‘मुबारकाँ’ म्हणजे कॉमेडीचा ओव्हरडोस!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 01:50 PM2017-07-28T13:50:15+5:302023-08-08T19:28:38+5:30

या चित्रपटातून त्यांनी ‘फॅमिली एंटरटेनर’ साकारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात ते फारशी यशस्वी होताना दिसत नाहीत. कारण चित्रपटातील कथेला पुढे नेत असताना तर्क आणि बुद्धीमत्ता यांचा लावलेला मेळ पाहूनच रसिकांना हसावं की रडावं असा प्रश्न पडतो.

'Mubarakan' means comedy overdose! | ‘मुबारकाँ’ म्हणजे कॉमेडीचा ओव्हरडोस!

‘मुबारकाँ’ म्हणजे कॉमेडीचा ओव्हरडोस!

Release Date: July 28,2017Language: हिंदी
Cast: अर्जुन कपूर,अनिल कपूर,आथिया शेट्टी,इलियाना डिक्रुज,नेहा शर्मा,राहुल देव
Producer: अश्विन वरदेDirector: अनीस बज्मी
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>जान्हवी सामंत 

‘वेलकम’,‘सिंग इज किंग’,‘नो एन्ट्री’ यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दिग्दर्शक अनीस बज्मी पुन्हा एकदा ‘मुबारकॉँ’ मधून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या चित्रपटातून त्यांनी ‘फॅमिली एंटरटेनर’ साकारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात ते फारशी यशस्वी होताना दिसत नाहीत. कारण चित्रपटातील कथेला पुढे नेत असताना तर्क  आणि बुद्धीमत्ता यांचा लावलेला मेळ पाहूनच रसिकांना हसावं की रडावं असा प्रश्न पडतो. काही कॉमेडी सीन्स तर विनोदाची परिसीमा गाठतात. त्यामुळे ‘मुबारकाँ’ हा खऱ्या  अर्थाने कॉमेडीचा ओव्हरडोस वाटतो, जो कुणालाही पैसे खर्च करून घ्यायला आवडणार नाही. 

‘मुबारकाँ’ चित्रपटाची कथा ही करण आणि चरण या दोघा जुळ्या भावांभोवती फिरणारी आहे. ते लहानपणीच एकमेकांपासून दुरावलेले असतात. करण हा लंडनमध्ये त्याची आत्या जितो (रत्ना पाठक शाह) हिच्यासोबत राहत असतो. तर चरण त्याचा मामा बलदेव (पवन मल्होत्रा) यांच्यासोबत भारतात येतो. करणला स्विटी (इलियाना डिक्रुझ) आवडत असते. तर चरणचे नफिसा (नेहा शर्मा) वर प्रेम असते. मात्र, करणच्या बुवाला वाटत असते की, करणने तिची मैत्रीण संधूची मुलगी बिंकल (अथिया शेट्टी) हिच्यासोबत लग्न करावे. करण त्याच्या बुवाला सांगतो की, बिंकलचे लग्न तुम्ही साध्याभोळ्या चरणसोबत करा. दरम्यान, चरणने नफिसाला लग्नाचे आश्वासन दिलेले असते. पण, त्याचा रागीट मामा बलदेवला तो हे सांगू शकत नाही. त्यामुळे बिंकलला बघायला लंडनला जायला तयार होतो. चरण त्याच्या अडचणी त्याचा अविवाहित आणि स्मार्ट काका कर्तार सिंग (अनिल कपूर) ला सांगतो. कर्तार मग यावर एक पर्याय काढतो. ‘चरण हा बिंकलसाठी योग्य वर नाही,’ असे आपण बिंकलच्या कुटुंबियांसमोर भासवू, असे सुचवतो. यातूनच पुढे मग सुरू होते कॉमेडीची धम्माल.. कोण कुणाशी लग्न करणार हा संभ्रम त्यांच्याप्रमाणेच प्रेक्षकांनाही पडतो. कर्तार सिंगचे अनेक पर्याय त्यांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. चित्रपटाच्या अखेरीस ते एकत्र येतात. 

चित्रपटाची कथा एखाद्या पेपर डोश्याप्रमाणे वाटते. एकाच घासात ते संपते. बज्मी यांच्या टिपीकल चित्रपटाप्रमाणे ‘मुबारकाँ’ हा देखील बऱ्यापैकी एंटरटेन करतो. पण, एक  क्षण असा येतो की, पडद्यावरची कॉमेडी, जोक्स हे फारच उथळ वाटू लागतात. कलाकारांची एकमेकांसोबत कुठलीही बाँण्डिंग दिसून येत नाही. या कलाकारांचा जो काही गोंधळ सुरू असतो, तो नेमका कशासाठी ? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो. चित्रपटाचा पहिला भाग हा मनोरंजक वाटतो. पण, दुसरा भाग कुठेतरी भरकटतोय असे वाटते. तरीही, रत्ना पाठक-शाह, पवन मल्होत्रा आणि अनिल कपूर यांचा अभिनय नेहमीप्रमाणेच अतिशय उत्तम आहे. अर्जुन कपूरनेही दुहेरी भूमिका साकारण्याचे आव्हान पेलले यातच त्याचे कौतुक वाटते. तसेच इलियाना आणि अथिया या दोघींनीही चांगला अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. तुमच्याकडे जर दुसरा कुठला आॅप्शन नसेल तरच ‘मुबारकाँ’ बघण्यास हरकत नाही. 

Web Title: 'Mubarakan' means comedy overdose!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.