VIDEO: You will definitely end up smoking by watching a 'Gul' video of Doctor Gulati! | VIDEO : ​डॉक्टर गुलाटीचा ‘हा’ व्हिडिओ पाहून तुमची दारू नक्की सुटेल !

कपिल शर्माच्या शो मधील डॉक्टर गुलाटी म्हणजे सुनील ग्रोवरला आपण ओळखतोच. नुकताच सुनील ग्रोवरने युट्यूबवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यात एका दारुड्याची भूमिका साकारताना दिसत आहे. मात्र या व्हिडिओद्वारे सुनीलने एक सामाजिक संदेशही दिला आहे.  

'बिल्ला शराबी' असे या व्हिडिओचे नाव असून हा व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे. या व्हिडिओत आवाज स्वत: सुनीलचा असून म्यूझिक डिरेक्टर अमित त्रिवेदी हे आहेत, अशी माहिती सुनीलने ट्विटद्वारे दिली आहे.  

हा व्हिडिओ शेअर करताना सुनील म्हटला की, दारू सोडण्यासाठी हा व्हिडिओ पुढील २० दिवस ३ वेळा पाहा, तुमची दारू सुटून जाईल. 
सुनीलच्या या सव्वा तीन मिनीटाच्या व्हिडिओमध्ये त्याने दारुड्याची भूमिका केली आहे. यात आपल्या या वाईट सवयीमुळे सर्व ठिकाणी त्याला मार खावा लागतो. बिल्ला शराबी नावाच्या या व्यक्तीची प्रॉपर्टी विकली गेली आहे. बायको हैराण आहे, तर कोणी त्याला शिव्या देत आहे. पोलीस काठीने मारत आहे. नशेत टल्ली असलेल्या याला शुद्ध नाही किंवा आपण काय करतोय त्याचा पश्चताप नाही. 

तुम्ही जादूगार आहात. तुमच्यासोबत काम करण्याचा मान मिळाला असेही त्याने त्रिवेदी यांना उद्देशून म्हटले आहे. दरम्यान संगीतकार अमित त्रिवेदी यांनी या ट्विटचे उत्तर देण्यास उशिर केला नाही. ते म्हणाले, ‘सुनील ग्रोव्हर तुझ्यासोबत काम करणंही खूप मजेदार होतं. सुनील ग्रोव्हर तू अलौकिक आहेस.’  
सुनील ग्रोव्हरने गाणे गाण्याची ही दुसरी वेळ आहे.  यापूर्वी त्याचे ‘मेरे हज्बैंड मुझको प्यार नहीं करते’हे गाणे हिट ठरले होते. याप्रकारे हे दुसरे गाणे देखील धमाकेदार असेल अशी आशा आहे.   

कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या वादामुळे सुनीलने कपिल शर्माचा कॉमेडी शो ला सोडचिठ्ठी दिली. यामुळे सुनीलचे बरेच चाहतेही नाराज झाल्यामुळे शो वर बराच परिणाम दिसून आला.  


Web Title: VIDEO: You will definitely end up smoking by watching a 'Gul' video of Doctor Gulati!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.