Valentines Day 2018 : फुलांच्या सुगंधाने दरवळणार नात्यातील प्रेम!, वाचा व्हॅलेंटाईन सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे महत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 11:36 AM2018-02-07T11:36:38+5:302018-02-07T13:29:53+5:30

वर्षापासून हृदयात साठवून ठेवलेले प्रेम या दिवसाच्या निमित्ताने फुलांच्या सुगंधाने दरवळणार आहे. तशी तयारीही तरुणाईने केली आहे.

ValentineDay2018: The Love of Relatives in the Flowering Scent, Read the Importance of Every Day of Valentine's Week | Valentines Day 2018 : फुलांच्या सुगंधाने दरवळणार नात्यातील प्रेम!, वाचा व्हॅलेंटाईन सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे महत्व

Valentines Day 2018 : फुलांच्या सुगंधाने दरवळणार नात्यातील प्रेम!, वाचा व्हॅलेंटाईन सप्ताहातील प्रत्येक दिवसाचे महत्व

Next

पुणे : प्रत्येक दिवस तसा प्रेमाचाच; परंतु व्हॅलेंटाईन सप्ताहाचे एक वेगळेच महत्त्व आणि आकर्षण. आपल्या जोडीदाराला फूल दिल्यावर तर यात आणखीनच बहार येते. हाच फूल देण्याचा दिवस म्हणजे ‘रोझ डे’. व्हॅलेंटाईन सप्ताहाची सुरुवातही याच दिवसाने होते. या सप्ताहातील पहिला दिवस बुधवारी आहे. वर्षापासून हृदयात साठवून ठेवलेले प्रेम या दिवसाच्या निमित्ताने फुलांच्या सुगंधाने दरवळणार आहे. तशी तयारीही तरुणाईने केली आहे.

व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात : तरुणाईचा उत्साह शिगेला
प्रेमवीरांचा आवडता सप्ताह म्हणजे व्हॅलेंटाईन. या सप्ताहातील विविध सात दिवस तरुणाई आपल्या प्रिय व्यक्तीसोबत आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करते. आपल्या ‘प्रेमा’ची आठवण म्हणून अनेक जण फूल देतात. फुले मन जोडण्याचे काम करतात; म्हणून सप्ताहाची सुरुवात ‘रोझ डे’ने झाली. तरुणाईबरोबरच मोठे लोकही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. प्रत्येक गुलाब आपला वेगळा भाव आणि त्यातील ‘प्रेम’ प्रदर्शित करीत असतो. आपल्या-आपल्या पद्धतीने फुले निवडून व्हॅलेंटाईन सप्ताहातील पहिला ‘रोझ डे’ साजरा करण्यासाठी पुण्यामधील तरुणाई सज्ज झाली आहे. 

७ फेब्रुवारी : रोज डे : मन जोडणारे फूल!
प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येकच दिवस प्रेमाचाच असतो; पण तरीदेखील व्हॅलेंटाईन डेचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते! प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात. म्हणून तर एखाद्या रुग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात? फूल देण्यामागचा अर्थ काय? यातून काय संदेश मिळतो? हे जाणून घेऊ आणि आपणही रंगीबेरंगी गुलाबांसोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करू या.

  • रोझ डे : पूर्वीचा अनुभव पाहता, बाजारपेठेत लाल गुलाबाला अधिक मागणी असते. तरुणाईची मागणी पाहता, फूलविक्रेत्यांनीही गुलाबाची जास्त आवक केल्याचे समजते.
  • पांढरा गुलाब : आयुष्यात कोणी तरी येणार, असा संदेश देतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीला आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ पे्रमाचे प्रतीक मानले जाते.
  • लाल गुलाब : लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ हा संदेश लाल गुलाब देतो. हा रंग प्रेमाचा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात.
  • पिवळा गुलाब : माझ्याशी मैत्री करशील काय? हे जणू हा गुलाब विचारतो. हा गुलाब मैत्रीचे संकेत देतो. यात आनंद सामावलेला असतो. हे फूल देणे म्हणजे ‘तू माझा जिवलग होतास, होतीस आणि कायमस्वरूपी राहशील.’ अनोळखी व्यक्तीला हा गुलाब दिलात तर ही मैत्रीची सुरुवात मानली जाते.
  • गुलाबी गुलाब : हा रंग प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत असेल तर त्याला हा गुलाब दिला जातो. ‘तू मला आवडतोस, आवडतेस’ हा संकेत हे गुलाब देते.


८ फेब्रुवारी : प्रपोज डे : फर्स्ट इम्प्रेशन - लास्ट इम्प्रेशन
काय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग 'व्हॅलेंटाइन डे'ची वाट बघताय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे; पण ती तोपर्यंत थांबली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? 'प्रपोज' करायला? अरे थांबा-थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा! तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा हा अति उत्साह महागात पडू शकतो. प्रत्येक शब्द तोलूनमोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व लक्षात ठेवा.

९ फेब्रुवारी : चॉकलेट डे : 

काही गोड होऊन जाऊ दे, कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले पाहिजे. म्हणूनच ‘चॉकलेट डे’ साजरा केला जात असावा. चॉकलेट डे व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस असतो, जो प्रत्येक वर्षी ९ फेब्रुवारीला फारच जुनून आणि आनंदाने सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगुले आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, व्हॅलेंटाईन इत्यादींसोबत चॉकलेटचा डब्बा देणे आणि घेणे पसंत करते. या देशातील युवा एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात.

१० फेब्रुवारी : टेडी डे :  

जोडपे आणि युवा व्हॅलेंटाईन आठवड्याच्या या सणाला फारच सुंदररीत्या साजरे करतात. या दिवशी लोक आपल्या आवडत्या लोकांना सुंदर टेडी गिफ्ट देऊन आपल्या प्रेमाची जाणीव करून देतात. आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा टेडी आपली बायको, पार्टनर, नवरा आणि इतर आवडीच्या लोकांना देऊ शकता. तसे तर मुलींना टेडी फार पसंत असतात आणि मुलांनादेखील लोक टेडी बिअर गिफ्ट देतात.

११ फेब्रुवारी : प्रॉमिस डे : 

प्रेम नेहमी जबाबदारी आणि प्रामिसने केले जाते. या दिवशी एक नवीन प्रॉमिस करा आणि जुने प्रॉमिस पूर्ण करण्याचे प्रयत्न करा. या दिवशी आपल्या पार्टनरला तेच प्रॉमिस करा जे तुम्ही पूर्ण करू शकता.


१२ फेब्रुवारीला : हग डे : 

प्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे, याहून अधिक सुख काय असेल! त्याच्या कुशीत सर्व संसाराचे सुख, आनंद, विश्वास, अतूट बंधन आणि सुरक्षेची भावना मिळते.

१३ फेब्रुवारी : किस डे : 

या दिवशी आपल्या जोडीदाराला किंवा ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता तिला किस करा; पण हो त्यासाठी माऊथ फ्रेशनर खाणे विसरू नका.


१४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाईन डे : 

आता येतो एक स्पेशल दिवस, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीकडे आपले प्रेम प्रदर्शित करता. या दिवशी त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि प्रेमाच्या गोष्टी करा.
 

Web Title: ValentineDay2018: The Love of Relatives in the Flowering Scent, Read the Importance of Every Day of Valentine's Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.