chumbak marathi movie review : आकर्षून घेणारे कथानक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2018 05:00 PM2018-07-26T17:00:33+5:302023-08-08T20:09:54+5:30

प्राजक्ता चिटणीस एखाद्या गोष्टीपासून आपण दूर पळायला बघतो. पण ती गोष्ट काही केल्या आपला पाठलागच सोडत नाही, असे अनेकवेळा ...

chumbak marathi movie review: attracting plot | chumbak marathi movie review : आकर्षून घेणारे कथानक

chumbak marathi movie review : आकर्षून घेणारे कथानक

Release Date: July 21,2018Language: मराठी
Cast: स्वानंद किरकिरे, संग्राम देसाई, साहिल जाधव
Producer: अरुण भाटीया, केप ऑफ गुड फिल्म्स आणि कायरा कुमार क्रीएशन्सचे नरेन कुमार Director: संदीप मोदी
Duration: १ तास ५८ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

प्राजक्ता चिटणीस

एखाद्या गोष्टीपासून आपण दूर पळायला बघतो. पण ती गोष्ट काही केल्या आपला पाठलागच सोडत नाही, असे अनेकवेळा आपल्यासोबत होते. तसेच आयुष्यात अनेकवेळा आपल्याला ज्या व्यक्तिंपासून पळायचे असते, तीच व्यक्ती सतत आपल्यासमोर येते. असेच काहीसे चुंबक या चित्रपटात घडते. 
भालचंद्र शेवाळे (साहिल जाधव) हा एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करत असतो. आपल्या गावी रसवंती गृह काढावे अशी त्याची इच्छा असते आणि त्यासाठी तो पैसे देखील गोळा करत असतो. काहीच दिवसांत पैसे डबल होतील अशी आशा त्याचा एक मित्र त्याला दाखवतो. त्यामुळे तो त्याने जमा केलेले सगळे पैसे त्याच्याकडे गुंतवतो. पण यात त्याची फसवणूक होते. त्याने जमा केलेले सगळे पैसे संपल्यामुळे आता काय करायचे हे त्याला समजत नसते. त्यामुळे तो डिस्को (संग्राम देसाई) या त्याच्या मित्राकडून सल्ला घ्यायचा ठरवतो. त्यावर त्याचा हा मित्र त्याला एक भन्नाट सल्ला देतो. तो त्याला सांगतो, तुम्हाला एक करोडची लॉटरी लागली आहे. ती लॉटरी मिळवण्यासाठी तुम्हाला माझ्या खात्यात २० हजार रुपये टाकावे लागतीत असे मेसेजेस लोकांना पाठव... यामुळे आपण  लगेचच पैसा कमवू असे साहिलला देखील वाटू लागते आणि तो देखील लोकांना मेसेज पाठवायला लागतो. त्याच्या या जाळ्यात प्रसन्न ठोंबरे (स्वानंद किरकिरे) अडकतो. प्रसन्न हा थोडासा गतिमंद असतो. त्याला फसवून त्याच्याकडून भालचंद्र उर्फ बाळू आणि डिस्को पैसे देखील घेतात. पण त्यानंतर बाळूलाच त्याची दया येते आणि तो त्याचे पैसे परत करायचे ठरवतो. पण त्यानंतर पुढे काय होते. चित्रपटात काय काय गंमती जमती घडतात हे प्रेक्षकांना चुंबक या चित्रपटात पाहायला मिळते.
चुंबक या चित्रपटाची कथा ही आजच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळी असून हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावतो. स्वानंद किरकिरे यांचा हा पहिलाच चित्रपट असला तरी त्यांनी या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दृश्यापासून ते अंतिम दृश्यांपर्यंतच्या प्रत्येक दृश्यात स्वानंद भाव खावून जातात. भालचंद्र आणि धनंजय या दोघांनी देखील त्यांना खूप छान साथ दिली आहे. या चित्रपटाची कथा हलकीफुलकी असली तरी या चित्रपटातील अनेक क्षण मनाला भावतात. चित्रपटाची सिनेमेटोग्राफी देखील मस्त जमून आली आहे. चित्रपटातील गाणी प्रसंगानुरूप योग्य असली तरी ती ओठावर रुळत नाहीत. 

Web Title: chumbak marathi movie review: attracting plot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.