(Image Credit : fineartamerica.com)

अलिकडे तरूणाईमध्ये प्रेमाच्या गप्पा करण्यासाठी वेगवेगळे नवे आणि न कळणारे शब्द वापरले जातात. तुम्हीही कधी गर्लफ्रेन्डसोबत चॅट करताना किंवा ग्रुपमध्ये मित्रांसोबत चॅट करताना अनेकदा 'XOXO' शब्द वापरला असेल. जर तुम्ही हा शब्द वापरला नसेल तर निदान ऐकला तरी असेलच. याचा अर्थ होतो  'Hugs आणि Kisses'. पण का? मिठीची मारण्याची आणि किस करण्याची भावना व्यक्त करण्यासाठी 'X' आणि 'O' यांचाच वापर का केला गेलाय? असा प्रश्न अनेकांना पडतो. 

खरंतर मध्यकाळात जे लोक लिहू किंवा वाचू शकत नव्हते, ते लोक 'X' चा वापर 'येशूच्या नावाने, हे सत्य आहे' किंवा 'In Christ’s name, it’s true' हे म्हणण्यासाठी करत होते. ख्रिश्नच मानतात की, 'X' अक्षर त्यांच्यासाठी पवित्र आहे. कारण याकडे निरखून पाहिलं तर हे अक्षर येशूच्या क्रॉससारखा दिसतो. इतकेच नाही तर ग्रीक भाषेत क्राइस्टचं नाव ΧΡΙΣΤΟΣ (Xristos) आहे. जे 'X' ने सुरू होतं. 

(Image Credit : Pixabay)

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, ख्रिश्चन लोक हे बायबलवरील 'X' ला किस करतात. ज्याचा अर्थ हा आहे की, या पवित्र ग्रंथात जे लिहिलं आहे ते सत्य आहे. आमचा इसा मसीहवर विश्वास आहे. त्यामुळेच कदाचित ख्रिश्चन लोक ख्रिसमसला शॉर्टमध्ये 'Xmas'  म्हणतात. 

Image result for XOXO gif

ऑक्सफोर्ड डिक्सनरीमध्ये पहिल्यांदाच 'X' चा अर्थ 'किस' आहे. हे तेव्हा कळालं जेव्हा गिल्बर्ट धर्मगुरूंनी १७६३ मध्ये एक पत्र लिहिले होते. 

Madame, … In the whole it is best that I have been the loser [of a friendly bet], as it would not be safe in all appearances to receive even so much as a pin from your Hands.
I am with many a xxxxxxx and many a Pater noster (Our Father) and Ave Maria (Hail Mary), Gil. White.

तसं काही लोकांचं मत आहे की, 'X' चा अर्थ किस नाही. त्यांचं मत आहे की, 'X' चा अर्थ आशीर्वाद आहे. मात्र इंग्लंडचे माजी पंतप्रधान विंस्टन चर्चिल यांनीही एकदा एका पत्रात तीन Xs सोबत तीन किस पाठवले होते.

(Image Credit : www.saywhydoi.com)

Please excuse bad writing as I am in an awful hurry. (Many kisses.) xxx WSC.

अशीही मान्यता आहे की, 'X' याकडे व्यवस्थित पाहिलं तर होन व्यक्ती किस करत असल्यासारखं दिसतं. 

(Image Credit : www.scoopwhoop.com)

खरंतर 'X' चा वापर किससाठी का करतात हे काही स्पष्टपणे लक्षात आलं नाही. पण मग आता दुसरा प्रश्न शिल्लक राहतो की, 'Hug' साठी 'O' चा वापर का केला जातो. 

यामागचंही लॉजिक जरा कमजोर आहे. काही लोकांना वाटतं की, ख्रिश्मन लोक जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेत आले होते, तेव्हा ते त्यांच्या कागदपत्रांवर 'O' लिहित असत. कारण  'X' चा अर्थ होता की, ते येशू ख्रिस्तांना मानतात. 

Image result for hugs gif

एक मान्यता अशीही आहे की, 'O' वरून पाहिल्यावर दोन व्यक्ती गळाभेट घेत असल्यासारख दिसतो. पण हेही काही पटत नाही. तरूणाई या शब्दाचा वापर भलेही आपल्या भावना व्यक्ती करण्यासाठी करत असतील. पण या दोन शब्दांचा या दोन भावनांसाठी का वापर केला जातो. याचं लॉजिक काही स्पष्टपणे कळत नाही. असो शब्दांचं भावना महत्त्वाच्या असतात. हे तितकच खरं. 
 


Web Title: XOXO Means Hugs & Kisses, But Most People Don’t Know Why
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.