पुरुषांच्या या गोष्टींवर जास्त लक्ष देतात मुली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 12:52 PM2018-05-24T12:52:34+5:302018-05-24T12:52:34+5:30

तुमच्या बोलण्याच्या स्टाईलपासून ते तुमच्या कपड्यांच्या सेन्सपर्यंत त्या सगळंच नोटीस करतात. चला जाणून घेऊया अशाच काही गोष्टी...

Women always notice these things in Mens | पुरुषांच्या या गोष्टींवर जास्त लक्ष देतात मुली

पुरुषांच्या या गोष्टींवर जास्त लक्ष देतात मुली

Next

तुम्ही कधीना कधी ऐकलं असेल की, पुरुष पहिल्या भेटीत महिलांच्या अनेक गोष्टींना नोटीस करतात. त्याचप्रकारे महिलाही पुरुषांच्या काही गोष्टी नोटीस करतात. तुमच्या बोलण्याच्या स्टाईलपासून ते तुमच्या कपड्यांच्या सेन्सपर्यंत त्या सगळंच नोटीस करतात. चला जाणून घेऊया अशाच काही गोष्टी...

1) पोट - सायंटिफिक जनरल सेक्सिऑलॉजीमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार ही बाब समोर आली आहे की, मुली मुलांच्या बायसेप्सआधी पोटावर आधी लक्ष देतात. जर तुमचं पोट निघालेलं नसेल तर महिला तुमच्याकडे अधिक आकर्षित होतात. जर तसं असेत तर काहींना आवडत नाही.

2) लांब पाय - योग्य तेच वाचताय! यूनिव्हर्सिटी ऑफ कॅंब्रिजमध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून निष्कर्ष काढण्यात आला की, महिलांना पुरुषांचे लांब पाय अधिक आकर्षित करतात. या ऑनलाईन सर्व्हेमध्ये अमेरिकेतील 800 महिलांनी लांब पाय असलेल्या पुरुषांमध्ये जास्त इंटरेस्ट दाखवला. 

3) केस आणि दाढी - अनेकदा महिला या पुरुषांचे केस आणि दाढी नोटीस करतात. हा तुमच्या शरीरातील सर्वात वरचा भाग असतो आणि यावर आधी लक्ष जाणं स्वाभाविक आहे. पण महिलांना विस्कटलेले आणि घाणेरडे केस अजिबात आवडत नाही. पुरुषांच्या डोक्यावर शेंडी असणेही काही महिलांना पसंत नसतं.  

4) हात आणि नखं - महिला या तुमचे हात आणि नखंही नोटीस करतात. त्यांना घाणेरडे हात आणि नखं अजिबात आवडत नाही. त्यांना मुलांनी वाढवलेली नखेही पसंत पडत नाहीत.  

5) बॉडी लॅंग्वेज - मुलींचं या गोष्टीवर अधिक लक्ष असतं. तुम्ही कसे उभे राहता, तुमचं उठणं-बसणं कसं आहे. याकडे त्यांचं लक्ष असतं. कारण यातून तुमचा आत्मविश्वास दिसून येतो. मुलींना आत्मविश्वासू लोक अधिक पसंत असतात. 
 

Web Title: Women always notice these things in Mens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.