Tumhari Sulu Review : गृहिणींची सुपरहिरो म्हणजेच ‘तुम्हारी सुलु’!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 09:39 AM2017-11-17T09:39:10+5:302023-08-08T19:28:38+5:30

‘बॉबी जासूस, हमारी अधुरी कहानी, कहानी-२ आणि बेगम जान’ या चित्रपटांच्या अपयशानंतर उलाला क्वीन विद्या बालन ‘तुम्हारी सुलु’मधून दमदार कमबॅक करताना दिसत आहे. ‘

Tumhari Sulu Review: Housewives superhero, which means 'Tumari Sulu'! | Tumhari Sulu Review : गृहिणींची सुपरहिरो म्हणजेच ‘तुम्हारी सुलु’!

Tumhari Sulu Review : गृहिणींची सुपरहिरो म्हणजेच ‘तुम्हारी सुलु’!

Release Date: November 17,2017Language: हिंदी
Cast: विद्या बालन, मानव कौल, नेहा धुपिया, आर. जे. मलिष्का विजय मौर्या, अभिषेक शुक्ला
Producer: विद्या बालन, मानव कौल, नेहा धुपिया, आर. जे. मलिष्का विजय मौर्या, अभिषेक शुक्लाDirector: सुरेश त्रिवेणी
Duration: २ तास ३० मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
सतीश डोंगरे 


‘बॉबी जासूस, हमारी अधुरी कहानी, कहानी-२ आणि बेगम जान’ या चित्रपटांच्या अपयशानंतर उलाला क्वीन विद्या बालन ‘तुम्हारी सुलु’मधून दमदार कमबॅक करताना दिसत आहे. ‘द डर्टी पिक्चर’मध्ये ‘उलाला उलाला’ म्हणत प्रेक्षकांना मोहित करणारी विद्या ‘तुम्हारी सुलु’मध्ये लेट नाइट रेडिओ शोमधून ‘हॅलो’ म्हणत प्रेक्षकांवर जादू टाकताना दिसत आहे. एका सामान्य परिवाराच्या अवतीभोवती फिरणारी कथा असलेल्या या चित्रपटात विद्याचा अभिनय सर्वच पातळ्यांवर सरस ठरताना दिसतो. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर एक अपेक्षित पल्ला गाठेल असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 

चित्रपटाची कथा खूपच सर्वसामान्य परिवाराशी निगडित आहे. सुलोचना ऊर्फ सुलु (विद्या बालन), तिचा दहा वर्षांचा मुलगा प्रणब (अभिषेक शुक्ला) आणि पती अशोक दुबे (मानव कौल) हा मध्यमवर्गीय परिवार मुंबईतील विरार भागात अतिशय गुण्यागोविंदाने आयुष्य जगत असतो. प्रत्येक भारतीय गृहिणीप्रमाणेच सुलु प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करीत असते. चित्रपटाच्या सुरुवातीलाच ती लिंबू-चम्मच रेसमध्ये दुसरे स्थान पटकावून तिच्यातील एक महत्त्वाकांक्षी गृहिणीचा परिचय करून देते. प्रत्येक स्पर्धेत सहभागी होऊन सुपरहिरोप्रमाणे आपल्या गरजा पूर्ण करण्याचा सुलुचा प्रयत्न असतो. एकदा तिला रेडिओ जॉकी बनण्याची संधी मिळते. लेट नाइट शो ‘तुम्हारी सुलु’मधून सुलु रातोरात स्टार बनते. तिच्या बोलण्याचा सेक्सी अंदाज रेडिओ चाहत्यांना प्रेमात पाडतो. परंतु ही बाब सुलुच्या परिवारात खूपच खटकते. पती अशोकही तिच्या या शोमुळे काहीसा त्रस्त होतो. पुढे या दांपत्यांमध्ये मतभेद होतात. त्यानंतर काय होत असेल याचा अंदाज कदाचित तुम्हाला आलाच असेल. 

असो, सुलु साकारताना विद्याने कुठलीही आक्रमकता न दाखविता ही भूमिका सहज साकारली. तिने या भूमिकेच्या माध्यमातून गृहिणीला आयुष्यात कोणकोणत्या पातळ्यांवर स्वत:ला सिद्ध करावे लागते हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. एक महत्त्वाकांक्षी पत्नी आणि आई आपल्या परिवाराच्या भवितव्यासाठी काय करण्याचे धाडस ठेवू शकते हे विद्याने अतिशय खुबीने दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच ‘मैं कर सकती हैं’ हा तिचा डायलॉग या चित्रपटाची पेटेंट लाइन म्हणावी लागेल. सुलुच्या पतीच्या भूमिकेत असलेला अशोक (मानव कौल) याची या भूमिकेसाठीची निवड योग्यच म्हणावी लागेल. कारण साधासुधा पती कसा असतो हे त्याने या भूमिकेतून दाखवून दिले आहे. कामाच्या ठिकाणचा ताणतणाव सहन करून परिवाराच्या गरजा पूर्ण करण्यासाठीची त्याची धडपड बघण्यासारखी आहे. त्याचबरोबर नेहा धुपिया, आर. जे. मलिष्का आणि विजय मौर्या यांनीही त्यांच्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. 

सुरेश त्रिवेणी यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट बघताना असे कुठेच वाटत नाही की त्यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाचा सुरुवातीचा भाग प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा आहे. काहीशी कॉमेडी तसेच विद्या आणि मानवचा रोमान्स बघताना प्रेक्षकांना फारसा कंटाळा येत नाही. मात्र मध्यंतरानंतर चित्रपटाला अचानकच गंभीरपणा येत असल्याने चित्रपटाचा तिटकारा येतो. सुलु आरजे बनल्यानंतर तिच्या घरातील वादग्रस्त ड्रामा दाखविताना हे सर्व काही खूपच तडकाफडकी दाखविले जात असल्याचे जाणवते. त्याचबरोबर चित्रपटाची कथा उगाचच ताणली जात असल्याचीही जाणीव होते. एकूणच तुम्ही जर अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल तर हा चित्रपट तुमची निराशा करू शकतो; परंतु जर तुम्ही विद्या बालनचे चाहते असाल तर चित्रपट बघायला हरकत नाही. 

Web Title: Tumhari Sulu Review: Housewives superhero, which means 'Tumari Sulu'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.