'Nashibvan' changing life of cleaning worker | सफाई कर्मचाऱ्याचे सामान्य आयुष्य बदलणारा 'नशीबवान'
सफाई कर्मचाऱ्याचे सामान्य आयुष्य बदलणारा 'नशीबवान'
Release Date: January 11,2019Language: मराठी
Cast: भाऊ कदम, मिताली जगताप वराडकर, नेहा जोशी
Producer: अमित पाटील, विनोद गायकवाड आणि महेंद्र पाटील Director: अमोल गोळे
Duration: 2 तास 8 मिनिटGenre:

लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस 

देने वाला जब भी देता... देता छप्पर फाड के हे हेरा फेरी या चित्रपटातील गाणे नशीबवान हा चित्रपट पाहताना आवर्जून आठवते. देवाने आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी, आपल्याला कधीच कोणत्या गोष्टीची कमतरता पडू नये असे प्रत्येकजण देवाकडे मागत असतो. पण सगळ्यांचे हे मागणे पूर्ण होत नाही. पण देव प्रसन्न झाला आणि अचानक लॉटरी लागली की काय घडते हे आपल्याला 'नशीबवान' या चित्रपटात पाहायला मिळते.

 बबन (भाऊ कदम) महानगर पालिकेत सफाई कामगाराचे काम करत असतो. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असते. एकदम छोट्या घरात तो आपल्या पत्नी आणि मुलांसमवेत राहत असतो. त्याने एका पतपेढीतून कर्ज घेतलेले असते आणि त्याचे हफ्ते देखील थकलेले असतात. तुटपुंज्या पगारात संसाराचा गाढा कसा रेटायचा असा त्याच्या समोर प्रश्न असतो. एकदा एका ठिकाणी साफसफाई करताना त्याची हातातली झाडू अडकते आणि तुटते. त्यामुळे तिला बांधून सरळ करण्यासाठी तो एका भिंतीवर आपटतो. त्यावेळी त्याच्या लक्षात येते की त्या भिंतीला एक छिद्र असून त्यात खूप सारे पैसे आहेत. हे पैसे पाहिल्यानंतर त्याची नियत बदलते आणि त्यानंतर त्याच्या आयुष्याला कशाप्रकारे वळण मिळते हे आपल्याला नशीबवान या चित्रपटात पाहायला मिळते.

नशीबवान हा चित्रपट प्रसिद्ध हिंदी साहित्यिक उदय प्रकाश यांच्या 'दिल्ली की दिवार' या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात पुस्तकाप्रमाणेच कथा तंतोतंत मांडण्यात आली आहे. पण दिग्दर्शनामध्ये काही उणिवा जाणवतात. मध्यंतरापर्यंत चित्रपट खूपच संथ आहे. चित्रपटात काही घडतेय असे वाटतच नाही. तसेच चित्रपटाचा काळ कोणता आहे हे दाखवण्यात दिग्दर्शक अपयशी ठरला आहे. पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा पाहून हा काळ जुना असल्याचे नक्कीच जाणवते. पण चित्रपटाच्या शेवटपर्यंत कुठेच काळ कोणता आहे याचा संदर्भ देण्यात आलेला नाहीये. चित्रपटात भाऊ कदम, त्याच्या पत्नीच्या भूमिकेत असलेली मिताली जगताप आणि त्याच्या सोबत काम करणारी नेहा जोशी यांनी चित्रपटात खूप चांगले काम केले आहे.


Web Title: 'Nashibvan' changing life of cleaning worker
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.