Namaste England Review: नुसताच उथळपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 11:03 AM2018-10-19T11:03:03+5:302023-08-08T20:35:32+5:30

अर्जुन कपूर- परिणीती चोप्राची हिट जोडी आणि बॉलिवूड चाहत्यांना हवा असलेला मसाला असे सगळे असूनही हा चित्रपट परिणाम साधत नाही.

Namaste England Review | Namaste England Review: नुसताच उथळपणा

Namaste England Review: नुसताच उथळपणा

Release Date: October 18,2018Language: हिंदी
Cast: अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, सतीश कौशिक
Producer: रिलायन्स इंटरटेनमेंट Director: विपुल शाह
Duration: २ तास १५ मिनिटेGenre:
लोकमत रेटिंग्स

- जितेन्द्रकुमार

नमस्ते इंग्लंड’ हा २००७ मध्ये आलेल्या ‘नमस्ते लंडन’चा सीक्वल आहे. अर्जुन कपूर- परिणीती चोप्राची हिट जोडी आणि बॉलिवूड चाहत्यांना हवा असलेला मसाला असे सगळे असूनही हा चित्रपट परिणाम साधत नाही. कारण स्पष्ट आहे, चित्रपटात सगळेचं वरवरचे आहे आणि हाच उथळपणा चित्रपटाला घेऊन डुबला आहे.
चित्रपटाची कथा सुरू होते, पंजाबातून. येथे परम (अर्जुन कपूर) आणि जसमीत (परिणीती चोप्रा) वर्षभर एकमेकांकडे चोरून-लपून बघतात आणि नजरेनजरेत त्यांचे प्रेम बहरते. पंजाबातील एका गावातील अतिशय धनाढ्य घरातील हे दोघे अगदी फिल्मी स्टाईलने एकमेकांना भेटतात, पुढे त्यांचे लग्नही होते.  पण या लग्नाचा उद्देश काही वेगळाच असतो. जसमीतला ज्वेलरी डिझाईनमध्ये करिअर करायचे असते. पण तिच्या कुटुंबाला हे मान्य नसते. परम जसमीतला लग्नानंतर करिअर करण्यास परवानगी देतो आणि या एका गोष्टीसाठी ती परमसोबत लग्न करते. एकप्रकारे परमसोबत खोटे -खोटे लग्न करून जसमीत करिअरसाठी एकटी लंडनला लिघून जाते. जसमीतला परत आणण्यासाठी परमही अवैधरित्या लंडनमध्ये पोहोचतो. पण यात तो यशस्वी होतो की नाही, हे चित्रपट पाहिल्यानंतरचं तुम्हाला कळेल.
अर्जुन कपूर आणि परिणीती चोप्रा या दोघांनी ‘इश्कजादे’ या चित्रपटातून एकत्र डेब्यू केला होता. हा डेब्यू कमालीचा यशस्वी झाला होता. हीच जोडी पुन्हा एकत्र आल्याने ‘नमस्ते इंग्लंड’कडून सर्वांनाच अपेक्षा होत्या. पण तीच चावून चावून चोथा झालेली कथा आणि सादरीकरण यामुळे ही अपेक्षा भंगली, असेच म्हणावे लागेल.  ‘इश्कजादे’मधील अर्जुन-परीच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले होते. पण या चित्रपटात दोघांनीही निराशा केली आहे. ‘इश्कजादे’ त्यांची केमिस्ट्री या चित्रपटात कुठेच दिसत नाही; सध्या बॉलिवूड सिनेमा एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. त्यामुळे ‘नमस्ते इंग्लंड’सारख्या चित्रपटांसाठी लोकांकडे ना वेळ आहे, ना पैसा. हा चित्रपट साईन करताना अर्जुन-परीची निवड चुकली, असेच म्हणावे लागेल. ( ही चूक वेळीच दुरूस्त केली नाही तर दोघांच्याही करिअरची नौका डुंबण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही, हे सांगणे नकोच.) चित्रपटाची कथा पंजाबात सुरू होते आणि सलग तीन गाणी एकापाठोपाठ दिसतात. ही गाणी मनोरंजन करण्याऐवजी डुलक्या आणतात. जसमीत लंडनला रवाना होते आणि चित्रपटाला थोडा वेग येतो. चित्रपटाच्या दुस-या भागात लंडनमधील स्टोरी दिसते.  लंडनमधील लोकेशन प्रेमात पाडता. पण कथा आणि कथेचे सादरीकरण सुमार असल्याने सिनेमेटोग्राफी चित्रपटावर कुठलाच प्रभाव पाडत नाही. दिग्दर्शक विपुल शाह यांचे दिग्दर्शन खटकते, तितकेच अक्षय कुमारची कमतरताही जाणवते.
एकंदर चित्रपट वैताग आणतो.

Web Title: Namaste England Review

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.