Review : प्रेमाचा गोडवा आणि कॉमेडीचा तडका म्हणजेच ‘बरेली की बर्फी’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2017 01:21 PM2017-08-18T13:21:38+5:302017-08-18T18:51:38+5:30

हलकाफुलका, उत्साही चित्रपट हा नेहमी गंभीर चित्रपटांवर थोडासा सरस ठरत असतो. त्यात जर थोडासा ‘लोकल’ तडका लावला तर यशाचे गमक सापडून जाते. हिच गोष्ट आपल्याला ‘बॅण्ड बाजा बराती’, ‘हॅपी भाग जायेगी’, ‘तणू वेड्स मनू’, ‘क्वीन’ आदी चित्रपटांमध्ये बघावयास मिळाली.

Review : प्रेमाचा गोडवा आणि कॉमेडीचा तडका म्हणजेच ‘बरेली की बर्फी’ | Review : प्रेमाचा गोडवा आणि कॉमेडीचा तडका म्हणजेच ‘बरेली की बर्फी’

Review : प्रेमाचा गोडवा आणि कॉमेडीचा तडका म्हणजेच ‘बरेली की बर्फी’

googlenewsNext
Release Date: August 18,2017Language: हिंदी
Cast: क्रिती सॅनन, राजकुमार राव, आयुष्मान खुराणा, पंकज त्रिपाठी, सीमा पाहवा
Producer: विनीत जैनDirector: अश्विनी अय्यर- तिवारी
Duration: २ तास २ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>जान्हवी सामंत 

हलकाफुलका, उत्साही चित्रपट हा नेहमी गंभीर चित्रपटांवर थोडासा सरस ठरत असतो. त्यात जर थोडासा ‘लोकल’ तडका लावला तर यशाचे गमक सापडून जाते. हिच गोष्ट आपल्याला ‘बॅण्ड बाजा बराती’, ‘हॅपी भाग जायेगी’, ‘तणू वेड्स मनू’, ‘क्वीन’ आदी चित्रपटांमध्ये बघावयास मिळाली. यासर्व चित्रपटांची कथा साधीच आहे; पण छोट्या-छोट्या शहरातील स्थानिक व्यक्तिमत्त्वांचा वापर करून त्यांना अतिशय सुरेख पद्धतीने नाट्यमय आणि मनोरंजनात्मक करण्यात आले आहे. ‘बरेली की बर्फी’ हा त्याच पठडीतील चित्रपट आहे. 

जावेद अख्तर यांच्या आवाजात वर्णन केलेल्या या चित्रपटात बिट्टी मिश्रा (क्रिती सॅनन) ही ब्रेक डान्स आणि हॉलिवूड चित्रपटांची चाहती असलेली मुलगी दाखविण्यात आली आहे. तिला स्मोक आणि ड्रिंक्सची सवय असते. एकंदरितच तिचे व्यक्तिमत्त्व लग्नाला आलेल्या मुलीपेक्षा टॉमबॉयसारखे दाखविण्यात आले आहे. शिवाय बरेलीसारख्या शहरात. बिट्टी ही स्थानिक इलेक्ट्रिसिटी विभागाची कर्मचारी असते. तिला मौजमजा करायला आवडते. पण, बरेलीसारख्या छोट्या शहरात या सगळ्या गोष्टी करीत असताना तिला मर्यादा येतात. शिवाय तिच्या या स्वभावामुळे तिला दोन चांगल्या स्थळांनी नाकारलेले असते; तर बिट्टीनेही दोन स्थळांना नाकारलेले असते. तिचे पालक तिच्या लग्नाविषयी चिंतेत असतात. त्यांना तिचे लवकरात लवकर लग्न करून द्यायचे असते. पण बिट्टीला तिच्या पालकांचा हा प्रयत्न निराश करणारा असतो. 

एकदा याच कारणावरून आई-वडिलांशी झालेल्या भांडणाच्या भरात बिट्टी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेते. स्टेशनवर पोहोचताच तिच्या हाताला ‘बरेली की बर्फी’ हे पुस्तक लागते. ते वाचल्यानंतर पुस्तकाच्या लेखकावर ती प्रभावित होते. कारण त्या पुस्तकातील मध्यवर्ती पात्र हे तिच्यासारखेच असते. ती घरी परत जाण्याचा निर्णय घेते आणि पुस्तकाचा लेखक असलेल्या प्रीतम विद्रोहीला भेटते. पण, गोष्ट अशी असते की, प्रीतम विद्रोही हा पुस्तकाचा लेखक नसतो, पुस्तकाचा खरा लेखक चिराग दुबे (आयुष्यमान खुराना) असतो. तर प्रीतम त्याचा मित्र असतो. चिरागने हे पुस्तक खूप आधी त्याची गर्लफ्रेंड असलेल्या बबलीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर लिहिलेले असते. 

चिराग बिट्टीला भेटतो पण बिट्टीला जे पुस्तक आवडते त्याचा मीच खरा लेखक आहे, हे सांगण्याची त्याची हिंमत होत नाही. त्याऐवजी चिराग तिला सांगतो की, प्रीतम त्याचा मित्र आहे. शिवाय तिची सर्व पत्रे तो प्रीतमपर्यंत पोहोचवेल, असे आश्वासनही तिला देतो. पुढे प्रीतम आणि बिट्टी यांच्यात संवाद सुरू होतो. त्यानंतर बिट्टीला असे वाटते की, ती प्रीतमच्या प्रेमात पडली आहे. ती चिरागला प्रीतमशी भेट घडवून आणण्याची विनंती करते. त्यामुळे पेचात सापडलेला चिराग खºया प्रीतम विद्रोहीकडे (राजकुमार राव) जातो. त्याला बिट्टीची भेट घेण्यासाठी जबरदस्ती करतो. त्यासोबत तो प्रीतम विद्रोहीला असे वागायला सांगतो की, ज्यामुळे बिट्टी त्याचा द्वेष करेल. पण, गोष्टी पुढे आणखीनच किचकट होत जातात. बिट्टी प्रीतमला भेटते आणि त्याचा द्वेष करण्याऐवजी त्याच्या आणखी जवळ जाऊ लागते. तिचे पालकही प्रीतमकडे योग्य मुलगा म्हणून बघू लागतात. यासर्व गोंधळात कथेत अनेक वळणं येतात. कथेचा शेवट सुखकर होतो. 

कथा गुंतागुंतीची असली तरी, गोड आणि उत्साही आहे. कुठेही अनावश्यक भांडणं किंवा नाट्यमयता दिसत नाही. अशा कथांमध्ये भूमिका कोण निभावणार, यावरच कथानकाचे यश असते. पंकज त्रिपाठी, सीमा भार्गव यांनी बिट्टीच्या पालकांची भूमिका चोख निभावली आहे. चिरागचा बेस्ट फ्रेंड दाखविताना दोघांमधील संवादाचा समन्वय चित्रपटात उठून दिसतो. संपूर्ण चित्रपट क्रितीने निभावलेल्या बिट्टी या पात्राच्या अवतीभोवती फिरतो. क्रितीने तिची भूमिका उत्कृष्टपणे निभावली आहे. पण ती एका छोट्या शहरातील मुलगी म्हणून दिसण्यातून आणि संवादातून कमी पडते. ‘निल बट्टे सन्नाटा’ या यशस्वी चित्रपटानंतर अश्विनी अय्यर-तिवारी यांनी आणखी एक मनोरंजनात्मक चित्रपट आपल्यासमोर आणला आहे. राजकुमार राव आणि आयुष्यमान खुराना हे या चित्रपटाचे प्रबळ स्थानं आहेत. या दोघांमुळेच ‘बरेली की बर्फी’ हा पुरेपूर मनोरंजन करणारा चित्रपट वाटतो. तुम्हाला जर असेच हलकेफुलके चित्रपट आवडत असतील, तर ही संधी गमावू नका !

Web Title: Review : प्रेमाचा गोडवा आणि कॉमेडीचा तडका म्हणजेच ‘बरेली की बर्फी’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.