#ValentineWeek : चॅाकलेट डेनिमित्त आपल्या व्हॅलेंटाईनसाठी चॉकलेटमध्ये 'हे' आहेत पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2018 01:12 PM2018-02-09T13:12:44+5:302018-02-09T14:36:17+5:30

चॉकलेट ही सर्वांच्या जिव्हाळ्याची गोष्ट. त्यातही चॉकलेट डेच्यानिमित्ताने आपल्या व्हॅलेंटाईनला देण्यासाठी तुम्हाला चॉकलेटमध्ये हे पर्याय उपलब्ध आहेत.

#ValentineWeek : options in chocolate on the occassion of chocolate day | #ValentineWeek : चॅाकलेट डेनिमित्त आपल्या व्हॅलेंटाईनसाठी चॉकलेटमध्ये 'हे' आहेत पर्याय

#ValentineWeek : चॅाकलेट डेनिमित्त आपल्या व्हॅलेंटाईनसाठी चॉकलेटमध्ये 'हे' आहेत पर्याय

Next
ठळक मुद्देअसं म्हणतात की एखाद्याच्या मनात खास  जागा मिळवायची असेल तर त्याचा मार्ग पोटातून सापडतो.  तुम्हीसुध्दा या चॉकलेट डेला ही गोष्ट लक्षात ठेवा. जर एखाद्या मुलीचं मन जिंकायचं असेल तर चॉकलेटशिवाय दुसरा पर्याय नाही. आज आम्ही चॅाकलेट डे साजरा करताना तुमची मदत म्हणून तुम्हाला काही पर्याय सुचवत आहोत.

मुंबई : व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस म्हणजे 'चॅाकलेट डे'. असं म्हणतात की एखाद्याच्या मनात खास  जागा मिळवायची असेल तर त्याचा मार्ग पोटातून सापडतो.  तुम्हीसुध्दा या चॉकलेट डेला ही गोष्ट लक्षात ठेवा. जर एखाद्या मुलीचं मन जिंकायचं असेल तर चॉकलेटशिवाय दुसरा पर्याय नाही. आज आम्ही चॅाकलेट डे साजरा करताना तुमची मदत म्हणून तुम्हाला काही पर्याय सुचवत आहोत. हे पर्याय बघा आणि त्यातूनच तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी एखादं परफेक्ट चॅाकलेट निवडा. ते तिला आवडलं तर या व्हॅलेंटाईन डेला तुम्ही सिंगल असण्याच्या शक्यता कमी होतील.

१) मिल्क चॅाकलेट

मिल्क चॅाकलेटमध्ये दुधाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते जिभेवर ठेवल्या ठेवल्या विरघळतं आणि सोबतच दुधाची चवही जिभेवर रेंगाळत राहते. जर तुमच्या प्रिय व्यक्तीने तुम्हाला एखादं मिल्क चॅाकलेट भेट दिलं असेल तर 'त्या'ला किंवा 'ती'ला तुम्ही आवडता हे नक्की.

२) फेरेरो रॅाचर

चवीला सगळ्यात उत्तम तसंच ड्रायफ्रुट्सचा थर असलेलं हे चॅाकलेट म्हणजे फेरेरो रॅाचर. हे चॅाकलेट चवीला उत्तम असतंच पण चॅाकलेटच्या बाहेरील आवरणामुळे हे सर्वांच्या आवडीचं असतं. या चॅाकलेटला बाहेरून असलेल्या सोनेरी रंगाच्या  कागदामुळे आपल्या प्रिय व्यक्तीला भेट देण्यासाठी ह्या चॅाकलेटची जास्त निवड केली जाते.

३) कोकोनट चॅाकलेट

 चॅाकलेट आतून खोबरं आणि दुधाच्या मिश्रणाने बनवलेलं असतं. खोबऱ्यामुळे या चॅाकलेटचा गोडवा कमी होतो म्हणून आपल्या प्रिय व्यक्तीला जर जास्त गोड खाणं आवडत नसेल तर तुम्ही कोकोनट चॅाकलेटचा पर्याय निवडू शकता.

४) स्निकर्स

स्निकर्स हे सध्या अनेकांचं आवडतं आणि प्रसिद्ध चॅाकलेट आहे. हे चॅाकलेट कॅरॅमल, बदाम आणि शेंगदाण्यापासून बनवलं जातं. भारतात या चॅाकलेटची किंमत थोडी जास्त असली तरी तुम्ही आपल्या व्हॅलेंटाईनसाठी इतकं तर करूच शकता.

५) हेझलनट चॅाकलेट

हेझलनट हे चॅाकलेटप्रेमींचं सर्वात आवडतं चॅाकलेट आहे. या चॅाकलेटचं नाव एकल्यावरच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं कारण हे चॅाकलेट चवीला उत्तम लागतं. पण चॅाकलेट डेव्यतिरिक्त इतर दिवशीही तुम्ही हे चॉकलेट कुणाला दिलंत तर समोरचा व्यक्ती तुमच्यावर खुष होऊन जातो.

६) डार्क चॅाकलेट

चवीला थोडं कडू असलेलं हे डार्क चॅाकलेट जर तुम्हाला कोणी दिलं तर 'ती'ला किंवा 'त्या'ला तुम्ही जगातली सगळ्यात जवळची व्यक्ती आहात असं वाटत असणार. म्हणून जर व्हॅलेंटाईन वीक सेलिब्रेट करत असाल तर तुमच्या प्रिय व्यक्तीला चॅाकलेट डेला डार्क चॅाकलेट नक्की भेट द्या.

७) गॅलेक्सी चॅाकलेट

अत्यंत मऊ आणि पटकन विरघळणारं हे चॅाकलेट म्हणजे गॅलेक्सी चॅाकलेट. क्रिम आणि चॉकलेटच्या मिश्रणामुळे हे चॅाकलेट तुम्हाला लगेच संपवावसं वाटतं. तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला जर चॅाकलेट डेला आनंदी करायचं असेल तर गॅलेक्सी चॅाकलेट नक्की दया.

८) लिकर चॉकलेट

एखाद्या मुलाला चॉकलेट द्यायची  इच्छा असेल पण त्याला ते आवडेल की नाही अशी शंका असेल तर मुली यादिवशी कचरतात. मग एक काम करा, त्याला लिकर चॉकलेट भेट द्या. त्यातही त्याला आवडणाऱ्या लिकरचे पर्यायही तुम्हाला उपलब्ध आहेत. चॉकलेट डेला त्याला काही दिल्याचं समाधानही तुम्हाला मिळेल आणि तोही खुश होईल.

आम्ही तुम्हाला चॉकलेटचे हे अनेक पर्याय तर दिले आहेत, यातून तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी योग्य पर्याय निवडा आणि तिला गिफ्ट करा.  त्या चॉकलेटमधला गो़डवा आणि एकत्र चिकटून राहण्याची वैशिष्ट तुमच्या दोघांतही येतील. 

Web Title: #ValentineWeek : options in chocolate on the occassion of chocolate day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.