपटात उलगडून सांगण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे सायबर विश्वाविषयी माहिती नसलेल्या लोकांना देखील या चित्रपटाद्वारे या जगताविषयी खूप काही जाणून घेता येणार आहे. सचिन खेडेकर, इरावती हर्षे, पर्ण पेठे यांनी त्यांच्या भूमिका चोख पार पाडल्या आहेत. पण चित्रपटात खरी बाजी महेश मांजरेकर यांनी मारली आहे. त्यांचा वावर, त्यांचा संवाद प्रेक्षकांच्या टाळ्या घेऊन जाणार यात काही शंकाच नाही. आदिनाथची भूमिका इतरांच्या तुलनेत छोटी असली तरी त्याने चांगले काम केले आहे. चित्रपटाचा पूर्वाध खूपच रंजक आहे. पण उत्तरार्ध तितकासा जमून आलेला नाही असे जाणवते. पण तरीही हा चित्रपट नक्कीच मनोरंजन करतो.  

Web Title: Take care good night movie review : सायबर क्राइमवर प्रकाशझोत टाकणारा...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.