Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी

By प्राजक्ता चिटणीस | Published: September 28, 2018 04:36 PM2018-09-28T16:36:43+5:302018-09-28T16:54:31+5:30

होम स्वीट होम या चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी | Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी

Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी

googlenewsNext
Release Date: September 28,2018Language: मराठी
Cast: रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे, सुमीत राघवन, मृणाल कुलकर्णी, प्रसाद ओक, क्षिती जोग, दीप्ती लेले, अभिषेक देशमुख
Producer: हेमंत रुपरेल आणि रणजीत ठाकूरDirector: हृषिकेश जोशी
Duration: 2 तास 5 मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

आपल्या घरासोबत आपले एक जिव्हाळ्याचे नाते असते. अनेक वर्षं एकाच घरात राहिल्यानंतर घरातील भिंती, खिडक्या या देखील आपल्याला आपल्याशा वाटू लागतात. पण हेच घर सोडायचा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी मनाची अवस्था अतिशय बिकट होते. आपल्या घरासोबत असेच भानविक नाते असलेल्या एका जोडप्याची कथा होम स्वीट होम या चित्रपटात मांडण्यात आलेली आहे.

श्यामल (रिमा) आणि विद्याधर महाजन (मोहन जोशी) हे वृद्ध जोडपे असते. त्यांना मूल नसते. पण विद्याधर यांच्या मानलेल्या बहिणीची मुलगी देविका (स्पृहा जोशी) त्यांच्यासोबत राहात असते तर सोपान (हृषिकेश देशपांडे) हा एक इस्टेट एजंट असतो. त्याचे या जोडप्यासोबत खूपच चांगले संबंध असतात. हे जोडपे दादर येथील एका जुन्या बिल्डिंगमध्ये अनेक वर्षांपासून राहात असतात. या बिल्डिंगला लिफ्ट नसते, तसेच कोणत्याही आधुनिक सुविधा नसतात. पण तरीही हे घर मुंबईतील एका मधयवर्ती भागात असल्याने या घराची किंमत कोटींमध्ये असते. एकेदिवशी अजाणतेपणे श्यामल आणि विद्याधर यांना या घराची किंमत कळते. आपले घर साडे तीन कोटीत विकले जाऊ शकते हे कळल्यानंतर श्यामल हे घर विकण्याचा विचार करतात. हे घर विकून आपण एखाद्या टॉवरमध्ये घर घेऊ आणि उरलेले पैसे बँकेत ठेवू असा विचार त्यांच्या मनात येतो. पण त्यांच्या या निर्णयाला विद्याधर यांचा विरोध असतो. विद्याधर यांचा निर्णय बदलतो का, महाजन कुटुंब आपले घर बदलते का या प्रश्नांची उत्तरे आपल्याला होम स्वीट होम हा चित्रपट पाहिल्यावरच मिळतील.

चित्रपटाचा विषय चांगला असला तरी चित्रपटात काही नवीन घडत आहे असे वाटतच नाही. त्यामुळे चित्रपट मनाला भिडत नाही. मध्यांतरानंतर तर चित्रपटाचा वेग खूपच कमी आहे. तसेच चित्रपटाची लांबी जास्त असल्याची जाणवते. चित्रपटाचा शेवट देखील मनाला पटत नाही. पण चित्रपटाला खऱ्या अर्थाने तारले आहे ते मोहन जोशी आणि रिमा यांनी. त्या दोघांनीही आपल्या व्यक्तिरेखा खूपच चांगल्या प्रकारे साकारल्या आहेत. रिमा यांचा अभिनय तर अप्रतिम आहे. त्यांच्या फॅन्ससाठी त्यांचा हा चित्रपट पाहाणे ही नक्कीच पर्वणी असणार आहे. मोहन जोशी आणि रिमा यांच्या अभिनयात इतकी सहजता आहे की, हा चित्रपट पाहाताना खऱ्या खुऱ्या आयुष्यातील पती-पत्नीमधील संवाद आपण पाहातो आहोत असेच आपल्याला वाटते. स्पृहाने तिच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. पण तिची देविकाची व्यक्तिरेखा चित्रपटात तितकीशी अधोरेखित होत नाही. हृषिकेश जोशी, विभावरी देशपांडे यांची कामं देखील मस्त झाली आहेत. या चित्रपटाचे संवाद चांगले आहेत. तसेच वैभव जोशी यांच्या कविता मनाला स्पर्श करतात. हृषिकेश जोशीचा एक दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट असला तरी त्याने पहिल्याच चित्रपटात बाजी मारली आहे. सोपानचे घर, घरातील वस्तू यातून त्याच्या परिस्थितीची लगेचच जाणीव होते. तसेच महाजन कुटुंबांनी अनेक वर्षं घरात जमवून ठेवलेल्या जुन्या वस्तू पाहून त्यांचे त्या वस्तूंसोबत असलेले ऋणानुबंध स्पष्ट होतात. दिग्दर्शकाने या छोट्या छोट्या गोष्टी चांगल्या प्रकारे टिपल्या आहेत.

Web Title: Home sweet home marathi movie review : आपलीशी वाटणारी घरातील मंडळी

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.