ब्रेकअप के बाद! या टिप्सच्या माध्यमातून तुमच्या एक्सला करा जीवनातून 'आऊट'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 11:34 AM2018-05-29T11:34:56+5:302018-05-29T11:37:23+5:30

अनेकजण स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की, सगळं काही ठिक होईल. काहीजण हे सगळं विसरुन पुढे जातात पण काहींना हे जमत नाही. त्यामुळे अशांसाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. 

Ways to forget your ex forever after breakup in Marathi | ब्रेकअप के बाद! या टिप्सच्या माध्यमातून तुमच्या एक्सला करा जीवनातून 'आऊट'

ब्रेकअप के बाद! या टिप्सच्या माध्यमातून तुमच्या एक्सला करा जीवनातून 'आऊट'

googlenewsNext

प्रेमाच्या नात्यात छोटी-छोटी भांडणं फार त्रासदायक नसतात. पण मोठे वाद हे नात्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. एकदा गमावलेल्या प्रेमात आणि नात्यात पुन्हा तोच गोडवा मिळवणे तसं कठिणच आहे. राग, विश्वासाची कमतरता, संशय घेणे यांसारख्या कारणांमुळे गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड ब्रेकअप करतात. कारण काहीही असो पण काहींसाठी ब्रेकअपनंतर स्वत:ला सांभाळणं सोपं नसतं. एकदा घेतलेल्या निर्णयानंतर अनेकजण स्वत:ला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की, सगळं काही ठिक होईल. काहीजण हे सगळं विसरुन पुढे जातात पण काहींना हे जमत नाही. त्यामुळे अशांसाठी आम्ही काही खास टिप्स घेऊन आलो आहोत. 

1) ब्लॉक करा

ब्रेकअप तुमच्याकडून झालं असो वा समोरच्या व्यक्तीकडून एकदा जर तुम्ही लाइफमध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला असेल तर मागे वळून पाहणे योग्य नाही. पण तरीही तुमचा भूतकाळ तुम्हाला त्रास देत असेल तर त्याला दूर करण्यासाठी मनाची तयारी केली पाहिजे. सर्वातआधी तुम्ही त्या व्यक्तीला तुमच्या सोशल मीडियाच्या फ्रेन्ड लिस्टमधून काढलं  पाहिजे. असे केल्यास तुम्हा दोघांमध्ये बोलणं होणार नाही, बोलायची इच्छा होणार नाही आणि दु:खं वाढणार नाहीत. 

2) नंबर डिलीट करा

जर सगळं संपलं आहेच तर मग एकमेकांच्या संपर्काच्या पद्धतीही बंद करायला हव्यात. तुमच्या फोनमधून त्यांचा/तिचा नंबर डिलिट करा. मुळात प्रेम कधी विसरता येत नाही. त्या आठवणी सतत येत असतात. अशात तुम्ही पुन्हा त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न करु शकता. त्यामुळे फोन नंबर डिलिट करायला हवा. एकदा घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा. 

3) फोटो, व्हिडीओही करा डिलिट

भलेही तुम्ही सोबत काढलेले फोटो, व्हिडीओ तुम्ही सोबत घालवलेल्या सुंदर क्षणांची आठवण करुन देत असतील, पण ब्रेकअपनंतर आठवणी केवळ दु:खं देतात. काहींसाठी हे सामान्यही असेल पण काही लोकांना हे हॅन्डल करणं फार कठिण जातं. त्यामुळे त्या आठवणी न ठेवलेल्याच बऱ्या.

4) भूतकाळात डोकावणे बंद करा 

जर तुम्हाला खरंच तुमच्या एक्सला विसरायचं असेल तर सर्वातआधी तुमच्या मनाला समजवा आणि आपल्या भूतकाळात डोकावणे बंद करा. काही लोक हे ब्रेकअपनंतरही आपल्या एक्सचे प्रोफाईल आणि एक्सच्या मित्राचे सोशल मीडिया प्रोफाईल चेक करतात. पण याने काहाही मिळणार नाहीये. उलट तुमचा त्रास वाढेल. 

5) स्वत:ला बिझी ठेवा

आपण स्वत:ला जितकं रिकामं ठेवू तितके जास्त तेच तेच विचार तुमच्या मनात येत राहतील. अशात आलेला एकटेपणा तुम्हाला फारच त्रायदायक ठरु शकतो. त्यामुळे स्वत:ला सतत बिझी ठेवा. जेणेकरुन ते विचार तुमच्या मनात येणार नाहीत. लाइफस्टाईलमध्येही बदल केल्यास तुम्हाला फायदा होईल. 

6) मित्रांना भेटा

काही लोक ब्रेकअपनंतर स्वत: एकटं करुन घेतात. ते कुणाशीही बोलत नाहीत. कुणातही मिसळत नाहीत. पण हे फारच चुकीचं आहे. तुम्ही घराबाहेर पडायला हवं. मित्रांना भेटायला हवं. त्यांच्यासोबत फिरायला जायलं हवा. असे केल्यास तुम्ही जुन्या गोष्टींना लवकर मागे सोडू शकाल.

7) नवीन मित्र बनवा

काही लोक हे आपल्या रिलेशनशिपच्या गोष्टी आपल्या मित्रांकडे शेअर करतात. अशात ब्रेकअपनंतर सतत त्या गोष्टी करणे तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे काही लोक आपल्या मित्रांना भेटणेही बंद करतात. अशावेळी नव्या ठिकाणी जा, नवीन मित्र बनवा. याने तुम्हाला नव्या गोष्टींचा अनुभव घेता येईल. 

Web Title: Ways to forget your ex forever after breakup in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.