OMERTA MOVIE REVIEW : एका दहशतवाद्याचा बायोपिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 04:41 PM2018-05-03T16:41:40+5:302018-05-03T23:45:40+5:30

‘ओमेर्टा’ या चित्रपटाची संकल्पना आणि विषय खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. हा चित्रपट का बघावा, असा प्रश्न जर मनात उपस्थित होत असेल तर ‘एका दहशतवाद्याचा बायोपिक’ असे एका वाक्यात चित्रपटाबद्दलचे वर्णन करता येईल.

OMERTA MOVIE REVIEW : एका दहशतवाद्याचा बायोपिक | OMERTA MOVIE REVIEW : एका दहशतवाद्याचा बायोपिक

OMERTA MOVIE REVIEW : एका दहशतवाद्याचा बायोपिक

googlenewsNext
Release Date: May 03,2018Language: हिंदी
Cast: राजकुमार राव, राजेश तेलांग, टिमोथी रायन, केवल अरोरा, ब्लेक एलन
Producer: शैलेश आर. सिंग, नाहिद खानDirector: हंसल मेहता
Duration: १ तास ३६ मिनिटGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>जान्हवी सामंत

‘ओमेर्टा’ या चित्रपटाची संकल्पना आणि विषय खूपच कुतूहल निर्माण करणारा आहे. हा चित्रपट का बघावा, असा प्रश्न जर मनात उपस्थित होत असेल तर ‘एका दहशतवाद्याचा बायोपिक’ असे एका वाक्यात चित्रपटाबद्दलचे वर्णन करता येईल.  या चित्रपटाच्या माध्यमातून ‘शाहिद’चे दिग्दर्शक हंसल मेहता यांच्याकडून आणखी एक कॉन्ट्रोव्हर्शियल बायोपिक बघावयास मिळणार असल्याने ‘ओमेर्टा’विषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. 

‘ओमेर्टा’ची कथा ब्रिटन येथील कुविख्यात दहशतवादी अहमद ओमर सईद शेख (राजकुमार) याच्यावर आधारित आहे. लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्सचा अतिशय हुशार विद्यार्थी असलेला ओमर बोसनिया येथे मुस्लिमांवर झालेल्या अत्याचारामुळे खूप व्यथित असतो. बरेच शांतीवादी विरोध प्रदर्शने करूनही परिस्थितीमध्ये सुधारणा न झाल्यामुळे एकलकोंडा राहणारा ओमर हिंसेचा मार्गावर चालण्याचा विचार करू लागतो. आपल्या मुस्लीम बांधवांना आपण वाचवले पाहिजे, या मानसिकतेने ओमर दहशतवादाच्या मार्गावर गेलेल्या मित्रांच्या संपर्कात येतो. पुढे तो वडिलांच्या इच्छेविरोधात आपले शिक्षण अर्धवट सोडून पाकिस्तानला मिलिटरी ट्रेनिंगसाठी निघतो. 

ट्रेनिंगमध्ये काश्मीरच्या तरुणांना भेटून त्यांच्यावर झालेले अत्याचार ऐकून तो अजूनच जिद्दीला पेटतो. तो हुशार असल्यामुळे यात त्याची प्रगतीही झपाट्याने होते. १९९४ मध्ये नवी दिल्ली येथून चार विदेशी पर्यटकांचे अपहरण करण्याच्या कटात त्याला अटक होते. परंतु १९९९ मध्ये तालिबान्यांकडून इंडियन एअरलाइन्स ८१४ हायजॅक केले जाते. तसेच काही दहशतवाद्यांसह ओमरच्या सुटकेची मागणी त्यांच्याकडून केली जाते. सुटकेनंतर ओमरचा रुतबा आणि मनोबल आणखीनच वाढते. पुढे २००२ मध्ये तो पाकिस्तानात अमेरिकन वॉल स्ट्रिट जनरलचे पत्रकार डॅनियल पर्ल (टिमोथी रायन) यांचे अपहरण आणि हत्या घडवून आणतो. या गुन्ह्यात ओमरला फाशीची शिक्षा सुनावली जाते. मात्र अजूनही त्याच्या फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी झालेली नाही. 

मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातही ओमरचा हात होता. अजूनही तो कारागृहातून दहशतवादी कारवाया करीत असल्याचे चित्रपटातून दर्शविण्यात आले आहे. दरम्यान, दहशतवादी कसा बनतो? चूक आणि बरोबर याची जाण कुठे आणि कशी चुकते? माणुसकीची जाणीव कुठल्या टप्प्याला नाहिशी होते? असे बरेचसे प्रश्न हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात उभे करतो. त्यामुळेच चित्रपटाची संकल्पना जरी उत्तम असली तरी, तो मनोरंजक किंवा गहन ठरत नाही. कारण चित्रपटाची कथा वरवर एका विशिष्ट पातळीवर सांगितल्यासारखी वाटते. ओमरचा दहशतवाद स्वीकारण्यामागचे विचार, त्याच्या मनातील संकोच आणि निश्चिय चित्रपट रोखू शकत नाही.

चित्रपटाची कथा सांगण्याची पद्धत अगदीच रसहीन आणि माहितीपटासारखी असल्याने कुठल्याच टप्प्यावर चित्रपट मनोरंजक ठरत नाही. उमरच्या आयुष्यातील इतर पैलू, त्याचे पालक, पत्नी आणि दहशतवादी सहकाºयांवर चित्रपटात काहीच भाष्य केले गेले नाही. चित्रपटातील काही दृश्य तर खूपच घाईने चित्रित केले असून, डायलॉगही अस्ताव्यस्त आहेत. या सगळ्यांमुळे ‘ओमेर्टा’ हा चित्रपट खूपच कंटाळवाणा होऊन जातो. 

Web Title: OMERTA MOVIE REVIEW : एका दहशतवाद्याचा बायोपिक

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.