#ValentineDay2018 : जर्मनीत ब्रेडवर तर डेन्मार्कमध्ये पांढऱ्या फुलांनी साजरा होतो व्हॅलेंटाईन डे, पाहा जगभरात कसं असतं सेलिब्रेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 06:27 PM2018-02-13T18:27:26+5:302018-02-13T18:57:59+5:30

जगभरात साजरा होणारा हा दिवस प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरा होत असतो. तिथली पध्दत एकच असली तरी स्वरुप वेगवेगळं असतं.

#ValentineDay2018: how contries around world celebrates valentine day | #ValentineDay2018 : जर्मनीत ब्रेडवर तर डेन्मार्कमध्ये पांढऱ्या फुलांनी साजरा होतो व्हॅलेंटाईन डे, पाहा जगभरात कसं असतं सेलिब्रेशन

#ValentineDay2018 : जर्मनीत ब्रेडवर तर डेन्मार्कमध्ये पांढऱ्या फुलांनी साजरा होतो व्हॅलेंटाईन डे, पाहा जगभरात कसं असतं सेलिब्रेशन

Next
ठळक मुद्देजर्मनीत ब्रेडवर मेसेज लिहून साजरा करतात व्हॅलेंटाईन्स डे.तर डेन्मार्कमध्ये यादिवशी पांढऱ्या रंगाची फुलं दिली जातात.आणि तसंच वेल्समध्ये नक्षीकाम केलेले लाकडी चमचे देऊन हा दिवस होतो साजरा.

मुंबई : प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येक दिवस प्रेमाचाच असतो. पण तरी देखील व्हॅलेंटाइन डेला एक वेगळं महत्त्व आहे. कारण दैनंदिन जीवनात आपल्या व्हॅलेंटाईनबाबत असलेल्या आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्याला संधी मिळत नाही, त्यामुळे व्हॅलेंटाईन वीकच्यानिमित्ताने ती संधी निर्माण केली जाते. जगभरात विविध ठिकाणी, विविध देशात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची वेगळी परंपरा आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी हे स्वरुप वेगळं असतं, एवढं मात्र नक्की. तसंच व्हॅलेंटाईन डे म्हटलं कि रोमँटिक डेट आली आणि खूप सारे गिफ्ट्स, सरप्रायजेस आणि प्रेम आलं. पण जगातील काही देशात व्हॅलेंटाईन डे हटके पद्धतीने साजरा करण्याची परंपरा दिसून येते. पाहूया त्यापैकी काही पध्दती.

१) जर्मनी

 एका मोठ्या हार्टशेप्ड ब्रेडवर खास मेसेज लिहून व्हॅलेंटाईनला गिफ्ट करणं ही जर्मनीची संस्क्रती आहे. तसंच इतर देशांसारखं तिथंही तरुणाई आपल्या मित्र-मैत्रिणींसह व पार्टनरसह हा दिवस साजरा करतात.

आणखी वाचा - ValentineDay2018 : गुलाबाच्या वेगवेगळ्या रंगांची काय असतात वैशिष्ट्ये, विचार करुन द्या आवडत्या व्यक्तीला गुलाब

२) डेन्मार्क

डेन्मार्कमध्ये आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी लाल गुलाब देत नाहीत. तर या देशात पांढऱ्या रंगाच्या फुलाला महत्त्व देतात. ते फुल म्हणजे 'स्नो ड्रॅाप'. त्याचबरोबर इकडे 'गेक्कीब्रव' नावाचं गुपित पत्र वाटण्याची परंपरादेखील आहे. त्यामध्ये एखादी व्यक्ती मुलीला पत्र पाठवते व त्या मुलीने पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अचूक ओळखल्यास तिला बक्षिसही दिलं जातं.

३) वेल्स

वेल्समध्येही वेगळ्याप्रकारे व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट केला जातो. वेल्समध्ये हाताने हदयाच्या आकाराचं नक्षीकाम केलेले चमचे गिफ्ट म्हणून दिले जातात. आपल्याकडे जसं दसऱ्याला आपट्याची पानं वाटतात, अगदी तसंच. नातेवाईक, कुटूंबिय आणि मित्र-मैत्रिणींमध्ये हे चमचे वाटले जातात. 

आणखी वाचा - 'Valentine's day' चे आठ हटके फंडे, आपल्या जोडीदाराला करा इम्प्रेस

४) स्लोवेनिया

स्लोवेनिया या देशाचे 'सेंट व्हॅलेंटाईन' हे अध्यात्मिक व धार्मिक गुरू म्हणून मानले जातात. त्यामुळे या देशात व्हॅलेंटाईन डे हा मंगल दिवस म्हणून साजरा केला जातो म्हणून ह्या देशातील लोक द्राक्षाच्या बागांमध्ये कामाला सुरूवात करतात. तसंच आपल्या प्रिय व्यक्तीसोबत लग्न करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो.

५) इटली

इटलीसारख्या प्रगल्भ देशात व्हॅलेंटाईन डेनिमित्त एक आगळीवेगळी प्रथा पाळली जाते. इथे अविवाहित मुली संध्याकाळच्यावेळी बाहेर पडतात व पहिला जो अविवाहित पुरूष त्यांच्या नजरेसमोर येईल त्याच्याशीच लग्न करतात. त्यामुळेच इटलीतील वेरोना या शहरात हजारो तरूण तरूणींची गर्दी असते.  

आणखी वाचा - #ValentineDay2018 : आपल्या पार्टनरला ही ५ प्रॅामिस, दोघांचं नातं होईल अधिक घट्ट

६) फिनलॅन्ड

व्हॅलेंटाईन डे हा नुसताच जोडप्यांसाठी नसतो तर त्या प्रत्येक व्यक्तीसाठी असतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो आणि हाच संदेश फिनलॅंन्ड देशात महत्त्वाचा मानला जातो. फिनलॅन्ड या देशात नुसतंच प्रियकर आणि प्रेयसी व्हॅलेंटाईन डे साजरा करत नाहीत तर सर्व मित्र मिळून व्हॅलेंटाईन डे साजरा करतात.

७) जपान

जपान हा पारंपरिक गोष्टींना नेहमीच प्राधान्य देतो. जपानमध्ये व्हॅलेंटाईन डे निमित्त चॅाकलेट गिफ्ट देण्याची परंपरा आहे. चॅाकलेट गिफ्ट करणं यात नाविण्य काहीच नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण जपानमध्ये २ प्रकारचे चॅाकलेट्स गिफ्ट केले जातात. पहिलं म्हणजे 'गिरि चॅाको' आणि दुसरं म्हणजे 'होन्मे चॅाको'. गिरि चॅाको हे खास व्यक्तीला भेट करू शकता तर होन्मे चॅाको तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता त्या व्यक्तीला भेट करू शकता. तसंच हे चॅाकलेट्स महिलांनीच गिफ्ट करायचे असतात.

८) फिलिपिन्स

व्हॅलेंटाईन डे हा दिवस या देशात शुभ दिवस म्हणून मानला जातो. म्हणून या दिवशी फिलिपिन्समधील जोडपी सामूहिक विवाह करतात. काही वर्षांपूर्वी ४००० जोडप्यांनी व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्ताने सामूहिक विवाह केला होता.

असं वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारे व्हॅलेंटाईन्स डे साजका केला जातो.  तुम्हाला यापैकी कोणती पध्दत जास्त आवडली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

 

Web Title: #ValentineDay2018: how contries around world celebrates valentine day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.