Baaghi 2 movie review : टायगरची वन मॅन आर्मी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 08:40 AM2018-03-30T08:40:17+5:302023-08-08T19:16:16+5:30

​स्टंट आणि अॅक्शनचा भडीमार हे टायगर श्रॉफच्या सिनेमातील ठरलेली गोष्ट. आजवर रुपेरी पडद्यावरील टायगरच्या प्रत्येक सिनेमात रसिकांना हेच पाहायला मिळालं. बागी-२ हा सिनेमाही या गोष्टीला अपवाद नाही.

Baaghi 2 movie review: Tiger's One Man Army | Baaghi 2 movie review : टायगरची वन मॅन आर्मी

Baaghi 2 movie review : टायगरची वन मॅन आर्मी

Release Date: March 30,2018Language: हिंदी
Cast: टायगर श्रॉफ, दिशा पटानी, प्रतिक बब्बर
Producer: साजिद नाडियाडवालाDirector: अहमद खान
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स
ong>सुवर्णा जैन

स्टंट आणि अॅक्शनचा भडीमार हे टायगर श्रॉफच्या सिनेमातील ठरलेली गोष्ट. आजवर रुपेरी पडद्यावरील टायगरच्या प्रत्येक सिनेमात रसिकांना हेच पाहायला मिळालं. बागी-२ हा सिनेमाही या गोष्टीला अपवाद नाही. सलमान खानला त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात बागी या सिनेमाने उभारी दिली होती. हाच बागी सिनेमा आता नव्या रुपात आणि नव्या ढंगात रसिकांच्या भेटीला आला आहे. बागी-1 या सिनेमाचा सिक्वेल म्हणजेच बागी-2 हा सिनेमा. तेलुगू सिनेमा क्षणमचा रिमेक आहे.

रॉनी अर्थात टायगर श्रॉफ हा एक काश्मीरमधील एक लष्करी अधिकारी आहे. आपल्या प्रेयसी (नेहा अर्थात दिशा)च्या सांगण्यावरुन अपहरण झालेल्या मुलीला शोधण्याची जबाबदारी रॉनीने उचलली आहे. अपहरणकर्त्या मुलीचा शोध घेत असताना रॉनी आणि दिशाचा आमनासामना गोव्यातील ड्रग माफिया आणि गुंडांशी होतो. या गुंडाचा सामना करताना धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळते. एअर स्ट्राईक, बॉम्बचा मारा, चाकू हल्ला, सारं काही रक्तरंजित पाहायला मिळतं. हे सगळं घडत असतानाच रॉनी आणि नेहामध्ये प्रेमांकुर फुलू लागतात. टायगर आणि दिशाचा रोमान्स रसिकांना खिळवून ठेवतो. मात्र अपहरण झालेल्या मुलीची सुटका करण्यात टायगर आणि दिशा यशस्वी होतात का?, माफिया आणि गुंडांचं साम्राज्य उद्धवस्त होतं का?, टायगर आणि दिशा या दोघांच्या लव्ह स्टोरीचं काय होतं या सगळ्याची उत्तरं बागी-2 या सिनेमात मिळतील. या सिनेमाचं खास आकर्षण आहे तो टायगर. या सिनेमात चॉकलेट बॉयपेक्षा टायगर मॅचोमॅन जास्त वाटतो. या सिनेमातील अॅक्शन पॉवरपॅक्ड असून त्याला टायगरने पुरेपूर न्याय दिला आहे. तुम्हाला अॅक्शन पाहायची इच्छा असेन तर बागी-2 उत्तम पर्याय ठरु शकतो. अॅक्सनसह स्टंट, रोमान्स, गाणी, इमोशन्स असा मनोरंजनाचा सगळा मसाला या सिनेमात आहे. सिनेमाचे डायलॉग्सही रसिकांच्या ओठावर लगेच रेंगाळतील असेच आहेत. प्रतीक बब्बर, रणदीप हुडा, मनोज वाजपेयी निगेटिव्ह भूमिकेत असले तरी सिनेमाच्या कथेत त्यांनी आपल्या अभिनयाने जीव ओतला आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. टायगर आणि प्रतीक बब्बरला एकमेंकासमोर उभं करणं हा दिग्दर्शक अहमद खानचा प्रयत्न धाडसी म्हणावा लागेल. नायकाची गर्लफ्रेंड या पलीकडे दिशा पटनीला या सिनेमात काही करण्यासारखं नव्हतं. त्यामुळे तिच्याकडून तुमच्या विशेष अपेक्षा असतील तर तुमचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. टायगर श्रॉफचा आर्मी मॅनचा अवतार मात्र लक्षवेधी ठरतो. सिनेमाचा सेट, इफेक्ट्स आणि कॅमेरा वर्क यामुळे बागी-2 हा सिनेमा एकदा तरी पाहायला हरकत नाही. सिनेमाच्या संगीत ठिकठाक आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. संगीत आणि गाण्यांबाबत ‘जुनी दारु नवी बाटली’ हा प्रयोग फसला आहे. धकधक गर्ल माधुरीचे इक दो तीन हे गाणं नव्या अंदाजात सादर करण्यात आलं. मात्र जॅकलिनला माधुरीच्या मोहिनीची सर काही आलेली नाही. ओ साथी..हे गाणंही नव्या रुपात सादर करण्यात आलं. हा प्रयत्न ठीक होता असं म्हणावं लागेल. सिनेमाचं टायटल गीत जोश निर्माण करणारं आणि उत्साहवर्धक आहे. सिनेमाचं संगीत एकदा ऐकण्यासारखं आहे. मात्र या सिनेमाचं आकर्षण ठरतं ते फक्त टायगरचा मॅचो अंदाज. त्यामुळे टायगरचे स्टंट्स आणि अॅक्शन पाहण्यासाठी हा सिनेमा एकदा थिएटरला जाऊन पाहावा असा आहे. त्यामुळे बागी-2 सिनेमाला वन मॅन आर्मी असं म्हणावे लागेल.

Web Title: Baaghi 2 movie review: Tiger's One Man Army

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.