Pari hoon main review : मनाला न भावलेली परी | Pari hoon main review : मनाला न भावलेली परी
Pari hoon main review : मनाला न भावलेली परी
Release Date: September 07,2018Language: मराठी
Cast: नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी
Producer: डॉ. राजेंद्र प्रताप सिंह, शीला सिंहDirector: रोहित शिलवंत
Duration: १ तास ५ मिनिटेGenre:

लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

आपल्या मुलामुलीने अभिनयक्षेत्रात करियर करावे अशी अनेक पालकांची इच्छा असते आणि त्या दृष्टीने ते प्रयत्न देखील करत असतात. पण या झगमगत्या दुनियेत प्रवेश केलेल्या या लहान मुलांचे आयुष्य इतरांपेक्षा कसे वेगळे होते. या मुलांची निरागसता कशाप्रकारे हरवते याचे चित्रण परी हूँ मैं या चित्रपटात करण्यात आले आहे.
 
साजिरी (श्रुती निगडे) ही एक चांगली कलाकार असून तिच्या अभिनयगुणांना वाव देणे गरजेचे आहे असे तिचे वडील माधव दिघे (नंदू माधव ) यांना वाटत असते. पण अभिनयापेक्षा तिने शिक्षणाकडे लक्ष द्यावे असे तिच्या आईचे (देविका दफ्तरदार) म्हणणे असते. साजिरीचे शाळेतील नाटक पाहून तिला मालिकेच्या ऑडिशनला घेऊन या असे एक गृहस्थ तिच्या वडिलांना सांगतात. आईला न सांगता साजिरी तिच्या वडिलांसोबत जाऊन ऑडिशन देते आणि त्या मालिकेत काम करण्याची संधी देखील तिला मिळते. मालिका मिळाल्यानंतर तिचे संपूर्ण आयुष्यच बदलते. ती छोट्या पडद्यावरची एक स्टार बनते आणि तिचा जास्तीत जास्त वेळ मालिकेच्या सेटवर घालवू लागते. तिला मिळालेल्या पैशांमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती चांगलीच सुधारते. पण काहीच महिन्यात अचानक तिची मालिका बंद होते. या सगळ्याचा तिच्या मनावर काय परिणाम होतो. तिचे पुन्हा अभिनय करण्याचे स्वप्न पूर्ण होते का हे प्रेक्षकांना हा चित्रपट पाहिल्यावरच कळेल.

परी हूँ मैं या चित्रपटाची कथा चांगली असली तरी ती दिग्दर्शकाला तितकीशी चांगल्या प्रकारे मांडता आलेली नाही. मध्यांतरानंतर तर चित्रपट उगाचच ताणल्यासारखा वाटतो. तसेच चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाला काय सांगायचे तेच कळत नाही. साजिरी मालिकेत काहीच महिने काम करत असते. पण त्या कालावधीत तिला मिळालेल्या पैशातून तिचे वडील गाडी, आलिशान घर घेतात ही अतिशयोक्ती वाटते. तसेच तिची मालिका संपल्यानंतर त्यांना पैशांची चणचण भासते असे देखील दाखवण्यात आलेले नाही. या सगळ्यामुळे चित्रपट हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात अपयशी ठरतो. चित्रपटात नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे आणि साजिरीच्या मालिकेत तिची दाखवण्यात आलेली आई म्हणजेच फ्लोरा सैनीने चांगले काम केले आहे. पण तरीही परी हूँ मैं प्रेक्षकांना भावत नाही. 


Web Title: Pari hoon main review : मनाला न भावलेली परी
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.